सोप्या पद्धतीने मराठीत लेखन

Submitted by shantanuo on 19 December, 2012 - 23:10

मायबोलीसारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अ‍ॅटो करेक्ट, अ‍ॅटो टेक्स्ट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ऑफलाईनला पर्याय नाही. खाली दिलेली सॉफ्टवेअर वापरून मराठीत टंकलेखन करणे अगदी सुलभ आहे. हे सॉफ्टवेअर उतरवून घ्यायला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. (इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून) पण एकदा का डाऊनलोड झाले, की इन्स्टॉल मात्र काही मिनिटांत होईल. आणि आपण विचारांच्या वेगाने मराठीत टायपू लागाल.

१) इंडिक सपोर्टः
एन.एम.एच. रायटर येऊन उतरवून घ्या.
http://software.nhm.in/products/writer

न्यू होरायझन मिडियाचा हा "एन.एच.एम. रायटर" "बराहा"सारखाच काम करतो.
या दुव्यावर दिलेल्या पद्धतीने जर विंडोजमध्ये इंडिक सपोर्ट टाकता आला तर वर दिलेल्या सॉफ्टवेअरची गरज नाही.

२) वर्ड प्रोसेसरः
लिबर ऑफिस शक्यतो ४.० आवृत्ती (पूर्वाश्रमीचे नावः ओपन ऑफिस) येथून...
http://www.libreoffice.org

ओपन ऑफिसचेच नवे नाव लिबर ऑफिस. हे मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखेच काम करते. यात युनिकोड सपोर्ट खूप चांगला आहे.

३) स्पेल चेकर व अ‍ॅटो करेक्ट
http://code.google.com/p/openoffice-marathi-autocorrect/downloads/list

लिबर ऑफिस ३+ आणि लिबर ऑफिस ४+ साठी वेगवेगळ्या फाईल्स वर दिल्या आहेत. त्यातील आपल्या वर्जनला अनुरूप फाईल उतरवून घ्या. ओपन ऑफिससाठी लिबर ऑफिस ३ चीच फाईल वापरता येते.

अ) ही सर्व सॉफ्टवेअर याच क्रमाने इन्स्टॉल करायची आहेत.
ब) आपल्या ऑफिसच्या संगणकावर हा प्रयोग न करता शक्यतो घरच्या संगणकावर आधी टेस्टिंग करून घ्या. या सॉफ्टवेअरमध्ये कुठेही व्हायरस नाही पण तरी देखील सावध राहिलेले बरे Happy
क) यातील शेवटचे स्पेल चेक सॉफ्टवेअर मी बनविलेली असून आपला अभिप्राय मिळेल तसा यात सुधारणा करत जाईन.

पुरवणी:
मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये adn टाईप केले की लगेच त्याचे and होते. हे झाले अ‍ॅटो-करेक्टचे उदाहरण. तसेच लाल खुणांनी स्पेल-चेकही घेतला जातो. इंग्रजीतील या गोष्टी आपल्या परिचयाच्या आहेत. याच सुविधा मराठीतही वापरता येतील. त्यासाठी वर दिलेले अ‍ॅड-ऑन लिबर ऑफिसमध्ये डबल क्लिक करून टाकावे लागेल.
अ‍ॅटो-करेक्ट वापरून मराठीत घुसलेले इंग्रजी शब्द आपोआप मराठीत बदला अशी सूचना एका जेष्ठ भाषाभिमान्याने मला केली होती. म्हणजेच "बॉम्ब = स्फोटक, अशा प्रकारच्या अस्तित्वात असलेल्या पण सर्वश्रुत नसलेल्या मराठी शब्दांचे पर्याय, या शब्दकोशाच्या उपयोगकर्त्यास आपोआपच सुचविले जावेत. हल्ली स्फोटक शब्द अस्तित्वात असूनही बॉम्ब शब्दाचा वापरच सर्वत्र केला जात आहे."

