साडेसाती विषयी चर्चा

Submitted by मी कल्याणी on 17 December, 2012 - 21:26

तुळ राशीच्या चालू साडेसातीबद्दल कोणी माहिती देउ शकेल का? मुख्यतः कधी सुरु झाली आणि कधी संपणार याविशयी.....

सर्वांनी आपल्या साडेसातीविषयी अनुभव शेअर करावे.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनीच्या देवळात बायकांना प्रवेश नाही असे ऐकलेले>>
शनी साडेसाती देताना स्त्री-पुरुष असा भेदभाव करत नाही मग शनीच्या देवळात प्रवेशासाठी भेदभाव का?
हा माझा भाबडा प्रश्न

साडेसाती .....

शनी महात्म्यात अगदी सरळ लिहिले आहे की शनी महाराज कुठल्या ही प्रार्थनेला भीक घालत नाही.
साडेसातीच्या काळात जे होणार ते होणारच,
पण ते सर्व आपल्यासाठी योग्यच असेल ह्याची खात्री बाळगा !!

शनी महाराजांची प्रार्थना, होणार्या घडामोडीला सामोरे जाण्यासाठी बळ देते. त्या घटनेचे आपल्यावरील परीणाम कमी करायला मदत होते.

साडेसातीच्या काळात
शनी महात्म दर शनीवारी, शनी वज्रपंजरकवचं आणि शनी-स्त्रोत्र ( दशरथ श्रृषीनी लिहिलेले)
दररोज वाचावे.

पण साडेसाती नसताना होणाऱ्या त्रासाचे काय ब्वा? साडे साती नसतानाच जास्त त्रास झाला आहे, साडे सातीचा त्रास अबू बाकीचे ह्यात काही फरक जाणवला नाही बुवा. ते कोणाच्या माथी मारायचे

पण साडेसाती नसताना होणाऱ्या त्रासाचे काय ब्वा? साडे साती नसतानाच जास्त त्रास झाला आहे, साडे सातीचा त्रास अबू बाकीचे ह्यात काही फरक जाणवला नाही बुवा. ते कोणाच्या माथी मारायचे

आपल्याच माथी Happy मी तरी माझे पुर्वसंचित कर्मच वाईट होते म्हणते आणि निदान या जन्मात तरी वाईट कर्माचा बॅलन्स माझ्या हातुन वाढू नये याची काळजी घेते. जे होतेय/झाले ते झाले, निदान यापुढचे तरी बरे जावो हीच सदिच्छा.

आपल्याच माथी मी तरी माझे पुर्वसंचित कर्मच वाईट होते म्हणते आणि निदान या जन्मात तरी वाईट कर्माचा बॅलन्स माझ्या हातुन वाढू नये याची काळजी घेते. जे होतेय/झाले ते झाले, निदान यापुढचे तरी बरे जावो हीच सदिच्छा.>>>+१

मराठमोळ,साधना आणि सर्वजण,

वाईट कर्म न करणे हा निश्चय चांगला आहे. पण तो पुरेसा नाही.
पुण्यकर्म वाढवा. संचित पाप खूप आहे. अनंत आहे (फक्त तुमचे नाही. आपले सर्वांचे).

हा नरदेह पडता | पुन्हा तोची पाविजेल मागुता| ऐसा विश्वास धरिता | लाज नाही ||
कोण पुण्याचा संग्रहो | जो पुन्हा पाविजेल नरदेहो | दुराशा धरिली पाहो | पुढइलीये जन्माची ||

.....भक्तीवीण अधोगती ||

- समर्थ

>>>> मंत्र, रत्न-खडे, यज्ञकांड करुन चमत्कार होत नसतात. ते फक्त सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यास मदत करतात. <<<<
समहाऊ, मी या विधानाशी तितकासा सहमत नाही म्हणजे असे की पूर्ण विरोधही नाही, पण सम्पुर्णतया मान्यही नाही. फक्त अनुभव वा अनुभूतीचा अभ्यास कमी पडत असल्याने याक्षणी तपशीलवार भाष्य करीत नाही.
सकारात्मक दृष्टिकोन नक्कीच वाढतो, पण तेवढाच उपयोग (वा उपद्रवही) नाही, अजुनही काही आहे.

