साडेसाती विषयी चर्चा

Submitted by मी कल्याणी on 17 December, 2012 - 21:26

तुळ राशीच्या चालू साडेसातीबद्दल कोणी माहिती देउ शकेल का? मुख्यतः कधी सुरु झाली आणि कधी संपणार याविशयी.....

सर्वांनी आपल्या साडेसातीविषयी अनुभव शेअर करावे.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुळेची साडेसाती साधारण एप्रिल २००९ ला सुरु झाली आणि सप्टेंबर / ऑक्टोबर २०१६ ला संपेल. ( एक्झॅट डेट उद्या पंचांग बघुन सांगु शकेन)

नुसती ही माहिती कळुन काय होणार आहे? साडेसाती आहे हे माहिती आहे ना!!!

परत ही साडेसाती वाईट असे का समजता? उलट साडेसाती तुम्हाला खुप काही शिकवते. खुप अनुभव देउन जाते. प्रगल्भ बनवते. शनी हा म्हातारा ग्रह आहे. मॅचुअर्ड. गंभीर. त्यामुळे तो तुम्हाला गंभीर पणे आयुष्याकडे बघायला शिकवतो. अनुभव देतो. ह्या काळात अनेक उलगडे होतात. अशा घटना घडतात त्या मुळे तुम्ही तावुन सुलाखुन बाहेर पडता. साडे साती सरसकट वाईट नसते. होणार्‍या घटना ह्या होणारच असतात. पण त्यांचे अर्थ तुमच्या साठी बदलतात.

उलट साडेसातीला निर्भेळ मनाने समोर जा. अनुभवाच्या द्रुष्टीने तयार रहा. मला साडेसातीने खुप संयंम दिला. मॅचुरीटी दिली. घटनेच्या मुळात जायची मानसिकता दिली.

आपण साडेसातीला घाबरतो कारण त्यात येणार्‍या अनोख्या अनुभवांना घाबरतो. "आता काय होइल" ह्या धास्तीने छोट्या छोट्या गोष्टींचं टेंशन घेतो. त्यामुळे " साडेसाती " म्हणजे भयंकर हा समज आलेला आहे.

खरे तुमच्या दशा स्वमीवर अवलंबुन असतं.... तो काय म्हणतो किती फेवेरेबल आहे ह्या वर तुमच्या आतुष्यातल्या घटना अवलंबुन असतात.

धन्यवाद मोहन की मीरा.. माझही मत आपल्यासारखच आहे... एका स्नेह्याला साधारण माहिती हवी होती आरंभ अन समाप्ती बद्दल... म्हणून विचारल.

परत ही साडेसाती वाईट असे का समजता? उलट साडेसाती तुम्हाला खुप काही शिकवते. खुप अनुभव देउन जाते. प्रगल्भ बनवते. शनी हा म्हातारा ग्रह आहे. मॅचुअर्ड. गंभीर. त्यामुळे तो तुम्हाला गंभीर पणे आयुष्याकडे बघायला शिकवतो. अनुभव देतो. ह्या काळात अनेक उलगडे होतात. अशा घटना घडतात त्या मुळे तुम्ही तावुन सुलाखुन बाहेर पडता. साडे साती सरसकट वाईट नसते. होणार्‍या घटना ह्या होणारच असतात. पण त्यांचे अर्थ तुमच्या साठी बदलतात>>>>>>>>> १००% सहमत...

सध्या वृश्चिक राशीची सुद्धा चालू आहे ना साडेसाती?
कल्याणी, धाग्याचे नाव साडेसातीवर चर्चा असे काहीतरी कराल का? जेणेकरून साडेसाती विषयी च्या सर्वच राशींबद्दलच्या चर्चा एकाच धाग्यावर होतील. अन्यथा प्रत्येक राशीसाठी एक वेगळा धागा काढावा लागेल. लोक आपापले अनुभव सुद्धा शेअर करतील.

अदरवाईज सुरळित चाललेले आयुष्य साडेसाती दरम्यान अचानक कोलांट्या उड्या खाते हे अनुभवलेले आहे. त्यामुळे ह्या धाग्यावर लोकांचे अनुभव वाचायला आवडेल.

