मित्र भेटावा तसे

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 December, 2012 - 14:18

मित्र भेटावा तसे
एक पुस्तक भेटले
जागे करून गेले
पुन्हा एकदा ll १ ll
हृदयाच्या आत
घालीत हात
विझणारी वात
तेजाळली ll २ ll
मरू मरू गेलेला
विश्वास जागवला
प्रकाशाचा लागला
वेध पुन्हा ll ३ll
ॠणाईत त्या मी
जागल्या क्षणांचा
उघड्या डोळ्यांचा
झालो आज ll ४ ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख