सल्ल्ला हवाय

Submitted by यक्ष on 10 December, 2012 - 06:52

प्रिय माय्बोलिकर

मी सध्या ४५ वयचा आहे. ( स्थापत्य अभियन्ता).

माझ्या मुलच्या उच्च शिक्शणसथि मि सद्या पर्देशि जावे का असा विचार मनात आहे़.

जेणेकरुन मि त्यला नन्तार तिथे बोलवु शकेल. हा विचार योग्य वाट्तो का?

Canada कि Australia काय योग्य रहिल?

मला तसा विदेशि रहण्याचा अनुभव आहे. ( नौक्रि निमित्त्त)

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी मधे कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया मधे आता इमिजिएट संधी आहेत का? म्हणुन तुम्ही हा विचार करताय?

२.तुमचा मुलगा काय शिकतोय? बी ई/डॉक्टर/इतर काही स्पेशलायझेशन वगैरे झाला आहे का? कुठल्या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचे आहे?

३.कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाच का? अमेरिका-इंग्लंड का नको? आणि भारतातही उत्तम उच्च शिक्षणाच्या संधी आहेत. का विदेशीच जायचे आहे?

४, तुम्ही एखाद्या देशातले हवामान पाहुन तिथे प्रवेश घेणार का तिथे शिक्षण कुठल्या प्रतीचे आहे ते पाहुन प्रवेश घेणार?

५. सगळ्यात महत्वाचे.. तुमचा मुलगा एकटा जायला सक्षम आहे का.. तसे असल्यास तुम्हाला जायची काय गरज आहे? त्याला एकट्याला जाता येणार नाही का?

जरा डीटेल्स दिलेत तर बरेच चांगले सल्ले मिळतील इथे.

धन्यवाद.

त्यांना स्वत: जाऊन तिथे सेट व्हायचय आणि मग मुलाला बोलावून घ्यायचंय. असं दिसतंय.

माझ्या नात्यातल्या एकानी (स्वत: सी. ए. ) असे केले आहे. मुलगा १२ वी झाल्यावर पुढील शिक्षणाच्या दृष्टीने ते ऑस्ट्रेलियाला गेले आणि मुलाला नंतर तिकडे नेले. आता सगळे कुटुम्ब एकत्र आहे.

>यक्ष प्रश्न असल्याने पास

धन्यवाद! खरच 'यक्ष प्रश्न' आहे. (इथे मराthi टाइप करण्याइत्के) (चुका माफ कराव्यात हि कळकळिचि विनन्ति). हळुहळु सुधारण्यचा प्रय्त्न करेनच!। हि माझि सुरुवात आहे.

>कॅनडा मधे मरणाची थंडी असते त्यापेक्षा ऑस्ट्रेलिया बरा.

एक्दम मान्य! पण मला शिक्षणाचा दर्जा महत्वाचा वाट्तो. त्या साथि काहि सहन करावे लागेलाच ! त्याचि तयरि आहे.

> ऑस्ट्रेलियात भरपूर डिस्क्रिमिनेशन चालतं तेव्हा विचार करा

जरूर! मान्य ! एक वेळेस थंडी चालेल पण डिस्क्रिमिनेशन नकोच! पण तिथे इतकि वाइट परिस्थिति खरच आहे?

> १.तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी मधे कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया मधे आता इमिजिएट संधी आहेत का? म्हणुन तुम्ही हा विचार करताय?

स्थापत्य अभियांत्रिकी मधे इमिजिएट संधी असाव्यात असे मला वट्ते. शोध सुरु केला आहे. साधारण वर्श लागेल असे ग्रुहित धरतो.

>तुमचा मुलगा काय शिकतोय? बी ई/डॉक्टर/इतर काही स्पेशलायझेशन वगैरे झाला आहे का? कुठल्या क्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचे आहे?

सध्या नववित आहे. अकरावि व बारावि भारतातच करायाचि आहे. सध्या त्याला automobile क्षेत्र आवड्ते.
नन्तर बघु.! उपलब्ध सन्धि नुसार आवड कदाचित बदलेल.!

>कॅनडा किंवा ऑस्ट्रेलियाच का? अमेरिका-इंग्लंड का नको? आणि भारतातही उत्तम उच्च शिक्षणाच्या संधी आहेत. का विदेशीच जायचे आहे?

उलट अमेरिका-इंग्लंड आवडेल. पण तिथे जाण्याचे नियम ज्यास्त कडक आहेत न? शिवाय आता शक्य होइल का?

