सचिनीझम

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सचिनने नुकतीच एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती जाहिर केली. क्रिकेटचा एक अनभिषिक्त सम्राट आता आपल्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये परत दिसणार नाही. त्याच्या खेळाने, वागण्याने जो आनंद त्याने वाटला आहे तो फार फार अमूल्य ठेवा आहे. एक दिवसीय सामन्यांमधल्या माझ्या आठवणीत राहिलेल्या या काही खेळ्या.

१. शारजा स्टॉर्म : भारताला अंतिम फेरीत पोचवायला आणि अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेले शतक.

२. केनया विरूद्धची ९९ च्या विश्वचषकातली सेंच्यूरी . त्याचे वडील वारल्याला केवळ काही दिवस झाले होते.

३. हिरो कपमधली द. अफ्रिकेविरुद्धची शेवटची ओव्हर

४. २००३ वर्ल्डकपमधली सचिनची इनिंग. शोएब अख्तरला लगावलेले दोन जब्बरदस्त टोले.

sach is life.

भाग २.

1994 Sachin Tendulkar 82 off 49 balls vs New Zealand 2nd ODI - YouTube : एकदिवसीय सामन्यातला ओपनर हा प्रकार इथून सुरू झाला [बहुतेक]

वैद्यनाथन http://www.espncricinfo.com/magazine/content/current/story/598402.html

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सर्व लिंक्स उत्तम. "किसकी बॅटिंग है?" जर आपली असेल तर "सचिन खेल रहा है क्या?" यातच सर्व समाविष्ट ...

मस्त लिंक्स. मला सचिनच्या खेळातला सर्वात आवडलेला भाग म्हणजे "बॅटने उत्तर देणे". उगा कधी चिडलाय, बडबडतोय, कुणालातरी खिजवतोय वगैरे नाही. जे काही बोलायचं करायचं ते त्याच्या बॅटनेच. आणि तेही चेहरा अगदी शांत ठेवून.

सचिन खेळाडू म्हणून कितीही श्रेष्ठ असला तरी एक व्यक्ती म्हणून तो कायम त्याहून श्रेष्ठ वाटत आलेला आहे.

शाराजाची ती मेलेली पीच अचानक जागी होऊन हेन्री ओलोन्गाच्या त्या उसळत्या चेंडूने साहेबांना तंबूत पाठवल्यानंतर ओलोगाने मारलेल्या उड्या आणि पुढच्या सामन्यामध्ये त्याच्या सहित पूर्ण झिम्बाब्वे चा कचरा करून ठोकलेल ते वादळी शतक ............. निव्वळ अविस्मरणीय.......

<< जे हवे ते इथे मिळेल.... http://www.sachinstats.com/ >> सचिनचे कसोटी सामन्यांत ४५ व एकदिवसीय सामन्यात १५४ बळी [यांत, एका डावात ४ बळी ४ वेळां व ५ बळी दोनदां] याचा उल्लेख नाही दिसला तिथं; सचिनला फिरकी गोलंदाजी करताना पहाणं , विशेषतः लेगस्पीन करताना, याचाही आनंद आगळाच होता, म्हणून लक्षात आलं इतकंच. फलंदाजी करताना अपेक्षांच्या ओझ्याने कांहींसा दबलेला सचिन, गोलंदाजी करताना मात्र खेळाचा मनमुराद आनंद घेत असे व देत असे असं मला जाणवायचं.

होय भाउ... १९९६-२००० ह्या काळात सचिननए लेग स्पिनने कमाल केली होते. नंतर त्याने गोलंदाजीवरुन आपले लक्ष्य काढुनच घेतले...

<< नंतर त्याने गोलंदाजीवरुन आपले लक्ष्य काढुनच घेतले...>> बहुतेक खांदा व कोपरदुखी चाळवूं नये म्हणून असावं .

भाऊ माझे सचिनच्या गोलंदाजीबद्दल मत हे कि He was ok sort of baller, but what he really had going for him is his understanding of game. समोरच्या बॅट्समनची विचार करायची पद्धत समजून उमजून बॉलिंग केल्यामूळे तो प्रचंड प्रभावी ठरत असे. I wish Srinath etc would have understood this knack Happy

<<...t what he really had going for him is his understanding of game...>> but that precisely is the hallmark of a good bowler at international level, isn't it ! Wink
मला वाटतं लेगस्पीनर म्हणून सचिन 'ओके टाईप'पेक्षां खूपच वरचा होता पण फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केल्याने लेगस्पीनवर पक्की हुकमत मिळवण्यासाठी सरावाला जो वेळ देणं गरजेचं होतं, तो देणं त्याला अर्थातच शक्य नसावं. व्यक्तीशः, 'लेगस्पीन' हा क्रिकेटचा माझा खूपच आवडता पैलू असल्यानेही मला असं वाटत असेल !!! Wink

ओलोगाने मारलेल्या उड्या आणि पुढच्या सामन्यामध्ये त्याच्या सहित पूर्ण झिम्बाब्वे चा कचरा करून ठोकलेल ते वादळी शतक ......>>
लयी भारी आठ्वण. सचिनने धु धु धुवायला सुरु केलेलं. म्हणुन ओलान्गाने त्याला यॉर्क टाकण्याचा प्रयत्न केलेला.
नेम अगदी बरोबर होता पण त्याने जर्रा मागे सरसावुन ठोकलेला सिक्सर लयी भारी होता. Happy

त्याला पॉइंट वरुन ठोकलेला सिक्सर मला अजुनही लख्ख आठवतोय.

तो सचिनने शोधलेला फटका होता बहुतेक.. Wink

Pages