जाता जाता साडेसाती अचानक काहीतरी लाभ देऊन जाते असे म्हणतात. कुणाचा काय अनुभव?

मायबोलीवर होऊन गेलेल्या साडेसात्या.
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/128002.html?1189001382
http://www.maayboli.com/node/30761
साडेसाती शब्दाच्या सर्च चे रिझल्ट्सः
http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A1%...

(शनी) इब्लिस

साडेसाती म्हणजे कहीतरी भयानक किंवा वाईट्टच असतं, असा सर्वसाधारण (गैर)समज आहे... साडेसात वर्ष तुमची परीक्षा बघतात असं म्हणायला हरकत नाही... जे जसं असेल त्याच्या विरूद्ध होणं , ही साधारण संकल्पना म्हणता येईल... त्या बदलाकडे आपण कस बघतो यावर फयदा किंवा नुकसान ठरतं.. उदहरणार्थ कुटुंबीयांपासून दूर जाण्याचा योग... एखाद्याला परदेशात जावं लागलं (नोकरी, लग्न इ. काही कारणानी) तर एका प्रकारे घरापासून, परिवारापासून दूर गेला म्हणता येइल.. पण ती व्यक्ती स्वतः यात प्रगती किंवा संधी बघते की दु:ख हे पहाणे महत्त्वाचे..

अर्थात, हे झाल माझ मत......

वडील हयात असतील तर साडेसातीचा त्रास कमी जाणवतो असे ऐकून आहे. कुणी यावर अभ्यासक दॄष्टीने प्रकाश टाकेल का?

साडेसाती कुठल्या महादशेत आलीय ? त्या ग्रहाचे पत्रिकेतील स्थान, अवस्था ( बाल्य, वॄध्द, मॄत), त्याची डीग्री हे नी असे अनेक पैलू विचारात घेवून साडेसातीचा होणारा त्रास अथवा लाभ ठरवला जातो का?

व्यक्तिशः मोकिमि शी सहमत....साडेसाती डोळे उघडते, भ्रमाचा भोपळा फुटतो तिला सकारात्मक रुपाने घेतल्यास आलेल्या ब-या वाइट अनुभवाने पुढील आयुष्य सुकर होण्यास नक्कीच मदत व्हावी.

-सुप्रिया.

>>>> वडील हयात असतील तर साडेसातीचा त्रास कमी जाणवतो असे ऐकून आहे.<<<<
हे खरे आहे. केवळ साडेसातीच नव्हे तर एकुणातच कुंडलीतील काही कूयोग असतील तरीही जोवर आईवडील हयात आहेत, तोवर त्या साडेसातीचे/कूयोगांचे परिणाम जातकावर सौम्यच दिसतात वा कित्येकदा जातकावर न दिसता जातकाचे "वडिल" मंडळींवर त्यांचा प्रभाव जाणवतो. अर्थात जातकावरील "कुणाचातरी" वरदहस्त दर्शविणार्‍या भाग्य, चतुर्थ-दशम व लाभाचे स्वामी व ती ती स्थाने शुभसंबंधित असतील तर परिणाम अधिक सु:स्पष्टपणे दिसतो असा अनुभव आहे.

सध्या वृश्चिक राशीची सुद्धा चालू आहे ना साडेसाती?>> हो. मी पण वाचले होते.. सध्या अनुभव घेतेय.. पण आयुष्य खुप बदलुन जाते ह्या काळात.. खुप मॅच्युरिटी आलेली आहे . पॉझिटीव्ह दृष्टीकोन ठेवलेला आहे सध्या. " जे होते ते चांगल्यासाठी " हे मनाशी पक्कं केलंय.
मला एका मैत्रिणीने सांगितले की दर शनिवारी शनिच्या मंदिरात जाऊन तेल वाहा. " ओ माय गॉड " चा प्रभाव अजुन असल्याने अजुन तरी काही केलेलं नाहीये हे. हा फक्त येता जाता लांबुन नमस्कार करते आणी एकच मागणं मागते की जे येईल त्याला सामोरे जायला मदत कर , तेवढी सक्षम बनव.. Happy