> तुम्ही एखाद्या देशातले हवामान पाहुन तिथे प्रवेश घेणार का तिथे शिक्षण कुठल्या प्रतीचे आहे ते पाहुन प्रवेश घेणार?

शिक्षणाचि प्रत / दर्जा सर्वात महत्त्वाचा !

>सगळ्यात महत्वाचे.. तुमचा मुलगा एकटा जायला सक्षम आहे का.. तसे असल्यास तुम्हाला जायची काय गरज आहे? त्याला एकट्याला जाता येणार नाही

सध्या लहान आहे. तो मोठा झाल्यावर जाउ शकेल. पण मिसूधदा सन्धि घ्यावि असे वाट्ते. कदाचित मलाहि नविन काहि शिकता येइल.

> त्यांना स्वत: जाऊन तिथे सेट व्हायचय आणि मग मुलाला बोलावून घ्यायचंय. असं दिसतंय.

अगदि बरोबर ! तोच विचार मनात आहे.! पण आयुष्याच्या अर्ध्या प्रवासानन्तर असे विचारावे कि नाहि अशि
घालमेल चालु होति. पण म्हट्ले बघुच

मुलगा व सौ. नन्तर येतिल असे प्रयोजन.

>कुटुंबात तुम्ही आणि तुमचा मुलगा एवढेच आहात का?

नाहि. माझि 'प्रिय' मालकिण पण आहे !

माझ्या सर्व नविन स्नेहि जनान्ना मनःपुर्वक धन्यवाद! (अरे हा अनुस्वार कसा देतात बुवा? अगदि कुन्कु नसल्यासारखेच वाट्ते.)

ऑस्ट्रेलियात भरपूर डिस्क्रिमिनेशन चालतं तेव्हा विचार करा.>>>>>> हा तुझा अनुभव आहे का? की प्रसारमाध्यमांवरुन बनवलेले मत?

http://www.immi.gov.au/skilled/general-skilled-migration/ या साईटवर अधिकृत माहिती मिळेल. तुम्ही ऑस्ट्रेलियाचा विचार केलात तर कुठलाही सल्ला इथे क्रॉस चेक करा!

ऑस्ट्रेलियातील डिस्क्रिमिनेशन कायदे अतिशय कडक आहेत. त्यांची अंमलबजावणीही काटेकोरपणे होते.
याबद्दल अधिक माहीती http://humanrights.gov.au/info_for_employers/law/index.html#summary इथे मिळेल.

यक्ष
इथे सल्ला देण्याएवढे माझे वय्/अनुभव नाही पण एक विचारावेसे वाटते.
इथुन असे परदेशात जाणे एवढे सोपे असते का? की तुम्हाला संधी आहेत म्हणुन तुम्ही असा विचार करित आहात?

मी australia मधे राहिलेलो आहे. अजिबात problem नाही. Melbourne / sydney चे शिक्षण उच्च दर्जाचे आहे. पण merit वर प्रवेश घेतला तर. पैसे भरुन नुस्त्या certificate साठी admission घ्यायची नसावी असे मी assume करतो.
Melbourne ला तर native Australian कमी आणि chinese, Japanese, Malasian आणि Indian, pakistanee आहेत. Racism अजिबात नाही. Indian आणि पाकीस्तनी, बांगलादेशी लोकांनी भारतात वागतो तसे वागु नये येव्हडीच अपेक्षा असते.

>>ऑस्ट्रेलियात भरपूर डिस्क्रिमिनेशन चालतं तेव्हा विचार करा.>>>>>> हा तुझा अनुभव आहे का? की प्रसारमाध्यमांवरुन बनवलेले मत?>>> माझा स्वतःचा अनुभव नाही पण ऑस्ट्रेलियातल्या मित्र मैत्रिणींकडून ऐकलेलं आहे. प्रसारमाध्यमं काय म्हणतात माहित नाही.