कृष्ण मूर्ती पद्धती नुसार साडेसाती हा प्रकारच नाही. असलाच तर शनीच्या महादशेत किंवा अंतर्दशेत शनीची
ताकद समजते. मुळचा शनी जर सुस्थितीत असेल तर त्याच्या दशेत चांगली फळ मिळतात. मी स्वत: हा
अनुभव १९ वर्षे घेतलाय. त्या कालावधीत मला साडेसाती होती. परंतु, कुठलाही त्रास झाला नाही. तुम्ही जर
काही गैर व्यवहार पूर्वी केले असतील तर शनीच्या दशेत ते सगळे उघडकीला येतात. दुर्बल शत्रू सुद्धा त्यावेळी
बलवान होतो व सूड उगवतो अस दिसण्यात आलय.

sadesati mhanje kay tar aaplya jiwanatil nati kiti khoti aahet yacha pratya yene.
jiwanat wina apeksh fakt teen nate aahet 1 aai- wadil, 2 guru 3 khra mitra.
tighanwar vishwas thewa sope jate.

मानवाचे आयुष्य १२० वर्षे आहे असे गृहीत धरुन जन्म नक्षत्राच्या अंश कला आणि विकला वरुन महादशा मांडली जाते. उदा . रवीच्या नक्षत्रात जन्म असेल तर जन्मतः रवीची महादशा असते. ( कृतीका, उत्तरा आणि उत्तराषाठा ) यानंतर क्रमाने आणि त्या त्या ग्रहाच्या ठरलेल्या महादशा येतात. हा सर्व गणिताचा भाग आहे. विशोत्तरी महादशा कोणत्याही ज्योतिषाने काढली तरी सारखीच असावी कारण हे फक्त गणीत आहे ज्याचा उपयोग पुढे फल वर्तवण्यासाठी करायचा असतो.

साडेसाती मात्र शनीच्या गोचर भ्रमणाने येते. आपली जी रास असते ( चंद्र ज्या राशीत असतो ती ) याच्या मागील राशीत शनीने प्रवेश केला आणि पुढिल राशीतुन शनी बाहेर पडला या काळाला साडेसाती म्हणतात. उदा. सध्या शनी तुळेत आहे म्हणुन कन्या या मागच्या आणि वृष्चीक या पुढच्या राशीला साडेसाती आहे.

शनी जर दशमेश अणि भाग्येश असेल ( वृषभ लग्नाच्या पत्रिका ) त्याच बरोबर तो दशमात किंवा भाग्यात असेल तर शनीची महादशा वाईट जायचे कारण नाही. हा राजयोग कारक शनी उत्तम फळे देईल.

शनी जर सहाव्या स्थानाचा अधिपती असेल ( सिंह लग्न किंवा कन्या लग्न ) तर शनीच्या महादशेत त्यातही शनीचे गोचरीचे भ्रमण सहाव्या स्थानातुन सुरु असताना दिर्घकाळ आजारपण संभवेल.

याच प्रमाणे आठव्या आणि बाराव्या स्थानाचा अधिपती शनी असता आणि गोचरीचे शनीचे भ्रमण ८ वा १२ व्या किंवा मुळच्या शनीवरुन चालु असताना त्याच बरोबर शनी महादशा असताना वाईट फळे जास्त अनुभवास मिळतील.

आठव्या स्थानाला मृत्यु स्थान म्हणतात याचा अर्थ तुमचा मृत्यु घडेल अस नाही पण मृत्युसम पिडा अनुभवास येऊ शकते. तसेच १२ वे स्थानाला व्यय स्थान म्हणतात. व्यय म्हणजे खर्च. इथे अधिकचा / विनाकारणचा खर्च अनुभवाला येऊ शकतो.

शनी हे आजारपण/ मृत्युसम पीडा/ खर्च देत नसुन ह्या आधीच्या काळात आपण मोडलेले निसर्गाचे नियम रोग बनुन आलेले दिसतात किंवा आपण इतरांस दिलेली पीडा आपल्याला समजेपर्यंत अनुभवाला येते. किंवा १२ व्या स्थानाच्या कारकत्वात असलेला खर्च हा आपणच दुसर्‍याचे बुडवलेले धन किंवा पैसे घेऊन पुरेसा मोबदला दिलेला नसणे या साठीचे फळ आहे.

आपण कितीही चांगले सच्चे वागायचे ठरवले तरी काही वेळा नकळत असे घडते. मग फळे भोगावयास लागतात.