मला लागली होती साडेसाती आणि मोहन की मीरा प्रमाणेच अनुभव आला. माझ्या राशीचा स्वामी शनि असल्या कारणाने मला त्रास ही भरपुर झाला. असं म्हणतात कि ज्यांच्या साडेसातीची सुरुवात चांगली होते त्यांना साडेसातीच्या शेवटची वेळ त्रासदायक ठरते व ज्यांच्या साडेसातीची सुरुवात त्रासदायक होते त्यांना साडेसातीच्या शेवटची वेळ चांगली जाते. माझी साडेसातीची सुरुवात त्रासदायक होती पण शेवट मात्र चांगला गेला.

माझ्यासाठी साडेसाती हा , 'माणुस' म्हणुन समृद्ध आणि प्रगल्भ होण्याचा काळ होता. आणि त्याकाळात मिळालेलं शिक्षण आणि life values आयुष्यभर माझ्या सोबत राहतील.

साडेसातीविषयी जेवढे लिहाल तेवढे कमीच. साडेसाती माणसाला आपले आणी परके कोण यातला फरक दाखवुन देते. चांगले वाईट यातीलही फरक दाखवतेच. साडेसाती वाईट नाही, उलट ती डोळ्यात काजळ घालुन जाते.

सध्या तुळ, कन्या आणी वृश्चिक यांना साडेसाती सुरु आहे. कन्येची २०१४ मध्ये संपेल. शनी आता तुळेत आहे.

वरती मोकीमींनी छान लिहीले आहे. अगदीच मनाला अस्वस्थ वाटत असेल तर श्री मारुतीची उपासना जरुर करावी, मनाला बळ मिळतेच. आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन मात्र सकारात्मक ठेवावा.

नमस्कार,

पण शनिदेवांची उपासना किंवा आठवण साडे साती सुरु असतानाच का करावी? नेहमीच का करु नये?

आपण शनिमाहात्म्य काळजी पुर्वक वाचले तर असे जाणवेल की शनिदेव उगाच कोणाला त्रास द्यावासा वाटला म्हणुन त्रास देतात असे नाही. गुरुमहाराज आणि भगवान शंकर याना आधी त्यानी विचारले आणि त्यांची प्रतिक्रिया पाहुन त्याप्रमाणे त्याना अनुभव दिले. विक्रमादित्यासारखा पुण्यवान माणुस पण त्याला गर्व झाला आणि त्याला त्यानी जमिनीवर आणुन ठेवले.
आपले हे जे प्राचीन ग्रंथ/या रुपककथा आहेत त्या जर भितीने कशातरी दडपणाखाली वाचल्या तर त्याचा खरा अर्थ आपल्याला कधीच कळणार नाही. साधारणतः माणसाचे आयुष्य लिनीअर कधीच नसते, त्यात चढ उतार येतच असतात आणि बर्‍याच वेळा (सगळ्याच नाही) याला माणसाची मानसिक स्थिती कारणीभूत असते. जेव्हा माणसाला स्वतःच्या धनाचा, कर्त्रूत्वाचा, सत्तेचा मद चढतो तेव्हा त्याच्या हातुन काही ना काही आततायी कृत्य घडतेच आणि असे झाले की आयुष्याची गणिते चुकलीच म्हणुन समजा. मग असे काही झाले की नंतर आत्मपरीक्षणाने कळते की "अरे.. मी किती चुकीचा वागलो.." मग हळुहळु वर्तनात सुधार होतो आणि आयुष्याची गाडी रुळावर येते.
असे काही होउ नये म्हणुन या कथा सतत वाचनात असतील तर अशा एखाद्या गर्वाच्या क्षणी विक्रमाची कथा आठवावी मग लक्षात येइल की अरे जरा मी अतीच करतोय का? मला जरा विचार करायला हवा का?
(देवळात जाउन काळे उडीद, तेल वगैरे वाहण्यापेक्षा साडेसातीच्या काळात हे आत्मपरीक्षण जास्त उपयोगी पडेल).
शनिदेव आपले मित्र आहेत. त्याना घाबरु नका. त्यांचे रोज स्मरण ठेवा.

||सुर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्षः शिवप्रिया:||
||मंदचारः प्रसन्नात्मा पीडाम हरतु मे शनि:||

मस्त बाफ आणि चर्चा!

