नवा स्टोल

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 30 December, 2012 - 23:33

आईच्या कपाटात कारभार करतांना सापडलेला चकचकीत दोरा आणि मग केलेली कलाकारी....स्टोल Happy

DSC01992-002.JPG

हा क्लोज -अप Happy

DSC01991.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy

दिनेश...... अरे आईच एक इतकी मोठी कलाकार होती ना....तिच्या मनात आणखी काय काय करायचं असेल. मला बापडीला जे जमतंय ते करतेय. तिचं कपाट म्हणजे खरंच एक खजिना आहे. प्रत्येक वेळी नवंच काहीतरी सापडतं.

व्वा.सुंदर्..स्टोल ची पंख्याची विण खूपच छान दिसते आहे.याच विणीचा एक गोल रुमाल -पहिल्या वर्तुळात सहा मग त्या त्या दोघांमधे एकेक असे वाढवुन केला होता- केला होता..ते आठवले.आता मी पण असा स्टोल करीन.

वा सुरेख ! अन नाजूक कलाकुसर !
अगा, स्टोल म्हणजे हल्ली नव्या पिढीतल्या मुलामुलींची लहानशी ओढणी Wink सलवार-कुडता, जिन्स-टॉप यावर घेतात. अधिक माहिती जाणकार सांगतीलच.

सुलेखा...... तू म्हणते आहेस तसं डिझाईन फार सुरेख दिसतं Happy खरं तर हे अननसाचं डिझाईन माझं आवडतं आहे.
अगा...... अवल ने सांगितल्याप्रमाणे स्टोल म्हणजे ओढणीसारखंच पण कमी रुंदीचं. आजकाल जीन्सटॉपवर ह्याचा वापर वाढलाय.

यासाठी साधारण किती ग्राम दोरा लागला [अंदाजासाठी तयार स्टोल चे वजन घेता येईल्]म्हणजे मी माझ्याकडल्या उरलेल्या दोर्‍या त त्याप्रमाणे बसवेन.कमी पडला तर खाली-वर दुसरा लाविन.तसेच सुरवात करताना ,खाली किती चेन घेतल्या आहेत..५० कि ६०नक्की आकडा सांगतेस..

सुलेखा ...... दोरा कुठला वापरतेस त्यावर आहे. माझा जरा जड आहे. त्यामुळे वजन जास्त आहे. वजनकाटा इतका लहान नाहीये गं त्यामुळे कळत नाहीये. शिवाय हा फोरा फाल्याचा होता. त्यामुळे सांगणं कठीण आहे. तुझ्या सोयीसाठी नेटवरचं चित्र देतेय. म्हणजे तुला पॅटर्न कळेल. मी ४० चेन्स घालून सुरवात केली. आणि त्यावर सिंगल क्रोशे घालून मग पॅटर्न घातला. हे चित्र बघ म्हणजे कळेल तुला.

echarpe-grise-003_1.JPG (69.12 KB)

mastach Happy

mastach Happy

मस्तच. जयवी -जयश्री अंबासकर तुमच्या हातात खरंच खूप छान कला आहे.
जरा सविस्तर टाके सांगू शकाल का?
मला फक्त खांब व साखळ्या येतात.

धन्यवाद लोक्स Happy

शमा अगं हे डिझाईन फक्त खांब आणि साखळ्यांचंच आहे. मी वरच्या प्रतिसादात डिझाईनचाफोटो टाकलाय. त्यात बघ. ४० चेन्स घालायच्या मग त्यावर मुके खांब घालायचे आणि नंतर चित्रातला पॅटर्न घालायचा.

echarpe-grise-003.JPG

Pages