श्रमदान मोहिम...

Submitted by मी दुर्गवीर on 4 January, 2013 - 09:09

dddddddddddddddddddddddddddddd.jpg

पण काही असतात ध्येयवेडे ,

रविवार किंवा सुट्टीचा दिवस म्हटला कि दिनक्रम कसा असतो अगदी आरामात उठणे आरामात नास्ता सगळ काही आरामात. बरोबर आहे रोज ट्रेन -बस प्रवास -कामाचा ताण यातून एक दिवस सुटका हवीच असते .
पण काही असतात ध्येयवेडे ,काहीना असते भटकंती -ट्रेकिंगचे वेड तर काही असेही असतात.आदल्या दिवशीच ऑफिस मधून धावत पळत दिवा -रोहा ट्रेन पकडतात ,मग गडा पायथ्याशी रात्र घालवायची मस्त गप्पा -कविता करत .सकाळी उठल्यावर आवरून हातात घ्यायचे फावडे ,कोयते ,कुदळ ,घमेली आणि निघायचे गडावर .
तुम्ही म्हणाल हे काय सगळे ,अहो पण खरच आहे हे यांना झपाटलंय दुर्गसंवर्धनाच्या कार्याने .
दुर्गवीर प्रतिष्ठानच्या या मावळ्यांचा हा असतो दिनक्रम.एखाद्या रविवारी गडावर नाही जाता आले तर रविवार फुकट गेला असे मत असते यांचे !
राजेंचा गड आपणच सांभाळला पाहिजे ,त्याला पहिल्या सारखे नवीन रूप दिले पाहिजे हीच एक भावना
जसे जमेल तसा हातभार लावायचा आणि हे शिवकार्य जोमात चालू ठेवण्याचे काम गेली चार वर्षे हे मावळे करत आहे .
तुम्हालाही वाटत का सामील व्हावेसे नक्की संपर्क करा
तर मग पुन्हा "सुरगड " श्रमदान मोहिम".. दि १३ जानेवारी २०१३
जय शिवराय

नितीन पाटोळे
८६५५८२३७४८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजेंचा गड आपणच सांभाळला पाहिजे ,त्याला पहिल्या सारखे नवीन रूप दिले पाहिजे हीच एक भावना
जसे जमेल तसा हातभार लावायचा आणि हे शिवकार्य जोमात चालू ठेवण्याचे