माझी जन्म रास मिथुन आणि लग्न रास कुंभ आहे. मला २००४-५ च्या काळात साडेसाती चालू होती. जनरली सुरळित आयुष्य चालू असल्याने फारसे चढ उतार जाणवले नव्हते पण मित्र मंडळीच्या गोतावळ्यावर क्वालिटी कंट्रोलचा असा काही झाडू फिरला की दूध का दूध...पानी का पानी झाल्याचा जबर्दस्त अनुभव आला. कचरा बाजूला झाला आणि खर्‍या अर्थाने जिवाला जीव देणारे मित्र-मैत्रिणी जोडले गेले. डोळ्यात झणझणीत अंजन पडल आणि मी माणूस म्हणून खूप प्रगल्भ झाले. अगदी जवळच्या मित्रासारखा योगा गुरु सुद्धा साडेसातीच भेटला. तेव्हा साडेसाती ला उगाचच घाबरायच कारणच नाही. मनास्मी१८ ची पोस्ट अतिशय छान विवेचन करते. माज नको----कुठल्याच गोष्टीचा!

मोकिमी अनुमोदन, साडेसातीबरोबरच चालू असणार्‍या दशांवर बरच काही अवलंबून असत.

मला चांगला अनुभव..........शालेय जीवनात चालु झाली....चढत्या मार्काने पास होत गेलो......कॉलेज संपले साडेसाती संपली Wink

वृश्चिक रास आणि अनुराधा नक्षत्र असलेल्यांनी साडेसातीसाठी काही करावे का? सध्या तब्येतीचे त्रास जातकाच्या आणि आई वडिलांच्या बरेच चालू आहेत. ह्यांची साडेसाती कधी संपेल? (सध्या बहुदा मधले अडीचकं चालू आहे)

(डॉक्टरचे बिल इमाने इतबारे भरणे आणि पथ्ये पाळणे, असे सल्ले नकोत, ते करतच आहेत ;))

कंटक शनी (शनीची ऊलट्या दिशेने भ्रमण उदा सध्या मेषेला असलेली अडीच वर्षे )

याचे जातकाच्या जिवनावर काय परीणाम होतात.

जाणकारांनी आपले मत मांडावे.

साडेसातीवरी उपाय माहीत असल्यास लिहावे.

मी असे वाचले आहे कि शनी नवीन त्रास निर्माण करत नाही. असलेला/ले त्रास उघडकीस आणतो (शारीरिक, नाती, व्यवसाय, ...).

मी एकदम पल्टीवाला प्रश्नं विचारणारय -
आयुष्यात आलेलं प्रत्येक सुख आणि दु:खं जर देवानं स्वहस्ते रांधून तुमच्या तळहातावर ठेवलेला प्रसाद आहे असं म्हटलं तर...
साडेसाती नक्की कधी सुरू होते आणि कधी संपते?
देव रांधायचा थांबलाच नाहीये... तो थांबला की सगळं संपलं. फक्तं एकच आहे, त्याच्या रांधवणीसाठी तेल, तुप, मीठ, मसाला, गुळ्-साखर, डाळी, पीठं.. इंधन... हे सगळं आपणच पुरवलय. आपल्याच पूर्वं-कर्मांना घेऊन जमेल तितकं चांगलं रांधतोय बिचारा...
लवकर संपेल तर बरं... ही पीडा... असं कशालाही नका म्हणू.
"त्याच्या" सुग्रणपणाचा अपमान तर आहेच... पण आपल्या कोठारात सामान आहे तोपर्यंत "त्याच्या" नशीबी हातावर रांधणं आहे आणि आपल्या नशीबी स्वाहा करणं.
कोणतीच गोष्टं नाकारू नका, गडे हो.... हे माझं तुम्हाला अगदी मनापासून कळकळीचं सांगणं आहे.
(अगदी राहावलं नाही... सॉरी.)