यक्ष, मी तूम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारतोय. या दोन देशांची सिटिझनशिप मिळवून देतो, अशी मेल आली आहे का तूम्हाला ? तर थोडी काळजी घ्या. तूम्हाला हा निर्णय घ्यायला थोडा ऊशीर झाला आहे. त्या संस्था सांगतात तेवढ्या कालावधीत ते होईलच असे नाही. तसेच त्या संस्था ज्या मदतीचे आश्वासन देतात, तीदेखील मिळेलच असे नाही.
तूम्ही तिथे जाऊन काही काळ, नोकरीशिवाय काढावा लागेल. तिथले खर्च चालूच राहतील. मनाजोगती नोकरी मिळाल्यावर त्यानंतर मूलाच्या शिक्षणासाठी बचत करुन त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात थोडा वेळ जाईल. त्यापेक्षा जर आहात तिथेच राहून हे आर्थिक नियोजन केलेत तर त्याला स्वतःच्या क्षमतेवर हव्या त्या देशात शिक्षणासाठी पाठवता येईल.
त्यासाठी हवी तर त्याची तयारी आतापासून करायला सुरवात करा. तुम्ही जिथे स्थायिक होणार आहात, तिथेच त्याला शिक्षण घ्यावे लागणार नाही. त्याचा कल / आवड वगैरे बघून. त्या क्षेत्रातले शिक्षण जिथे मिळेल ( तो भारतही असू शकतो ) तिथे त्याला पाठवता येईल.

शिक्षणाच्या काळात मूलांना वेगळे ठेवण्यात काय गैर आहे ? अनेक मुले तसे राहून शिक्षण घेतातच.

वत्सलाजी

महितिबद्दल धन्यवाद!

मि मागच्या एप्रिल मध्ये क्विन्सलॅन्ड प्रान्तात सुमारे ४ दिवस होतो. फक्त एक्दाच असा 'भास' झाला कि जवळुन जाण्यार्या एका ऑस्ट्रेलियन ग्रुप ने काहि 'comments' पास केले. अर्थात एवढ्यावरुन काहि मत बनवणे योग्य नाहि.

पण एक विचारावेसे वाट्ते कि तिथे रुल्स एवढे 'कडक' असण्याचे काहि दुसरे कारण तर नाहि न?

माधविजी

परदेशात जाणे निश्चितच कठिण आहे. पण सन्धि मिळेल असे वाट्ते. बघुयात !

सुशान्तजी

आपण हा अनुस्वार कसा देता? क्रुपयामार्गदर्शन कराल का? असो. मि 'शासकिय सन्स्थेतुन झालो आहे. तसे
'Exective M.B.A.' पण केले आहे, पण त्याचा कितपत फायदा होइल ह्याबद्दल साशन्क आहे.

प्रसादजी

आपण 'मेरिट' ची गोष्ट काढलित म्ह्णुन बोलावेसे वाट्ले की त्याच शोधात आता 'बाहेर' पडावे असे वाट्ते. इथे 'आय. आय.टी.' चा ही 'बाजार' होइल की काय अशी शन्का वाट्ते. एकुणच 'गर्दी' वाढतच चाललिए.

एखादा चान्ग्ला 'agent' / 'agency' सुचवाल?

सर्वान्ना धन्यवाद!

सुशान्तजी...
येव्हडा मान आज पर्यंत कोणीच दिला नाही....धन्यवाद
अनुस्वार देण्यासाठी शिफ्ट + m
जिथुन तुम्ही ईंजिनियर झालात तिथुन किंवा त्याच विद्यापीठातुन ईतर चांगल्या कॉलेजमधुन जर तुमच्या मुलान ईंजिनियरींग केल तर ?
माझ वैयक्तिक मत आहे की ईंजिनियरींग कुणी शिकऊन नाही जमत स्वतःच शिकाव लागत समजुन घ्याव लागत भले ते कोणत पण कॉलेज असु द्या की विद्यापीठ असु द्या.

माझ वैयक्तिक मत आहे की ईंजिनियरींग कुणी शिकऊन नाही जमत स्वतःच शिकाव लागत समजुन घ्याव लागत भले ते कोणत पण कॉलेज असु द्या की विद्यापीठ असु द्या >> खरच आहे. यावर बोलण्यासारख / लिहिण्यासारख खुप आहे .

१ ते १-१/२ महिन्याच्या काळात निव्वळ पाठांतर करुन बी.ई. ची डीग्री मिळवणे आणि प्रोग्रामिंग / ट्रबलशुटींग / इन्स्टालिंग / बिझनेस / येणे या दोन्ही पुर्णपणॅ वेगळ्या गोष्टी आहेत. (संगणक अभियांत्रिकी बाबतीत).

प्रसिद्ध कॉलेज / संस्था असणे जरुर फायद्याचे ठरते नोकरी मिळताना - पण जर तुमच्याकडे खर ज्ञान असेल - खणखणीत तर तुमच्या ज्ञानाच्या जोरावर निव्वळ नोकरीपेक्षाही जास्त काही मिळवता येते. (स्वानुभव) आणि असे अस्सल (core) ज्ञान असताना प्रसिद्ध / भारी कॉलेज / संस्था / देशा शिवाय काहीही अडत नाही.