ही सूचना चांगली असली तरी ह्या सॉफ्टवेअरचा उद्देश मराठी शिकवणे असा नसून टंकलेखनाला सहाय्यभूत होणे इतकाच मर्यादित आहे. म्हणून या दुव्यावर दिलेले १८ नियम वापरून अ‍ॅटो करेक्टची लिस्ट बनविली आहे. भविष्यात "बॉम्ब = स्फोटक" अशा सुचवण्यांची पूर्ण यादी कुणी मला पाठवली तर नक्कीच विचार करता येईल.
_____

lib_office.jpg
सोबत दिलेल्या आकॄतीतील काही निरीक्षणे:
१) "कटिबध्द" असा लिहिलेला शब्द आपोआप "कटिबद्ध" होत आहे. सुटी लिहिलेली सर्व जोडाक्षरे दुरुस्त होतील.
२) "सँगणकाची" या शब्दाला दोन सुचविण्या दिसत आहेत राईट क्लिक केल्या बरोबर.
३) alt + 1 ने फोनेटिक तर alt + 2 वापरून इन्स्क्रिप्ट कीबोर्ड वापरता येत आहे. नको असल्यास alt + 0
४) अगदी तळाशी "marathi" असं लिहीलेलं आहे. याचा अर्थ या फाईलसाठी मराठीचा शुद्धिचिकीत्सक वापरात आहे. त्यावर क्लिक करून भाषा बदलू शकता. मराठीचा पर्याय तिथे दिसत नसेल तर लिबर रायटरच्या Tools - Options - Language Settings = Languages वर क्लिक करा आणि खाली दिलेले दोन पर्याय सिलेक्ट करा.
१) Show UI elements for Bi-Directonal Writing should be checked
२) CTL - Marathi
हीच इमेज इथेही पाहता येईल.
_____

फायरफॉक्ससाठी हेच एक्स्टेंशन येथे उपलब्ध आहे.
https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/marathi-dictionary/

_____

यू ट्युबवर हा व्हिडीओ मी अपलोड केला आहे.
http://www.youtube.com/watch?v=aXltzhnnRpw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शंतनू मला काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या जर हि तिन्ही SOFT मी इंस्टाल केली कि WORD PAD वापरताना मला कुठली कि कुठे आहे हे समजण्यासाठी सगळी बटन दाबावी लागतील कि आपोपाप इंग्लिश लिहिलेलं मराठीत होईल जस आपण GOOGLE मध्ये करतो तसे आणि तसे नसेल तर मला तो किळी चा FORMAT कुठून मिळेल.
आणि WORD PAD मध्ये FONT कुठला निवडावा.

माहिती चांगली आहे, पण देवनागरीत ऑफलाईन टंकण्यासाठी बरहासारखी सुविधा आहे की. आणि ती सुद्धा खुप सोपी. अर्थात आता बरहा फ्री नाहीये, पण त्यांचे आधीचे व्हर्जन मिळाले तर सोपे आहे.

चांगली माहिती आहे. हे स्पेल चेकर नुसतेच वापरता येईल का ? असल्यास मायबोली प्रशासनाने ते सर्वांसाठी उपलब्ध केले तर फारच छान होईल.

तुमच्या सोप्या देवनागरी लिहीण्याबद्दलचा लेख आत्ताच वाचला. खुपच छान आणि सुकर आहे सगळे.
आपण सूचविल्या प्रमाणे लिब्-ऑफिस , एन एच एम रायटर, आपण दिलेला स्पेल चेक वगैरे व्यवस्थीत झाले. त्या मुळे ऑफलाईन टंकायची छानच सोय झाली. धन्यवाद.

एखादी रेसीपी वर्ड मध्ये कॉपी पेस्ट केली की ठोकळेच दिसत आहेत. अध्ये मध्ये एखाद मराठी अक्षर दिसतयं.
यापुर्वी हा प्रॉब्लेम नव्हता. मध्ये आय.टी. डिपार्टमेंटने काही अपग्रेडेशन केलेलं त्यामुळे तर होत नसेल.
माझ्या इथे Microsoft Word 2010 आहे, आणि file extension docx आहे.

कुठे विचाराव ते कळाल नाही म्हणुन इथेच विचारतोय. जरा मदत करा लोकहो.

namskar. me 15 varshapasun Shri Lipi Modular madhe Modular Key Bord vaprun typing karit aahe. mala Modular cha key board ya aplya software madhe vaprata yel ka?
Pl. tumcha Phone No.
Maza 9890331298 email: anant7890@gmail.com

नव्याने?
बदल तर काहीच झालेला नाही.