गाजर-मटर सब्जी

Submitted by अल्पना on 10 December, 2012 - 23:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पावकिलो गाजर, एक मध्यम आकाराचा कांदा, वाटीभर मटारचे दाणे, एक-दिड इंच आल्याचा तुकडा, एक हिरवी मिरची, फोडणीसाठी तेल, जीरे, धण्याची पुड, हळद, गरम मसाला /किचन किंग मसाला, मीठ, कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

गाजराच्या गोल चकत्या /काचर्‍या करुन घ्याव्या. कांदा उभा चिरुन घ्यावा. तेल गरम झालं की त्यात जीरे आणि बारीक चिरलेलं आलं आणि बारिक चिरलेली मिरची घालावी. थोडं परतून त्यात कांदा घालावा. कांदा चांगला परतला की त्यात हळद घालून गाजराच्या काचर्‍या आणि मटार दाणे घालावे. नंतर त्यात २-२.५ चमचे धण्याची पूड, थोडा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा इतर आवडीचा मसाला घालावा. मीठ घालून झाकण ठेवून मंद आचेवर वाफेवर भाजी शिजवावी. वरून भरपूर कोथिंबीर घालून खावी.

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

भाजी वाढवण्यासाठी यात एखाद्या बटाट्याच्या काचर्‍या पण घालता येतात.
किचन किंग किंवा पावभाजी मसाल्याने भाजीची चव छान येते.

माझा एक बंगाली मित्र भाजीत मटार न घालता नुसत्या गाजराची धण्या-जीर्‍याची पुड घालून भाजी करायचा. तो कोणताही मसाला, तिखट किंवा मिरची घालायचा नाही. तशीही भाजी छान लागते फक्त जरा जास्त गुळचट लागते. तो सरसोच्या तेलात भाजी करायचा.

माहितीचा स्रोत: 
साबा
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करून पाहेन नक्की. माझ्या ऑफिसातली एक बंगाली मैत्रिण पण नुसत्या गाजराची भाजी आणते. त्या भाजीवर मी बेहद्द खूष आहे. पण बहुतेक त्यात तो पंचफोरम का काय म्हणतात तो मसाला असतो. आणि मोहरीच्या तेलाचा स्वादही वेगळा असतो.

छान रेसीपी. धन्यवाद अल्पना.
गाजर जरा अगोड असले की मग त्याचं काय करावं कळत नाही. सॅलड मध्ये ढकलण्यापेक्षा हे बरं पडेल Happy

स्वप्ना_राज

ओवा नाही मोहरी असते पांच फोडणात ! काही ठीकाणी रेडीमेड मिळतो

अन्यथा स्वता: वेगवेगळे पाच मसाले मिक्स करून वापरता येईल !

पंचफोरन/पंचफोडन घालून कोणतीही भाजी एकदम वेगळी होते. नॉर्थ इंडियन्स कडे विशेषतः काश्मीरी रेसिपींमधे हे वापरतात.
ही रेसिपी पण मस्त आहे. साधी पण चविष्ट होत असेल.

छान आम्ही हि करत असो गाजर मटार सब्जी . पण आम्ही अगदी सादा पद्धती नि करतो .मिरची ,( मोहरी , जिरे , मेथी दाने बडी सॊन्फ़, मंग्रीला ) पच्पोरन , हिंग ची फोडणी आणिक बारीक चिरले ले गाजर , मटार ,मीठ घालून बारीक गैस वर मऊ शिजून घेतो . अशी पण सुरेख वाटते मुख्य मंझे पोरे सुधा खातात .