मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही श्रींची ईच्छा...!!!!

Submitted by सावरी on 25 December, 2012 - 17:01

नमस्कार मित्रांनो

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी

सुरेश भट्टांच्या काव्यपंक्ती वाचल्या तर मी मराठी असल्याचा जाज्वल्य अभिमान जागा होतोच,
मराठी भाषा ही सन्मानाची,मानाची भाषा आहे, पण त्या माझ्या माऊलीला तो सन्मान मात्र कधीच मिळाला नाही,
आपल्या देशात एकुण ३ भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे १) तामिळ २) संस्कॄत ३) कन्नड, कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दीड हजार वर्षाचा ईतिहास लागतो, पण अमॄताते पैजा जिंकणारी आपली मराठी भाषा ही उपजतच अभिजात भाषा आहे, तेव्हां मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळविणे हा केवळ तांत्रिक मुद्दा आहे. मात्र त्यासाठी आपण चळवळ करणे गरजेचे आहे. "द ग्लोबल टाईम्स" आणि "ई.बी.सी. फोर्स" ने या चळवळीची मशाल हाती घेतली आहे, हि चळवळ आपल्या सहकार्याने उत्तोरोत्तर वाढणार आहे आणि अभिजाततेचा दर्जा मिळविल्याशिवाय थांबणार नाही. भाषा ही आई आहे तेव्हां या आईच्या सन्मानासाठी, चला एकत्र येऊ या. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहीजे, ही मागणी नाही तर ह्ट्ट आहे.

मराठी भाषेच्या हक्कासाठी एक ग्लोबल जनचळवळ

मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी "द ग्लोबल टाइम्स"चा अखंड जागर

मित्रांनो मला या चळवळीसाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे, या चळवळीची सुरुवात तर झालेली आहेच. मी काही छायाचित्र या माझ्या अभिप्राय सोबत देत आहे.........
या उपक्रमासाठी स्वाक्षरी मोहीम ही राबवली जात आहे, तुम्ही ही तुमचे मत नोंदवु शकता.

282888_451074124953596_1026285473_n.jpg45081_448253948568947_593504466_n.jpg480568_448253785235630_1974699732_n.jpg480589_448254125235596_2063835779_n.jpg

सावरी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<भाषा ही आई आहे तेव्हां या आईच्या सन्मानासाठी, चला एकत्र येऊ या.> शुद्धलेखनाचे आणि व्याकरणाचे नियम न पाळून आईचा सन्मान करायची पद्धत आवडली.

मराठी भाषेला दीड हजार वर्षांचा इतिहास आहे किंवा कसे ? त्यासंबंधी दस्तावेज, पुरावे उपलब्ध आहेत का? हे समजावून न घेताच सह्या करायच्या आहेत का ?

हा दर्जा मिळाल्यावर नेमके काय होणार आहे? इतर भाषांना हा दर्जा मिळाल्यामुळे नेमके काय झाले आहे? उदा. संस्कृतला हा दर्जा मिळाला म्हणून संस्कृत बोलणार्‍यांना काय फायदा झाला आहे?

मराठी भाषिकांचे नाव , पत्ते, ईमेल आणि फोन नंबर मिळवून निव्वळ मार्केटींग साठी त्याचा डाटाबेस बनवायचा असा याचा उद्देश असावा अशी शंका नक्की येते आहे.

तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार,

इथे लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे...काही चुकल्यास माफ करा...पण माझ्याकडुन जर
शुद्धलेखन वा व्याकरणासंदर्भात चुका झाल्या असतील तर आपण त्यासुधारण्यास नक्की मदत कराल अशी आशा आहे.

सावरी

या विषयावर पूर्वी माबोवर झालेल्या चर्चेचे हे संदर्भ

http://www.maayboli.com/node/6213

http://www.maayboli.com/node/30105

http://www.maayboli.com/node/33512?page=10

बाकी या मोहिमेचं नाव 'मराठीच्या हक्कासाठी ग्लोबल जनचळवळ' आहे याला काय म्हणायचं? Uhoh

बाकी या मोहिमेचं नाव 'मराठीच्या हक्कासाठी ग्लोबल जनचळवळ' आहे याला काय म्हणायचं? अ ओ, आता काय करायचं >>>>> अगदी अगदी. 'वैश्विक' शब्द सुचणे एवढे अवघड आहे का? की योग म्हणतात तसे 'द ग्लोबल टाईम्स' ची जाहिरात करायचीये?

वरदा,

आपण दुवा दिलेला लेख अत्यंत समर्पक आहे. यावर पूर्वी प्रतिसाद दिला होता. तोच परत द्यावासा वाटतो.

लेखाची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.