एकदा एका ठिकाणी एका तथाकथीत भारी / लै भारी / कॉलेजातुन फर्स्ट क्लास बी.ई. केलेल्या आणि आत्ता एक नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ पदावर कामाल असलेल्या अकलेच्या कांद्याने मला कंप्युटरच्या मेमरी कार्ड रिडर मधे मोबाइलचे सिम कार्ड टाकुनच दे अस सांगितल होत. का? Afterall it is a "Card Reader" you know? And isnt a Sim Card a Card? The hell with your first class and the hell with your degree.

भारतातल्या अ-प्रसिद्दह कॉलेजेसना कमी लेखण्याची चुक करु नका. शेवटी हे विद्यार्थ्यावर अवलंबुन आहे किती करायचे आणी काय करायचे ते.

TeachAman_detail400px.jpg

१. अनुस्वार कसा देता?

हा माझ्या फिल्डमधला प्रश्न आहे. Wink M कॅपिटल टाईप केला की अनुस्वार येतो. जिथे आपण संदेश टाईप करता, त्या बॉक्सच्या डोक्यावर एक प्रश्नचिन्ह आहे "?" निळ्या रंगाचे, सफरचंदाच्या बाजूला. दिसले? त्यावर क्लिक करा.अधिक मदत मिळेल.

२. दिनेशदांच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही. तुम्हाला अशी मेल आलेली आहे का? ते स्कॅम असण्याची शक्यता जास्त आहे.

तूम्ही तिथे जाऊन काही काळ, नोकरीशिवाय काढावा लागेल. तिथले खर्च चालूच राहतील. मनाजोगती नोकरी मिळाल्यावर त्यानंतर मूलाच्या शिक्षणासाठी बचत करुन त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात थोडा वेळ जाईल. त्यापेक्षा जर आहात तिथेच राहून हे आर्थिक नियोजन केलेत तर त्याला स्वतःच्या क्षमतेवर हव्या त्या देशात शिक्षणासाठी पाठवता येईल.
त्यासाठी हवी तर त्याची तयारी आतापासून करायला सुरवात करा. तुम्ही जिथे स्थायिक होणार आहात, तिथेच त्याला शिक्षण घ्यावे लागणार नाही. त्याचा कल / आवड वगैरे बघून. त्या क्षेत्रातले शिक्षण जिथे मिळेल ( तो भारतही असू शकतो ) तिथे त्याला पाठवता येईल.

शिक्षणाच्या काळात मूलांना वेगळे ठेवण्यात काय गैर आहे ? अनेक मुले तसे राहून शिक्षण घेतातच. >>>>> +१००००००
कॅनडा ची माहिति हवि असेल तर थोडि देवु शकेल, पण इथे इमिग्रेट होवुन आला आणि कोणि नातेवाईक /मित्र असले तर खूप मदत होईल, कॅनेडिअन अनुभव नसेल तर वेळ लागेल नोकरि साठि आणि रहायचा,खायचा खर्च सुद्धा भरपुर येतो. बरेच दिवस लोक मिळेल ते काम करतात.बर्‍याच वेळा एन्ट्रि लेवलचा जॉब सुद्धा करतात.
थंडिला घाबरायचि गरज नाहि, बसेस पासुन, मॉल, ग्रोसरि स्टोअर, गाड्या,घर्,ट्रेन सगळे हिटेड असते.
पण दिनेशदा म्हणतात ते मला पटते. मी बरेच पालक पाहिले आहेत जे १२ वि नंतर सुद्धा मुलांना परदेशि पाठवतात. फक्त खर्च जास्त येतो. त्याची तयारि असेल तर तुम्च्या मुलाला कॅनडा /ऑस्ट्रेलिया च नाहि तर अमेरिकेत अणि इंग्लंड मधे सुद्धा जाता येईल.१२ नंतर बरिच मुले होस्टेल वर जातातच ना शिकायला. तसेच परदेशि सुद्धा जाऊ शकतात ना? मुलांना चांगले एक्स्पोजर मिळते शिकायला बाहेर पडले कि मला तरि असे वाटते.

दिनेशदा व प्रियाजी

मला अशी कुठ्लीही मेल आली नाही. हे माझेच विचारचक्र आहे. आपुलकीने केलेल्या सूच्नेबद्दल धन्यवाद!

