लागल्या पोटी कळा मध्येच.. हे झाले बरे? (विडंबन)

Submitted by विडंबनराव on 28 December, 2012 - 12:58

प्रा. सतीश देवपूरकर यांची गझल आणि त्यातील शब्द पाहिल्यानंतर मना राहविलेच नाही म्हणून एक विडंबनाचा छोटासा प्रयत्न करीत आहे...

लागल्या पोटी कळा मध्येच.. हे झाले बरे?
व्हायच्या आधीच सुटला पेच, हे झाले बरे!!

गंध मी उधळीत होतो, भानही नव्हते मला.....
नाक वेळेवर तिचे दबलेच, हे झाले बरे!

निसरडा रस्ता, बघ्यांचा घोळका, मी घसरलो...
फक्त थोडे शेकले कुल्लेच, हे झाले बरे!

एवढे रांगूनही आले न याला चालता...
आज तो पचकून गेला तेच, हे झाले बरे

रोज दिसतो निरनिराळा रंग दुनियेचा तुला...
ढापण्या, आतातरी कळलेच, हे झाले बरे!!

.... विडंबनराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users