"त्या"ची कविता

Submitted by रीया on 2 January, 2013 - 01:04

एक लाडकासा मित्र माझा
माझ्यावर कविता कर म्हणायचा
नाही रे जमत म्हणल्यावर
चिडव चिडव चिडवायचा

इतकं का ते सोप्प आहे
तुच सांग राजा आता
मुर्तीमंत काव्यावरती
कशी रचावी मी कविता?

तुझी मैत्री, तुझी साथ
काय काय इथे मांडू ?
तुझं असणंच लाख मोलाचं
त्याला चार शब्दात कसं बांधू ?

आणि करावाचं म्हणला छोटासा प्रयत्न
तर उघडावी लागेल आठवांची कुपी
मग कदाचित तुझ्यावरली
कविता होईल सहज सोप्पी

पण मी म्हणते हवीच कशाला
इतकी सारी उठाठेव
तुझं असणं माझ्यासाठी,
माझ्यापुरतंच राखुन ठेव

आणि समजा तुझ्या वर्णना
ओवलेच मी शब्द जर
न जाणो तुझ्या अचानक
कविताच प्रेमात पडली तर????? Wink

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताई पडले नाही ग Wink
उदय आहे लक्ष माझ्या आईचं Proud Wink
सामी काही स्पेशल बातमी वैगेरे नाहीये
हे आपलं असच सहज सुचलं म्हणुन Wink

अमू आवडली Wink

उदय Blush ( दोन्ही आवडण्यासारख्याचं आहेत नाही का? Wink )
अनू "ती" पोस्ट इकडे कशी येईल? Wink

सगळ्यांना खुप सारे थँक्स Happy

मस्त Happy

मस्तच ................ उस्फूर्तपणे अशा कविता सुचत असतील तर जास्त विचार करत नको रचत जाऊस कविता.......... Wink

Pages