मी तसे कामा निमित्त यु.एस., आफ्रिका, इंग्लंड, फ्रांस, तुर्की, थायलंड, फिलिप्पाइंस देश बघितले आहेत. पण सर्व छोटे टुर्स होते.

परदेशी जाऊन काही काळ, नोकरीशिवाय काढावा लागेल ह्याबद्दल मानसिक तयारी आहे. तिथले खर्च चालूच राहतील हे ओघने आलेच.

मला पण संधी मिळाल्यास प्रयत्न करावेसें वाट्तात!

प्रियाजी कॅनडा ची माहिति हवि आहेच तरी क्रुपया द्यावी. कॅनेडिअन अनुभव नाही. त्यामुळे थांबायची तयारी ही आलिच. तरी साधारणतः किती - त्याची कल्पना आल्यास बरें! (हुश्श्य ! अनुस्वार जमला एक्दाचा!)

अभिजीतजी व इब्लिस्जी धन्यवाद!

यक्ष,
ऑस्ट्रेलिया हा एकेकाळी वर्णद्वेषी देश होता. १९७३ मध्ये त्या विरुद्ध
कायदा झाला. ऑस्ट्रेलिया सर्वांना खुला झाला. त्या नंतर निरनिराळ्या
प्रसंगानुरुप कायद्यात बदल होत राहीला. कायदे कडक अचानक झाले नाहीत होत
गेले. मी कायद्यांचा दुवा दिला कारण येथे डिस्क्रिमिनेशन फार गांभीर्याने घेतले
जाते हे अधोरेखित करायचे होते. मी कायदेतज्ञ नाही त्यामुळे एव्हढेच सांगु शकते.
मला वाटते की इतरत्रही म्हणजे अमेरिका, कॅनडा किंवा न्युझिलंड येथले
कायदे कडकच आहेत/असावेत.

माझ्या इथल्या दहा वर्षांच्या वास्तव्यात तर मला भारतीयच सर्वात वर्णद्वेषी आढळले आहेत. Wink
'आडनांव काय म्हणालात?' Wink असा प्रश्न बर्‍याचदा आलाय! असो, अनुभव आपला आपला!

तुमच्या निर्णयप्रक्रियेसाठी आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हांला शुभेच्छा!

कॅनडात राहायचे एक - दोन फायदे चांगले आहेत
- वैद्यकीय उपचार मौफत (पण Income tax जास्त आहे)
- कॅनडीयन नागरिकत्व मिळालं की USA VISA सहज मिळतो....कॅनडात राहून US मध्ये काम करणारे बरेच आहेत.

माझ्या मुलच्या उच्च शिक्शणसथि मि सद्या पर्देशि जावे का असा विचार मनात आहे़.
----- उच्च शिक्षण मुलाला घ्यायचे आहे का तुम्हाला ?

जेणेकरुन मि त्यला नन्तार तिथे बोलवु शकेल. हा विचार योग्य वाट्तो का?
------ तुम्ही भारतात राहुनही त्याला परदेशी धाडू शकता...

Canada कि Australia काय योग्य रहिल?
------- निव्वळ शिक्षणासाठी भारत खरोखरच चांगला देश आहे. माझे सर्व शिक्षण भारतात झाले आहे. मागची ७+ वर्षे केवळ कॅनडांत आहे. या काळांत शैक्षणिक क्षेत्रात काम कारत आहे. प्रत्येक वेळी मला भारतातली शिक्षण पद्धत चांगलीच वाटते. त्यामुळे निव्वळ शिक्षणासाठी परदेशी पाठवायची अजिबातच अवशक्ता नाही आहे.

लोकसंख्येमुळे भारतात स्पर्धा खुप आहे, तिव्र आहे म्हणुन ऑस्ट्रेलिया, कॅनडा असे कारण असेल तर ते योग्य वाटेल. पण निव्वळ शिक्षणासाठी भारतातल्या पेक्षा कॅनडा आणि ऑसट्रेलिया चांगले असा गैरसमज नको.

वत्सलजी

तुमचे म्हणणे पटले. तसा वर्णद्वेष हा अनादि व अनंत मुद्दा आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!

विसरभोळया मित्रा

माहिती बद्दल धन्यवाद! वैद्यकीय उपचार मोफत ही वयोमान ग्रुहित धरता चांगलीच गोष्ट म्हणावयाची!

उदयजी

आपला सल्ला मोलाचा वाट्तो. विषेषतः आपण शैक्षणिक क्षेत्रात काम कारत आहात म्हणून!
"...प्रत्येक वेळी मला भारतातली शिक्षण पद्धत चांगलीच वाटते.." ह्याचा आणखी खुलासा करु शकाल का?

