Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 December, 2012 - 14:18
मित्र भेटावा तसे
एक पुस्तक भेटले
जागे करून गेले
पुन्हा एकदा ll १ ll
हृदयाच्या आत
घालीत हात
विझणारी वात
तेजाळली ll २ ll
मरू मरू गेलेला
विश्वास जागवला
प्रकाशाचा लागला
वेध पुन्हा ll ३ll
ॠणाईत त्या मी
जागल्या क्षणांचा
उघड्या डोळ्यांचा
झालो आज ll ४ ll
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे बघितलंत, मीही आत्ता वाचतेय
हे बघितलंत, मीही आत्ता वाचतेय हे. खरंच किती वेगळ्या विषयावरचं आणि प्रत्येकाने अनुभवलेलं काहीतरी. खूप छान.
सुरेख
सुरेख
अहाहा मस्तच
अहाहा मस्तच
भारतीजी,शशांक,वैभव धन्यवाद
भारतीजी,शशांक,वैभव धन्यवाद .भारतीजी काय वाचता आहात?