आकाश नील.. अंशतः बरोबर...

मला वाटतं.. ज्या ज्या गोष्टींबाबत आपण ओव्हर काँफिडंट असतो, अति परावलम्बी असतो, त्यातच जस्त त्रास जाणवतो.. म्हनजेच आपली योग्य जागा किंवा नकळत घडत असलेल्या चुका साडेसाती निदर्शनास आणते.. आपल्याच स्वभावातले गुण- दुर्गुण पारखायची संधी देते...

मला साडेसाती आहे की नाही हे कसे कळणार??? >> आधी तुझी रास, जन्मनक्षत्र आणि जन्मवेळ सांग बघू. Happy

दाद, सही पोस्ट!!!!

कंटक शनी (शनीची ऊलट्या दिशेने भ्रमण उदा सध्या मेषेला असलेली अडीच वर्षे ) >>> ही काय भानगड आहे रे???

कंटक शनीलाच वक्री शनी म्हणतात का? वक्री शनी उलटा फिरलेला असतो असं काहीतरी पुर्वी ऐकलं होतं.
मी साडेसाती आहे की नाही कधी बघतच नाही. समजा कळली तरी घाबरणार नाही. संकटं, परिक्षेची वेळ तर साडेसाती नसली तरी कित्येकदा आली आहे, त्यामुळे जे येईल त्याला तोंड देणं आणि त्यातून काही शिकून बाहेर पडणं आणि हे करताना श्रद्धा अढळ राखणं एवढंच मला कळतं Happy जेव्हा कोणे एके काळी रविवारच्या पेपरातील साप्ताहिक भविष्य टिपी म्हणून बघायचे तेव्हा उगाचच साडेसातीच्या ध्यास (?) लागलेला असायचा Lol आणि उगाचच घोर लागायचा. आता पत्रिका, भविष्य वगैरेंशी कित्येक वर्षं संबंधच नाहिये आणि फक्त भगवंतावर अढळ विश्वास आहे त्यामुळे जिवाला तो घोरच नाही.

अश्विनी के

+ १०००००००००

कंटक शनी म्हणजेच वक्रि शनी ... काय फळ देतो ? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा !

( संकटं, परिक्षेची वेळ तर साडेसाती नसली तरी कित्येकदा आली आहे, त्यामुळे जे येईल त्याला तोंड देणं आणि त्यातून काही शिकून बाहेर पडणं आणि हे करताना श्रद्धा अढळ राखणं एवढंच मला कळतं.) +१०००

ही काय भानगड आहे रे??? > भानगड नाही ओ. शनी सध्या तुळ राशीत (२०११ ते २०१४ पर्यंत) अडीच वर्ष आहे. तुळ रास ७व्या क्रमांकावर आहे तर तिच्या मागे बरोबर पहिल्या क्रमांकावर मेष रास आहे. म्हणजेच तुळेला शनी जे फळ देईल त्याच्या कमी प्रमाणात त्याच्या मागिल राशीला सुद्धा देतो असे कंटक शनी सुचवतो.

मी २००१ ते २००३ पर्यंत कंटक शनीचे परिणाम बघितले आहेत.

मो की मी आणि मनस्मी१८ अगदी योग्य पोस्ट आहेत.

आई वडीलांच्या साडेसातीचा परीणाम मुलांवर हि होतो का ? (कन्या व वृश्चिक)

अश्वे सगळ पटत ग पण जेव्हा प्रत्यक्शात त्रास होत असतो ना ग त्यावेळी मग हे ह्याच्यामुळे असेल हे त्याच्यामुळे असेल अस म्ह्णुन मनाला दिलासा द्यायचा Sad

तुळेच्या मागे कन्या आहे ना ? > हो बरोबर. मला नीट लिहिता नाही आलं. १२ राशींचे वर्तुळ पाहिले तर तुळ राशीच्या मागे सहा घर मेष रास येते.

image005.gif

मायबोलीकर मिलिंदने astromnc साईटवर साडेसाती बद्दल माहिती दिली आहे.
http://www.astromnc.com/component/content/article/17-basics/astrologybas...