कर्मविपाकावर अनेकांचा विश्वास नाही. परंतु आपल्या आयुष्यात पुढे काय घडेल याची जिज्ञासा मानवाला असतेच. याबाबतचा ठोकताळा ज्योतिष शास्त्राने वर्तवता येतो.

लोक काहीही म्हणुदेत. मी हा ज्योतिषाचा अभ्यासु म्हणुन इतरांच्या पत्रिकांचा अभ्यास करुन घेतला आहे तसेच माझ्या स्वतःच्या पत्रीकेतुन सुध्दा घेतला आहे.

महादशा हे आपले भोग असतात. ते भोगणे हाच त्यावरचा उपाय असतो.
भगवत गीतेच्या दुसर्‍या व तिसर्‍या अध्यायाचे वाचन करा. (संस्कृत गीतेपेक्षा मराठी भाषा असल्यास उत्तम)
याचा जरूर फायदा होतो. गीता वाचनाने मन तळ्यावर राहण्यास मदत होईल.

साडेसाती बाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या १८७५ साली प्रसिध्द झालेल्या निबंधमालेतील 'लोकभ्रम` या निबंधात म्हणतात, '' येथे कोणाच्या राशीवर शनिमहाराजांची स्वारी वळली की, त्याच्या प्रीत्यर्थ लोहदान, तिलदान वगैरे हजारो धर्मकृत्ये केली तरी त्यांचा रोष कमी होत नाही; पण तीच स्वारी इंग्लंडातल्या वगैरे मनुष्यांच्या बिलकुल वाटेस न जाता खुशाल आपल्या वाटेने चालती होते. तेव्हा या त्यांच्या पंक्तीप्रपंचाचे काय बरे चीज असावे.? ज्या अत्युग्र ग्रहाने प्रत्यक्ष शंकरावरही दोन तीन घटिका प्रभाव गाजवला, ज्याची दृष्टि लंकापतीच्या सिंहासनावर सारखी लागली असता लवकरच चौदा चौकडयांचे राज्य फडशा होऊन गेले, त्याचेच सामर्थ्य य:कश्चित परदीपस्थ मनुष्यांवर चालू नये हे केवढे आश्चर्य! ``
ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे आपण उपाय करतोय् ना, मग आता आपल्याल त्रास होणार नाही, या स्वयंसूचनेनेच माणसाला बळ येते. त्याचा उपयोग संकटांशी सामना करण्यासाठी होतो. "आपल्या अपयशाला आपण जबाबदार नसून ग्रहस्थितीमुळे तसे घडतंय्, देवादिकांना सुद्धा जिथं साडेसाती चुकली नाही तिथं तुमची आमची काय कथा?" हा विचार माणसाला धीर देतो.
- (उधृत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद.)
साडेसाती म्हणजे आयुष्यातील बॅडपॅच या अर्थानेही वापरला जाणारा शब्द आहे.ही साडेसाती माणसाचे पाय जमीनीवर रहाण्यास मदत करते. नाहीतर माणुस यशाने उन्मत्त होउन उपद्रवी झाला असता. आपल्या सुपिरिअरॅटी कॉम्प्लेक्स मधून आपण इतरांना प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या तुच्छ लेखत असतो, दुखावत असतो. तसे केले नाही तर जणुकाही आपल्या जगण्यावरच घाला आला आहे अशा उन्मादात काही लोक असतात. आपले भविष्य पुर्णपणे आपल्याच हातात सदोदित असते व आपल्या इच्छेप्रमाणे आपण ते घडवू शकतो असा समज असलेले काही लोक असतात. बॅडपॅच मधे गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. मग शेवटी मनुष्य आपल्या विचारांचे, भावनांचे पुनरावलोकन करतो. त्याला आपल्या त्रुटी कळून येतात. त्या प्रमाणे तो स्वतःत बदल करण्याचे ठरवतो. गतायुष्यातील चुकांचे प्रायश्चित्त घेण्याचे वा पापाचे परिमार्जन करण्याचे प्रयत्न करतो. अशा अर्थाने साडेसाती ही उपयुक्तही आहे असा विचारप्रवाह काही ज्योतिषांमधे पहायला मिळतो.

