कच्च्या केळ्याची आमटी

Submitted by स्वप्ना_राज on 14 December, 2012 - 04:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ कच्ची केळी, तेल, २-३ हिरव्या मिरच्या, १ लाल मिरची, मोहरी, मेथी, हळद, ओलं खोबरं, गूळ

क्रमवार पाककृती: 

कच्ची केळी उकडून त्याचे चौकोनी तुकडे करा.

कढईत तेल तापवा, त्यात बारीक चिरून हिरव्या मिरच्या, बारीक चिरून लाल मिरची, १ चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथी, हळद घाला. परता, गॅस बंद करा. पाऊण वाटी ओलं खोबरं घाला. मिक्सरवर बारीक वाटून घ्या.

कढईत तेल तापवा, त्यात मोहरी, उकडलेल्या केळ्याचे तुकडे घाला. परता. थोडं पाणी घाला. झाकण ठेवून ५-१० मिनिटं शिजवा.

झाकण काढून त्यात वाटलेला मसाला, मीठ, थोडा गूळ घाला. एक उकळी काढा.

कोथिंबीर घालून भात किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.

DSC0000304.jpg

माहितीचा स्रोत: 
आम्ही सारे खवय्ये, झी टीव्ही मराठी, मे २००९ एपिसोड
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छान आहे कृति. केळी उकडायची गरज नाही, तशीही शिजतील.
( पण स्वप्ना, कोबंड्यांनी नवस वगैरे तर नव्हते केले ना, आम्हाला एक दिवस तरी स्वातंत्र्य हवे म्हणून Happy )

स्वप्ना, उकडून घेतलेस तर केळी अगदी कुस्करली जातील ना? तसेच अपेक्षित आहे का?

आमची सेल्वीबाई (किचनमेड) कच्च्या केळ्याची ग्रेव्ही करते तेव्हा केळी नुसती चिरून घेते. मग मसाला वाटून वगैरे बनवते. कच्च्या केळ्याची कोरडीभाजी पण छान होते...

आज शेजारणीने केळ्याच्या खोडाची भाजी दिली होती.. कधीतरी त्याची पण रेसिपी टाकेन.

<< कच्च्या केळ्याची कोरडीभाजी पण छान होते... >> आम्हीही बर्‍याचवेळां करतो. आवडतेही. एकदां आमटीही करून पहायला हावी.