वृश्चिक रास आणि अनुराधा नक्षत्र असलेल्यांनी साडेसातीसाठी काही करावे का?सध्या ख्रराब अनुभव येत आहे Sad कुणी प्लीज सांगेल का??

वृश्चिक रास आणि अनुराधा नक्षत्र असलेल्यांनी साडेसातीसाठी काही करावे का?सध्या ख्रराब अनुभव येत आहे Sad कुणी प्लीज सांगेल का??

वृश्चिक रास आणि अनुराधा नक्षत्र असलेल्यांनी साडेसातीसाठी काही करावे का?सध्या ख्रराब अनुभव येत आहे कुणी प्लीज सांगेल का??>>>

पहिले म्हणजे साडेसाती आहे म्हणुन खराब अनुभव येतो आहे हा विचार मनातुन काढा. होणारी घटना होतच असते. पण तुम्ही तिचा स्वीकार कसा करता ह्यावर त्या घटने ची तिव्रता अवलंबुन असते. पहिले तर सकारात्मक विचार करायला शीका. सकारात्मक विचार हा साडेसाती वर उत्तम उपाय आहे. मनःशांती साठी एखादे स्तोत्र किंवा मारुती स्तोत्र म्हणा. आंघोळीच्या पाण्यात ४ काळे उडिद टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा. अंगा वरुन ते पाणी जाउ दे. आंघोळ करताना तोंडाने

ॐ निलान्जनम समाभासं रविपुत्रं यमाग्रजम।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम॥

हा मंत्र म्हणत रहा.

मंत्र म्हंटल्याने, काळे उडिद पाण्यात टाकल्याने चमत्कार होतात का? साडेसातीचा त्रास (?) संपतो का?

उत्तर नाही असेच आहे....

सो कॉल्ड समस्या, त्रास संपत नाही... पण एक नक्की ह्या उपायांनी एक सकारात्मक उर्जा मनात निर्माण होते. त्या मुळे तुम्ही संकटांशी , समस्यांशी मुकाबला करायला तयार होता. एक प्रकारची पॉझीटिव्ह वेव्ह मनात तयार होते. सब काँशस लेव्हल वर तुम्ही तयार रहाता, अ‍ॅलर्ट रहाता. साहाजिकच येणारा कोणताही अनुभव घ्यायला मन तयार होते.

दुसरे म्हणजे आपला कमकुवतपणा / चुका साडेसातीच्या नावा खाली झाकु नका. आणि साडे साती आहे ना मग असेच होणार... असे म्हणुन प्रश्न तसाच टाकुन जाउ नका

आर्थात हे.मा.वै.म.

उत्तम पोस्ट मोकीमी... Happy
मंत्र, रत्न-खडे, यज्ञकांड करुन चमत्कार होत नसतात. ते फक्त सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

मंत्र, रत्न-खडे, यज्ञकांड करुन चमत्कार होत नसतात. ते फक्त सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यास मदत करतात.
>> करेक्ट. सामान्य माणसाला पॉझिटिव्ह/ नीगेटिव्ह व्हायब्रेशन्स चा फंडा समजावून देणे थोडे किचकट होईल. त्यामुळे अमुक केल्यास फळ लाभेल असे सांगण्याची प्रक्रिया चालू झाली असणार! ज्या गोष्टीवर आपला विश्वास असेल किंवा श्रद्धा असेल त्याविषयी आपल्या मनात आपोआपच सकारात्मक उर्जा निर्माण होते व ती चांगले काहीतरी घडून येण्यास कारनीभूत ठरते. Happy

वृश्चिक रास आणि अनुराधा नक्षत्र असलेल्यांनी साडेसातीसाठी काही करावे का?सध्या ख्रराब अनुभव येत आहे

माझ्या मुलीचे सेम हेच काँबो आहे... पण इतर ग्रहमान चांगले असावे, त्यामुळे सुदैवाने त्रास कमी आहे. तिचे पुर्ण शिक्षण साडेसातीच्या काळात होणार आहे. पण आम्ही काहीही काळजी करत नाही. जे होईल ते होईलच. Happy

