Submitted by kaaryashaaLaa on 9 October, 2008 - 23:39
ताणल्या तारांतही थरकाप नाही
ओळखीचा तो जुना आलाप नाही
मूक गुज तव आठवाशी नित्य काही
काय हरकत थेट वार्तालाप नाही?
वाटले मज सोडुनी जाता सयी त्या
विस्मरण तर देणगी, अभिशाप नाही!
स्तब्ध अवचित जाहले आभास सारे
मुक्त अलगद पाश आता व्याप नाही
चित्त पुलकित, भारले चैतन्य काही
दोष तुज! पण हाय मी निष्पाप नाही....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचे तीन
शेवटचे तीन शेर अतिशय आवडले!!
छान! माझे ६
छान!
माझे ६ गुण.
मतला
मतला आवडला....
७ गुण...
माझे ५.
माझे ५.
मतला
मतला मस्त,
वाटले मज सोडुनी जाता सयी त्या
विस्मरण तर देणगी, अभिशाप नाही!
स्तब्ध अवचित जाहले आभास सारे
मुक्त अलगद पाश आता व्याप नाही>>> क्या बात है!
मक्ता पोचला नाय
८ गुण
८ गुण
थोडी
थोडी कॉम्प्लिकेटेड वाटली, मक्ता आवडला
५ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!
५ गुण
५ गुण
पहिले ३
पहिले ३ आवडले! शेवटचे २ नीट कळले नाहीत.
माझे ६.
पहिले तीन
पहिले तीन शेर ठीक. नंतरचे दोन कळलेच नाहीत.
पहिल्या शेरात, 'थरकाप' या शब्दाशी जरा अडखळायला झालं. 'थरकाप' मधे भीतीची भावना अभिप्रेत आहे असं वाटलं. त्या अर्थाने पाहताना त्या शेरातून काही तसं असेल असं वाटलं नाही.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश
वाटले मज
वाटले मज सोडुनी जाता सयी त्या
विस्मरण तर देणगी, अभिशाप नाही!
क्या बात है!!!
काफियाच्या निवडीला सलाम...
माझे गुण ६
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
आशय छान
आशय छान आहे. पण खुप क्लीष्ट शब्दप्रयोग केले आहेत. माझे ५ गुण..
७ गुण
७ गुण
७ गुण.
७ गुण. आवडेश आणि कळेशही
शेवटचे दोन
शेवटचे दोन खास.
माझे ६
desh_ks शी सहमत.
desh_ks शी सहमत. त्या 'थरकाप' शब्दाने गोंधळायला होतय. विस्मरणाचा शेर थेट आहे.
माझे ५
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
वाटले मज
वाटले मज सोडुनी जाता सयी त्या
विस्मरण तर देणगी, अभिशाप नाही!
पटला अगदी...!
माझे ६ गुण
तिसरा शेर
तिसरा शेर आवडला.
५ गुण.
छान माझे ७
छान माझे ७