बादशाही ऑम्लेट

Submitted by कवठीचाफा on 22 December, 2012 - 13:00

बादशाही ऑम्लेट :

साहित्य

अंडी - २
कांदे - १ मध्यम आकाराचा
आलंलसूण पेस्ट - १ चमचा
मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या
सोया सॉस - १ चमचा
चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा
तेल - गरजेनुसार
जिरं - चिमूटभर
मोहरी - चिमुटभर
मीठ - चवीपुरते

कॄती :
प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत
त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये )
मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा
जिरं मोहरी फुलून आल्या बरोबर ती फोडणी मघाशी फेटून घेतलेल्या अंड्यांच्या मिश्रणात टाकावी
थोडावेळ ते मिश्रण थंड होऊन द्यावे. यात चवीनूसार मिठ टाकावे.
नंतर पॅनवर चमचाभर तेल टाकून त्यावर हे मिश्रण ओतावे.
.
.
यानंतर जे तयार होईल त्याला तुमचं काळीज खरंच सहन करू शकत असेल तर त्याला ऑम्लेट म्हणायला हरकत नाही.
तटी. : ही पाककृती वाचून जर तुम्ही ऑम्लेट तयार करणारच असाल तर तुमची स्वयंपाकघरातली हुकूमशाही बाद होंण्याची पुर्ण खात्री असल्यानं याला `बाद' शाही ऑम्लेट म्हणता येईल. Proud

अती तटी : ही फसलेली पाककॄती नसून फसवी पाककॄती आहे याची नोंद घ्यावी Wink

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कुठे म्हणालो की माफी मागा Uhoh
आता अंड्याने भावनाही व्यक्त करू नयेत का? Sad

आता ती निंबुडा बोल्ली की मला अंड्याचे सारे सारेच प्रकार आवडतात. पण पुढे कंसात मायबोली आयडी अंड्या नाही हे ही लिहून राहिली.
आता माझ्यात काय न आवडण्यासारखे आहे राव.... आपला अंड्या ही याला अपवाद नाही असेच लिहून राहिली असती तर कंस टाईप करायचेही कष्ट वाचले असते...

अवांतर - मायबोलीवर आश्चर्य व्यक्त करायची किंवा हक्काबक्का बनून राहिल्याची स्माईली नाही का? ह्या Uhoh "अओ" नावाच्या स्माईलीचा अर्थ हाच का?

शहाबादी फरशी अन जाफराबादी म्हैस यात गोंधळ उडू शकतो मात्र.... पण हैदराबादी बिर्याणी मात्र कसाब अजरामर करून गेला..!!!

Pages