मी असे ऐकले आहे कि तुळ राशीला इतर राशीच्या तुलनेत साडेसातीचा त्रास कमी होतो कारण शुक्र हा शनीचा मित्र आहे.
पण खरच साडेसाती माणसाला खूप काहि शिकवुन जाते. ती आपले आणी परके दाखवून देते, खर्च करायची सवय असेल तर बचत करायला शिकवते, सयमी बनवते

मित्राच्या राशीमुळे नाही.तुळेत उच्चीचा असतो ना शनी! म्हणजे चांगल्या मूडमधे असतो त्यामुळे तो आपल्या उपद्रव मूल्यामधे कन्सेशन देतो. Happy

माझे सहा महिने राहिलेत. एप्रिलात संपणार् होती. आता नोव्हें टू परेन्त एक्स्टेंड केला स्टे म्हाराजांनी.

धनुर्धारीतील माहिती नुसार. Happy

अमा, तुम्ही कधीपासुन ज्योतिषावर विश्वास ठेवायला लागलात? माझ्या आठवणीप्रमाणे ज्योतिष हे थोतांड आहे का या बीबीवर तुम्ही हे थोतांडच आहे यावर ठाम विश्वासवाल्या कॅटेगरीत होता. ज्योतिष हे थोतांड असेल तर मग आपल्याला साडेसाती आहे की नाही हे तरी कशाला? Light 1

ज्योतिष हे थोतांड असेल तर मग आपल्याला साडेसाती आहे की नाही हे तरी कशाला? दिवा घ्या>> अहो पण मी साडे सातीच्या दुसृया धाग्यावर डीटेल वार लिहीले हो ते माझे अनुभव. धनुर्धारी घेते मी दिवाळी अंक ! : )
परिस्थिती बदलते माणसाला. मला वाट्ते हा एक मिड लाइफ क्रायसिस हँडल करण्याचा मार्ग आहे. साडे साती आहे असे धरले कि माणूस हे त्रास संपतील म्हणून जरा आशावादी राहतो. विश्वास ठेवण्याजोगे काहीच नव्हते तेव्हा सुरू केले विश्वास ठेवायला.

ज्योतिष शास्त्र हे मार्गदर्शक म्हणून खरेच उपयुक्त आहे . योग्य वापर केल्यास प्रयत्नानाची दिशा ठरवता येते . ह्या विषयी माझ्या ब्लोग वर पण लिहिले आहे. उत्सुकता असल्यास जरूर वाचा .

ज्योतिषशास्त्र ???? http://anaghabhade.blogspot.in/2014/04/blog-post_21.html
ज्योतिषशास्त्र का , कशासाठी ? http://anaghabhade.blogspot.in/2014/04/blog-post.html

ठिक आहे हो अमा, मी अजुन कुठेतरी तुमचे लग्नाबाबत ज्योतिषविषयक अनुभव वाचलेले तेव्हाच वाटलेले की तुम्ही कधीपासुन विश्वास ठेवायला लागलात. असो. यात बरेवाईट काही नाही, जस्ट आश्चर्य वाटले म्हणुन विचारले.

र्‍व्रुश्चिक राशिची साडेसातीची किती वर्ष बाकी आहेत.>> साडे पाच जवळ जवळ...

साडेसाती परवड्ली महादशेपेक्षा....साडेसाती फक्त ७.५ वर्शे असते..... महादशा १९ वर्शे ....:(.....
आणि शनिच्या महाद्शेत साडेसाती आली तर मग काय विचारायलाच नको.....आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास

साडेसाती परवड्ली महादशेपेक्षा....साडेसाती फक्त ७.५ वर्शे असते..... महादशा १९ वर्शे .........
आणि शनिच्या महाद्शेत साडेसाती आली तर मग काय विचारायलाच नको.....आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास.....म्हणजे महादशा नाही. बरय मग.

साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून शनि मंत्र म्हणावा असे म्हणतात . ह्या स्तोत्रांचा उपयोग संयम, परिपक्वता , एखाद्या गोष्टीकडे तटस्थ दृष्टीने बघण्याची कुवत , मानसिक शांती ह्या दृष्टीने होत असावा त्यामुळे आपोआपच समस्या कमी वाटू लागतात किंवा समस्यांशी लढण्याचे बळ येत असावे .

शनि मंत्र

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् I
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् II

एकंदर पूर्ण नवग्रह स्तोत्राच मला आवडते . अगदी सोपे आणि पटकन म्हणून होते .