पेरुजी

आपली मेल मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद!

आणी हो ! एवढे सगळे स्नेही बघून मला खरेंच खूप छान वाट्ते!

बापरे मुलांसाठी किती काय काय करतात नै लोकं.

जस काय भारतात शिक्षण मिळतच नाही , फक्त परदेशातच मिळते, स्वदेश सोडून , फक्त चांगला शिकून त्याने पुढे फक्त पैसाच मिळवायचा काय तो अट्टाहास . बर नुस्त त्याला पाठवलं तर ते हि नाही , स्वत जायचं , मग त्याला बोलवायचं .
अरेरे .. पाखरांना त्यांच्या पंखांनी उडू द्या कि ....
असेल त्याच्या दम जाईल स्वतः .
स्वताची मायभूमी सोडून केवळ शिक्षण आणि पैसे कमावण्यासाठी लोकांचा असा अट्टाहास पाहून साला शरम वाटते

<<स्वताची मायभूमी सोडून केवळ शिक्षण आणि पैसे कमावण्यासाठी लोकांचा असा अट्टाहास पाहून साला शरम वाटते>>

अहो असंच काही नसतं! प्रत्येक पालक आपल्या मुला/मुलीला आयुष्यात जे जे उत्तम ते मिळावे म्हणुन प्रयत्न करत असतो. पुढे त्यांचे नशीब. एखाद्या पालकाला वाटले, आपण काहीतरी वेगळे करावे तर काय हरकत आहे?
दुसर्‍यांचे निर्णय आपण कसे काय ज़ज करु शकतो?

Automobile मधे चांगलं शिक्षण Germany लाही मिळेल. भारतात १० + २ + ४ (ईंजिनियरिंग) वगैरे डिग्री असेल तर विद्यार्थी म्हणून तिथल्या महाविद्यालयात मुलाला जाता येईल.

स्वताची मायभूमी सोडून केवळ शिक्षण आणि पैसे कमावण्यासाठी लोकांचा असा अट्टाहास पाहून साला शरम वाटते <<< वाटू दे. आपल्या सर्वांचे पूर्वजही हेच करत आलेत. आणि वंशजही हेच करणार आहेत. त्यामुळे 'शरमसे पानी पानी' व्हायचं असेल तर व्हा... Happy (याबद्दल बरंच काही लिहून झालंय..)

बन्याजी

तुमची मते बरोबर आहेत पण मझ्या मते अंशतः ! का ते सांगतो.

"जस काय भारतात शिक्षण मिळतच नाही".

मी भारतात शिकलो...वाढलो..पण परदेशी ही थोडेफार फिरलो..! एक जाणिव आजकाल प्रकर्षाने जाणवते ती भारतीय शिक्षणाची आजकाल होणारी अधोगती.!

असो माझे म्हणणे हे उच्च शिक्षणासाठी आहे.

"...पैसाच मिळवायचा काय तो अट्टाहास.."

नाही असे अजिबात नाही! देव वा दैव काहीही म्हणा, त्यांच्या क्रुपेने मला उर्वरित आयुष्य 'बरें' काढता येइल असे आहे. पण अजून काही 'चांगले' करावेसे वाट्ते.. 'पण बाहेरच कां'...तर ह्याचे उत्तर अश्विनीजींनी दिले त्याप्रमाणे.

"...बर नुस्त त्याला पाठवलं तर ते हि नाही , स्वत जायचं , मग त्याला बोलवायचं ..." पिलांना उडणं शिकवण्यासाठी 'मोकळं व वेगळं.. आकाश' नको शोधायला? हं ..! हा मात्र मझा अट्टाहास ! बाकी पुढ्चे पुढे..!!

".........असेल त्याच्या दम जाईल स्वतः ...." ??? !! मान्य !

"....स्वताची मायभूमी सोडून केवळ शिक्षण आणि पैसे कमावण्यासाठी लोकांचा असा अट्टाहास पाहून साला शरम वाटते..."

मलाही 'शिक्षण सम्राट' व 'राजकारण्यांच्या' राज्यात असा विचार करावा लागतो ह्याबद्दल़ 'खंत' वाट्ते! मायभूमी तूमची जेवढी आहे...तेवढी माझीही आहे..आणि ....! असो...हा 'संवाद' आहे 'वाद' नाही. आणी आपल्या मतांबद्दल धन्यवाद!

अश्विनीजी आणी परदेसाईजींन्ना धन्यवाद!