माझ्या अस्तित्वाचे चित्र...

Submitted by मुग्धमानसी on 14 December, 2012 - 03:58

कुणीतरी फार निरखून बघतंय मला...
जणु एखाद्या चित्राला कुणी जाणकार रसिक पाहतो आहे!

माझ्या एका एका रेषेला तो नजरेने मापतो आहे...
माझ्या रंगांचं गहिरेपण मोजतो आहे...

पण मी तर जिवंत आहे... बघु शकते... विचार करु शकते...
माझ्यावर अनादिकाळापासून टिकून राहिलेली ती नजर मला जाणवू शकते...
त्याचं हलकंसं हसू मी ऐकू शकते...

हे अनोळखी डोळ्यांनो... कदाचित आवडलंय हे चित्र तुम्हाला... माझ्यावर खुश दिसताय तुम्ही!
पण न जाणे का.... मी खुश नाही...!!!

हे चित्र स्वतःच स्वतःला रेखाटु शकलं असतं... तर कदाचित आहे त्याहुन खुप खुप वेगळं दिसलं असतं!!
आणि तेव्हा कदाचित तुम्हाला ते अजिबात आवडलं नसतं!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" त्या नजरेला महसूस करु शकते..." ऐवजि, "त्या नजरेची चाहूल घेऊ शकते..." अस जास्त छान बसू शकेल असा माझा अंदाज आहे.

बाकी भारी आहे ह कल्पना.....आवडली आपल्याला!!!! अश्या प्रकारच लेखन माझ्यासाठी थोड नवीन आहे. पण मला कवितांबद्दल खूप काही कळत. त्यामुळे शब्दांची रचना आवडली मला, एवढे सांगू शकते. Happy

@सखी-माउली: अगं हे खरंतर हिंदीतुन लिहिलेलं आहे मी. भाषांतर करताना 'महसूस करणे' ला अगदि योग्य असा मराठी पर्याय सापडला नाही. म्हणुन तो शब्द तसाच ठेवला. कुणी योग्य पर्याय सुचवला तर जरुर अमलात आणला जाईल. Happy

अगं हे खरंतर हिंदीतुन लिहिलेलं आहे मी. >>
मूळ हिंदी कुठे ब्लॉगवर वै. टाकलंय का? असल्यास लिंक देणे प्लीज.

हे मुक्तक/ स्फुट जे काय असेल ते आवडलं Happy मूळातलं वाचायलाही आवडेल. Happy

भाषांतर करताना 'महसूस करणे' ला अगदि योग्य असा मराठी पर्याय सापडला नाही. >>>
माझ्यावर अनादिकाळापासून टिकून राहिलेल्या त्या नजरेला महसूस करु शकते...
>>

माझ्यावर अनादिकाळापासून टिकून राहिलेली ती नजर मला जाणवू शकते.
असं चालेल का? ==> एक सुचवणी!

@निंबुडा: मुळ हिंदी लिखाण तुम्ही उत्सुकता दाखवली म्हणून खाली देत आहे...

कोई बहोत गौरसे देख रहा है मुझे...
जैसे किसी तस्वीर को कोई कदरदान देख रहा हो!

मेरी सारी रेषाओंको वो माप रहा है...
मेरे रंगोंकी गहराईयोंको माप रहा है...

पर मै तो जिंदा हुं!!!
देख पाती हुं... सोच पाती हूं...
मुझपर न जाने कबसे टिकी उस नजर को महसूस कर पाती हुं....
उसकी हलकीसी मुस्कुराहट सुन पाती हूं...

ए अंजान नज़र... शायद खुश हो तुम मुझसे!
पर न जाने क्युं... मै खुश नहीं!!

ये तस्वीर अगर खु़द अपने आपको बना पाती तो शायद बहोत अलग होती!!!
ते तस्वीर शायद तब तुम्हे... पसंद नहीं आती....!!!

धन्यवाद, मुग्धमानसी.

हिंदीतलंही आवडलं. Happy