स्तोत्र का म्हणावीत ?
http://anaghabhade.blogspot.in/2014/02/blog-post_14.html

व्रुश्चिक राशिला महादशा आहे का? >>>> महादशा राशीनुसार नाही ठरत. ती जन्मनक्षत्रावरुन ठरते...........
जी लोक आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती या नक्षत्रावर जन्मतात त्याना शनिची महाद्शा येतच नाही किवा ही माणसे खुप वर्शे जगली तर आयुश्याच्या अगदी शेवटी येते..... बाकी सगळ्याना येतेच कधीतरी....

<< शनिच्या महाद्शेत साडेसाती आली तर मग काय विचारायलाच नको>> म्हणजे काय महादशा चालू असताना साडेसाती ?
काही जणांची साडेसाती संपली कि महादशा .मग एक तप मग परत साडेसाती अस काही असू शकत का ? वर्षानुवर्ष त्रास काही जणांचे संपतच नाहीत. Happy

गुरुच्या महादशे नन्तर शनिची महादशा येते......... ज्याच्या पत्रिकेत गुरु उत्तम आहे आणि शनि थोडा गड्बड आहे त्याना हा महादशेचा फरक खुप जास्त जाणवतो

कुंभ राशीच काय???>>>>> कुंभ राशीच्या लोकाना शनिचा फार त्रास होत नाही अस म्हणतात पण तस नसत ते त्याना पण होतो खुप त्रास पण समहोउ या लोकाची मानसिकता शान्तपणे सहन करायची असते. आणि मनाची तेवढी तयारी असते..त्यामुळे त्याना काही फरक पड्त नाही

<< शनिच्या महाद्शेत साडेसाती आली तर मग काय विचारायलाच नको>> म्हणजे काय महादशा चालू असताना साडेसाती ?
काही जणांची साडेसाती संपली कि महादशा .मग एक तप मग परत साडेसाती अस काही असू शकत का ? वर्षानुवर्ष त्रास काही जणांचे संपतच नाहीत. स>>>>>>>>>>>

साडेसाती तेव्हा येते जेव्हा गोचर शनि तुमच्या राशीच्या आधीच्या राशीत प्रवेश करती आणि तेव्हा सम्पते जेव्हा तुमच्या राशीच्या पुढ्च्या राशीतुन तो तिच्या पुढ्च्या राशीत जातो. उदाहरण घ्यायच झाल तर.. आता नोव्हेबर मधे शनि वृश्चिकेत जाइल तेव्हा कन्येची साडेसाती सम्पेल आणि धनू राशीची चालु होइल.

महादशा तुमच्या जन्मनक्षत्रावरुन येतात.. म्हणजे तुम्ही जिवन्त आहात तोवर कुठ्ल्यातरी गृहाची महाद्शा चालूच असते...पण प्रत्येकाची महाद्शा आयुश्यात एकदाच येते..तुमच आयुश्य १२० वर्शे आहे असे मानून सर्वे वर्शाची विभागणी प्रत्येकाच्या महादशेत करतात...त्यातली शनिची १९ वर्शे असतात , शुक्राची २०, गुरुची १६, राहुची १८,केतुची ७, बुधाची१७, मन्गळाची ७, रविची आणि चन्दाची काही( मला आठवत नाही आता नक्की किती ते) अशी असतात.. आता समजा तुमची शनिची महादशा चालु असेल आणि त्यात जर गोचर शनि तुमच्या राशित किवा तुमच्या मागच्या किवा पुढ्च्या राशीत असेल तर तुम्हाला साडेसाती पण चालू होइल........:)

कुंभ राशीच काय???>>>>>. त्याना पण येते की महादशा आणि साडेसाती.......
>>>>>> मला विचारायच होत की ,, या राशीत आत्ता चालु आहे का साडेसाती.. फक्त माहिती साठी..

साडेसातीत नेहमी कायद्यानेच चालावे असे ऐकले आहे.

माझी रास वृश्चिक आणि नक्षत्र अनुराधा आहे. तब्येतीच्या सध्या खूप नवनवीन तक्रारी येत आहेत. तुमच्या लग्न स्वामीचा काही संबंध असतो का साडेसातीशी?

