Submitted by बागेश्री on 10 December, 2012 - 07:07
तू, 'तू'
मी, 'मी'
असे जगणे जगूया,
चल, एक नवी सुरूवात करूया!
कोण बरोबर, कोण चूक
कुणाला सुखाची, किती भूक?
अशा हिशोबांत रमणे सोडूया
चल, एक नवी सुरूवात करूया..!
कुणाचे योग्य, अयोग्य कोण?
कसे सुधारावेत दृष्टीकोन,
अर्थहीन चर्चांतून बाहेर पडूया
चल, एक नवी सुरूवात करूया....!
अपे़क्षा एकमेकांच्या अन कसूर कर्तव्यात
नाती सांभाळणे अन 'मने जपूयात',
ह्या पोकळ व्याखांतून बाहेर पडूया
चल, एक नवी सुरूवात करूया....!
माझे ऐकावे तू आणि मी तुझे
लादून एकमेकांना, मने मारायचे
ज्याला जसे हवे, तसे जगूया
चल, एक नवी सुरूवात करूया....!
आखलेले जिणे का हे, जेव्हा आपण भिन्न
फूलवू मनांना तोडून पारतंत्र्य खिन्न
नव्या उमेदीने हेच नाते फूलवूया
चल, एक नवी सुरूवात करूया.....!
तू, 'तू'- मी, 'मी'
असे जगणे जगूया,
चल, एक नवी सुरूवात करूया!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कविता आवडली...
कविता आवडली...
सुरेख!
सुरेख!
Pages