केला ईशारा जाता जाता...

Submitted by जिप्सी on 27 December, 2012 - 06:34

नविन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपलंय. बघता बघता २०१२ ला निरोप द्यायची वेळ आली. काहि दिवसात नवीन वर्षाची पहाट उजाडेल. सहजच मागे वळुन बघताना माझ्या या वर्षीच्या भटकंतीचा आढावा घेतला. या वर्षात पाहिलेल्या ठिकाणांची, सह्याद्री, समुद्रकिनारा, रीसॉर्ट, गडकिल्ले यांची यादी आठवली. या वर्षात मी गड/किल्ले (राजमाची, कोरलई, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, नाणेघाट, पुरंदर-वज्रगड, लोहगड, सुधागड, हडसर, तुंग आणि तेलबैला), समुद्रकिनारे (मांडवा-आवास, मालवण, तारकर्ली, निवती, मोचेमाड, वेंगुर्ला आणि कुणकेश्वर), महाराष्ट्राबाहेर (कश्मिर आणि दिल्ली), पावसाळी भटकंती (पवना, मुळशी, लवासा, ताम्हीणी घाट, माळशेज घाट, भंडारदरा), इतर (भिगवण पक्षी निरीक्षण, करमरकर शिल्पालय, राणीबाग फुल प्रदर्शन, ओझर, भीमाशंकर) इ. ठिकाणी भटकलो.

सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नविन वर्षाच्या स्वागतासाठी मी उद्यापासुन पुन्हा एकदा ५ दिवसाच्या मालवण दौर्‍यावर चाललोय (२०१२ ने जाता जाता केलेला इशारा :फिदी:). तेंव्हा यावर्षीच्या माझ्या भटकंतीतील निवडक १२ प्रचिंच्या "आठवणींचा कोलाज" मी नविन वर्षाच्या शुभेच्छांसहित सादर करतोय. यातील सर्व प्रचि तुम्ही माझ्या त्या त्या मालिकेमधील पाहिलेली आहे.
=======================================================================
=======================================================================

समस्त मायबोलीकरांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

=======================================================================
=======================================================================
जानेवारी

राजमाची
फेब्रुवारी

भिगवण
मार्च

कोकण
एप्रिल

आवास-मांडवा
मे

दिल्ली
जून

कश्मिर
जुलै

माळशेज घाट
ऑगस्ट

नाणेघाट
सप्टेंबर

मावळ प्रांत
ऑक्टोबर

जुन्नर आणि परीसर
नोव्हेंबर

भंडारदरा
डिसेंबर

पुरंदर-वज्रगड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त कल्पना!! तुझी प्र चि खास असतात, कारण त्यांना एक थीम असते, काही विचार असतो. तुझ्या २०१३च्याही भटकंती आणि छायाचित्रणाला शुभेच्छा.
पर्सनल फेव्ह- आपला पावसाळा, अर्थात जुलौ, ऑगस्ट आणि सप्टेंबरातली प्रचि! Happy

खूप छान कॅलेंडर. असाच जगभर भटकत रहा, आणि आम्हाला फोटो, वृत्तांत, माहिती दे. Happy
हे वर्ष तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारे, तुला भरपूर भटकवणारे, आणि तिला आणणारे जावो. Happy

मला खरं तर खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊप राग आलाय. Angry (पण जाऊदे. फोटो पहायला मिळतात, वर्णन वाचता येते माहिती मिळते म्हणून राग गिळला. Proud )
जिप्स्या.. किती जळवशील अरे असे फोटो टाकून? >>>>>>>१००००००००००००००००००००००००००% अनुमोदन.
आणि .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
पण २०१३ मधे तूझ्या भटकंतीसाठी हक्काचा साथीदार मिळो, हि शुभेच्छा !>>>>>>>>>>>यालाही जोरदार अनुमोदन Lol (डिसेंबर २०१२ संपल रे............ :स्मित:)

'अप्रतिम' हा एकच शब्द आहे या छायाचित्रांना आणि तुमच्या भटकंतीलाही.....................
असेच फिरत रहा आणि तुमच्या नजरेने आमचीही सफर घडवत रहा...... Happy

जिप्स्या.... ह्याचं कॅलेंडर छापच... + १००००
>>>>>> +१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

पण २०१३ मधे तूझ्या भटकंतीसाठी हक्काचा साथीदार मिळो, हि शुभेच्छा !>>>>>>>>>>

अनुमोदक....

जिप्सी _______ /\________ कोपरापासुन.... काय भन्नाट कल्पना आहेत.... देव करो आणि तुला ही अशीच जिप्सीण मिळो......

जिप्स्या.. फारच सुरेख २०१२ अगदी रंगून गेलं वर्षं, तुझ्या कॅमेर्‍याच्या रंगात...
खरंच प्रिंट कर कॅलेंडर..प्रत्येक ऋतु कसा जिवंत होऊन आलाय.. Happy
चल आता पुन्हा एकदा भटकंतीला लाग.. जानेवारीचा पहिला आठवडा संपण्यात आहे..
आणी हो.. २०१३ मधे तूझ्या भटकंतीसाठी हक्काचा साथीदार मिळो, ही शुभेच्छा आम्हा सर्वांकडून
अ‍ॅक्चुली या शुभेच्छा आपण सर्वांनी जिप्स्याला २०१२ मधेही दिल्या होत्या..पण त्याने काही मनावर घेतले नव्हते तेंव्हा..

अप्रतिम फोटो.मा बो. वर एवढे भटके लोक आहेत आणी ते सुंदर फोटोही काढतात , तेव्हा नवीन वर्ष्याचे कॅलेंडर का नाही काढत?

Pages