धोंडोपंतानी तिला 'ॐ शं शनैश्चराय नम:' हा मंत्र रोज रात्री झोपताना जेवढे जमेल तेवढा वेळ म्हणायला सांगितला. म्हणजे मंत्र मनातल्या मनात म्हणत म्हणत झोपी जायचे. किती वेळा जप केला ते पाहाय्चेह नाही. आणि दर शनिवारी शनीच्या देवळात जाऊन नमस्कार करायला सांगितलाय. आठवले की जातो आम्ही शनीच्या देवळात, नेरुळला हल्लीच बांधलेय शनी देऊळ. पण मंत्र म्हणायचे मात्र विसरायला होते.

लहान मुलांना साडेसातीचा त्रास होत नाही. कारण ती तेंव्हा पालकांवर अवलंबुंन असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात तीन वेळा साडेसाती येतेच. पण लहानपणीचा काळ मात्र काहीही त्रास न होताच जातो. बाकी वर म्हंटल्या प्रमाणे जप करणे, देवळात जाणे हे सगळे सकारात्मक उर्जा वाढवायचे उपाय आहेत. ते जरुर करावे, पण जमले तर.

लहान मुलांना साडेसातीचा त्रास होत नाही. कारण ती तेंव्हा पालकांवर अवलंबुंन असतात. > बरोबर. पण प्रत्येकाच्या स्वभावा नुसार थोडाफार का होईना लहान मुलांना तब्येतीचा किंवा शिक्षणाचा त्रास सहन करावा लागतो.

स्त्रियांनी मारुती स्तोत्र वाचले तर चालेल का?? शिवाय शनीदेवची मंदिरात जाऊन पुजा केली तर चालेल ?? कारण मला काहीजणांनी सांगितल की मारुती स्तोत्र वाचल्याने लग्नकार्यास विलंब होतो किंवा लग्न जमत नाही

मारुती स्तोत्र वाचल्याने लग्नकार्यास विलंब होतो किंवा लग्न जमत नाही
>>>
मी ह्याच्या बरोब्बर उलट ऐकले आहे. मारूती बालब्रम्हचारी असल्याने स्त्रियांची पीडा नको म्हणून तिच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतो जेणेकरून तिने त्याला अजून भजू नये म्हणून! असे म्हणे!

मला स्वतःला मारुती स्त्रोत्र म्हणणे आवडते. लयीत, एका विशिष्ट गतीत आणि मोठ्याने उच्चारण करीत संध्याकाळी दिवेलागणीला म्हणणे छान वाटते. माझ्या मोबाईल मध्ये सुरेश वाडकरांच्या आवाजातील मारुती स्तोत्र आहे.

अरे यार! कसल्या अफवा पसरवताय? मारुती स्तोत्र म्हणा, बिन्धास्त मारुतीच्या, श॑नीच्या देवळात जा. फक्त ते भितीपोटी जाऊ नका. श्रद्धेनेच जा आणि आपल्या साडेसातीच्या चिंता त्याच्या पायांशीच सोडून ओझं उतरवून परत या. ओझं उतरल्यामुळे नित्यनेमाने प्रत्येकालाच येणार्‍या संकटांवर मात करायला जास्त मानसिक ताकद मिळेल Happy

लहान मुलांना साडेसातीचा त्रास होत नाही

असं असेल तर मग चांगलेच आहे. Happy तशी ती लहान नाहीय पण अवलंबुन मात्र जरुर आहे.

अरे यार! कसल्या अफवा पसरवताय?

Happy

शनीच्या देवळात बायकांना प्रवेश नाही असे ऐकलेले. पण नेरुळच्या देवळाअत असे काही निर्बंध नाहीत.

बिन्धास्त मारुतीच्या, श॑नीच्या देवळात जा. फक्त ते भितीपोटी जाऊ नका. श्रद्धेनेच जा आणि आपल्या साडेसातीच्या चिंता त्याच्या पायांशीच सोडून ओझं उतरवून परत या. ओझं उतरल्यामुळे नित्यनेमाने प्रत्येकालाच येणार्‍या संकटांवर मात करायला जास्त मानसिक ताकद मिळेल >>> +१

Pages