भेंडी आणि पालकाची भाजी

Submitted by चिन्नु on 13 December, 2012 - 04:52
लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धाकिलो धुवून, पुसून कोरडी करून एक ईंच याप्रमाणे तुकडे केलेली भेंडी
५ जुडी पालक-ही देखील धुवून, कापलेली. ही पाने देखील जराशी कोरडी हवीत, नाहीतर भाजी बुळबुळीत होईल. (१ जुडी पालकात ८-१० काड्या या प्रमाणाने)
१५-२० लसूण पाकळ्या (देशी)
२ छोटे चमचे मुगडाळ(भिजवायची गरज नाही), २ सुक्या लाल मिरच्या, फोडणीचे जिन्नस, कडीपत्ता, कोथिंबीर
फोडणीसाठी तेल,
हळद, मीठ चवीनुसार, हिरव्या मिरच्यांचे तिखट -४ छोटे चमचे किंवा १ मोठ्या लिंबाचएवढा गोळा

क्रमवार पाककृती: 

गॅस पेटवून त्यावर कढई, पॅन ठेवा. त्यात राई-जिरा, सुक्या लाल मिरच्या तोडून फोडणी करा. मुगाची डाळ घालून लालसर होईतो भाजा (जाळू नये). आता कडीपत्ता, कोथिंबीर, लसूण पाकळ्या घालून थोडे परता. कांदा घालून परता. आता पालक, भेंडी, हि.मि.चे तिखट, हळद, मीठ घाला. तिखट सर्व फोडींना लागेल असे हलके मिक्स करा किंवा कढई उचलून आतील पदार्थ जपून टॉस करा. भाजी शिजल्यावर बारीक कापलेली कोथिंबीर घाला.

वाढणी/प्रमाण: 
२ खव्वय्यांसाठी/३ जणांसाठी
अधिक टिपा: 

पोळी/फुलक्यांबरोबर छान लागते ही भाजी.
फोडणीत एखाद आमसूल घालू शकता.
तिखट आवडीनुसार कमीजास्त करावे.
हिंग घातले तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्धाकिलो धुवून, पुसून कोरडी करून एक ईंच याप्रमाणे तुकडे केलेली भेंडी + ५ जुडी पालकाची पाने- हे २ खव्वय्यांसाठी ?? प्रमाण काही गड्बड झालय का?

अश्विनी, ही भाजी अंग चोरते. फुलक्यांबरोबर केली तर २ जणांना पुरेशी होते. अर्थात ती दोनजणं खव्वय्ये हवेत, वर भेंडी आवडायला हवी वगेरे.
आमच्याकडं मिळणार्‍या पालकांच्या जुडीत साधारण ८-१० काड्या असतात. बाकी हिशोब करून घ्या. Lol

ही भाजी परतलेल्या मुगडाळीमुळे खमंग होते. पालक घालून वेगळी आणि पौष्टीक कॅटेगरीतपण ढकलता येण्यासारखी Proud

वेगळीच भाजी. करुन बघेन.
भेंडीची परतलेली भाजी प्रचंड चोरटी होते ह्याला + १ Happy

मूगडाळ भिजवून घ्यायची की तशीच?

रच्याकने एक ऑब्जर्वेशन. आजकाल कोथिंबीर 'चिरलेली' नसते, 'कापलेली' असते Wink एकंदरीत विळी वापरण्याचं स्किल कमी होतंय का सगळी कडे?

इब्लिस Happy
मुगडाळ भिजवायची गरज नाही. तशीच तेलावर खमंग परतायची. नंतर ती शिजते भाजीत.

सायो, ही अंगचोरटी भाजी नेहमीच्या भेंडीच्या परतलेल्या भाजीप्रमाणेच दिसते. फोटो पुढच्या वेळेस टाकते.