केला ईशारा जाता जाता...

Submitted by जिप्सी on 27 December, 2012 - 06:34

नविन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपलंय. बघता बघता २०१२ ला निरोप द्यायची वेळ आली. काहि दिवसात नवीन वर्षाची पहाट उजाडेल. सहजच मागे वळुन बघताना माझ्या या वर्षीच्या भटकंतीचा आढावा घेतला. या वर्षात पाहिलेल्या ठिकाणांची, सह्याद्री, समुद्रकिनारा, रीसॉर्ट, गडकिल्ले यांची यादी आठवली. या वर्षात मी गड/किल्ले (राजमाची, कोरलई, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, नाणेघाट, पुरंदर-वज्रगड, लोहगड, सुधागड, हडसर, तुंग आणि तेलबैला), समुद्रकिनारे (मांडवा-आवास, मालवण, तारकर्ली, निवती, मोचेमाड, वेंगुर्ला आणि कुणकेश्वर), महाराष्ट्राबाहेर (कश्मिर आणि दिल्ली), पावसाळी भटकंती (पवना, मुळशी, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट, भंडारदरा), इतर (भिगवण पक्षी निरीक्षण, करमरकर शिल्पालय, राणीबाग फुल प्रदर्शन, ओझर, भीमाशंकर) इ. ठिकाणी भटकलो.

सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नविन वर्षाच्या स्वागतासाठी मी उद्यापासुन पुन्हा एकदा ५ दिवसाच्या मालवण दौर्‍यावर चाललोय (२०१२ ने जाता जाता केलेला इशारा :फिदी:). तेंव्हा यावर्षीच्या माझ्या भटकंतीतील निवडक १२ प्रचिंच्या "आठवणींचा कोलाज" मी नविन वर्षाच्या शुभेच्छांसहित सादर करतोय. यातील सर्व प्रचि तुम्ही माझ्या त्या त्या मालिकेमधील पाहिलेली आहे.
=======================================================================
=======================================================================

समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

=======================================================================
=======================================================================
जानेवारी

राजमाची
फेब्रुवारी

भिगवण
मार्च

कोकण
एप्रिल

आवास-मांडवा
मे

दिल्ली
जून

कश्मिर
जुलै

माळशेज घाट
ऑगस्ट

नाणेघाट
सप्टेंबर

मावळ प्रांत
ऑक्टोबर

जुन्नर आणि परीसर
नोव्हेंबर

भंडारदरा
डिसेंबर

पुरंदर-वज्रगड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मित्रा. योगेश, नवीन वर्ष्याचे कॅलेंडर काढण्यापेक्षा संपुर्ण वर्षाची दिनदर्शिकाच छाप राव. प्रत्येक दिवस तुझ्या प्रकाशचित्रांसोबत. अहाहा....... तेवढी अप्रतिम प्रचि नक्कीच आहेत तुझ्याकडे.

मला Desktop calender साठी तुझ्या या themeचे फोटो मिळु शकतील का.. ? तुझा वॉमा तसाच राहील याची काळजी नको करुस..:)

हा भारतीय परमेश आम्हाला कुणी दाखवा!

असे एक गाणे शाळेत म्हटलेले आठवते.
त्याचे घरपोच दर्शन करण्याचा उपाय ह्या प्रचिंनी दिला आहे.

कॅलेंडर आवडले!

काही माणसे जन्मतःच तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, पण जिप्सी जन्माला आला तेव्हा बहुतेक कुणीतरी भेट म्हणून जॉन्सन किट ऐवजी हायकींग किट दिले असणार्.:फिदी::दिवा:

सगळेच फोटो छान !

एप्रिल मधला वाळूचा जुलै मधला धबधबा ,नाणेघाट मावळ प्रांत ..सगळेच भारी एकदम !

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy
तुला तुझ्या घरातले हाकलून लावत नाहीत का रे?>>>निंबुडा, शनिवारी हाकलताता आणि रविवारी संध्याकाळी परत घरी घेतात. Wink

टुनटुन Proud

Pages