कुंभ राशीच काय???>>>>>. त्याना पण येते की महादशा आणि साडेसाती.......
>>>>>> मला विचारायच होत की ,, या राशीत आत्ता चालु आहे का साडेसाती.. फक्त माहिती साठी..>>> आता नाही आहे कुम्भेला साडेसाती. ,,,, खरतर आता चान्गला काळ चालू आहे कुम्भेला....

>>>>> साडेसाती बाबत विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या १८७५ साली प्रसिध्द झालेल्या निबंधमालेतील 'लोकभ्रम` या निबंधात म्हणतात, '' येथे कोणाच्या राशीवर शनिमहाराजांची स्वारी वळली की, त्याच्या प्रीत्यर्थ लोहदान, तिलदान वगैरे हजारो धर्मकृत्ये केली तरी त्यांचा रोष कमी होत नाही; पण तीच स्वारी इंग्लंडातल्या वगैरे मनुष्यांच्या बिलकुल वाटेस न जाता खुशाल आपल्या वाटेने चालती होते. तेव्हा या त्यांच्या पंक्तीप्रपंचाचे काय बरे चीज असावे.? ज्या अत्युग्र ग्रहाने प्रत्यक्ष शंकरावरही दोन तीन घटिका प्रभाव गाजवला, ज्याची दृष्टि लंकापतीच्या सिंहासनावर सारखी लागली असता लवकरच चौदा चौकडयांचे राज्य फडशा होऊन गेले, त्याचेच सामर्थ्य य:कश्चित परदीपस्थ मनुष्यांवर चालू नये हे केवढे आश्चर्य! `` <<<<<<<

वरील ठळक केलेली दोन्ही वाक्ये विष्णूशास्त्र्यान्नी काय आधारे गृहितक म्हणून मान्डली/लिहीली?
तसे लिहीणारे विष्णुशास्त्री आज हयात नाहीत, अन "बाबावाक्यमसोईस्करप्रमाणम" म्हणुन इथे फक्त दाखल्याप्रीर्त्यर्थ लिहीणार्‍या/उद्धृत करणार्‍या प्रकाशरावान्ना ते विचारुन उपयोग नाही.
एखाद्याला ज्योतिषाच्या/ग्रह नक्षत्रांचे मानवी जीवनावरील बर्‍यावाईट परिणामांचे आकलन/माहिती/ज्ञानच नसल्यास व त्या "अज्ञानात तो सुखी असल्यास" (साडेसातीत नव्हे) ते शास्त्रच खोटे/विनाधार वगैरे दर्शविणे हे कशाचे द्योतक? असो.
प्रत्यक्षात भारतात नाही इतकी प्रगती या शास्त्राने परदेशात इन्ग्लण्ड अमेरिकेत केली आहे पण विष्णुशास्त्र्यांनी सव्वाशे वर्षे पूर्वी लावलेली ज्ञानचक्षूम्वरील झापडे आजही जशीच्या तशी लावुन एखाद्या विषयाकडे एकान्गी पूर्वग्रहदुषित नजरेने कुणास पहायचे असेल तर त्याला लिम्ब्या काय करणार अन ते आकाशातले कर्तव्यकठोर ग्रहतारेतरी काय करणार कप्पाळ? Proud

बायदिवे, जाताजाता एक शन्का, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचेवर त्या समुद्रबन्दी मोडून यवनाच्या देशात अमेरिकेत जाऊन राहुन आल्याबद्दल आयुर्वेदिक वैद्यकीय उपचार नाकारणारे कोण? त्यान्चे नाव काय? माझा स्मृतिंचा जरा घोळ होतोय. Happy कुणी जाणकार असेल तर सान्गु शकेल काय?

सध्या शनि तुळ राशीत आहे. तेव्हा कन्या, तुळ, वृश्चिक राशींना साडेसाती आहे.

२ नोव्हेंबर २०१४ ला शनि वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे, तेव्हा कन्या राशीची साडेसाती संपुन धनु राशीला साडेसाती सुरु होईल.

२ नोव्हेंबरला माझ्यातर्फे चहा समोसे सर्वांना. Happy

साडेसती सन साइन प्रमाणे धरायची की मून साइन प्रमाणे. माझी मून साइन कन्या व सन साइन धनू. मग कन्येची संपून धनूची सुरू कि कॉय. म्हणून काळजात धस्स झाले.

Pages