खिद्रापूर - कोपेश्वर मंदिर

Submitted by रंगासेठ on 6 December, 2012 - 11:21

कोल्हापूर जिल्ह्यात 'खिद्रापूर' या ठिकाणाबद्दल ऐकले होते. ऐतिहासिक लेणी आणि महादेवाचे मंदिर 'श्री कोपेश्वर' असलेले हे ठिकाण पर्यटन विभागाच्या नकाशावर नुकतेच आले. अगदी लहानपणापासून जायचे जायचे असं ठरवत या वर्षी मुहूर्त आला. Happy

खिद्रापूरला जाण्यासाठी एक रस्ता कोल्हापूरमधून जातो, तो मला माहिती नाही Happy आम्ही नरसोबाची वाडी-कुरुंदवाड-सैनिक टाकळी मार्गे गेलो होतो. वाडीपासून ३२ कि.मी. आहे. नुकतेच MTDC ने दिशाफलक लावल्यामुळे रस्ता सापडतो. गावात गेल्यावर हे मंदिर असे लगेच दिसत नाही. अनोळखी माणसे २-३ चकरा मारल्यावरच सरळ स्थानिकांना विचारण्याचा सोपा मार्ग अवलंबवतात. ग्रामपंचायतीच्या इमारतीजवळच हे मंदिर आहे आणि कसलीही भव्यता अथवा उठून दिसेल असे काही नसल्यामुळे प्रवेशदारापाशी निराशा झाली. पण एकदा का आत प्रवेश केला की मग किती वेळ आत घालवला जातो हे कळतच नाही. अतिशय सुंदर आणि मोहक कलाकुसर असलेले हे मंदिर भग्नावस्थेत आहे Sad

असे मानण्यात येते की इ.स. ११०९-११७८ दरम्यान गांधारादित्य. विक्रमादित्य व भोज-२ या शिलाहार राजांच्या कारकिर्दित हे मंदिर बांधण्यात आले. शैव आणि वैष्णव या दोघांनी मानलेल्या मोजक्या ठिकाणांपैकी एक असे हे स्थान. 'कोपेश्वर' या नावामागची पौराणिक कथा रंजक आहे. शिवाने सती बरोबर विवाह केला हे तिच्या पित्याला, दक्ष राजाला आवडले नाही आणि म्हणून एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला. हे सहन न झाल्याने सतीने यज्ञात उडी मारून आत्मदहन केले, तेव्हा क्रोधित होऊन शंकराने, वीरभद्रास दक्षाचे डोके उडवण्यास सांगितले. तेव्हा त्याचा राग शांत करण्यासाठी महादेवास या ठिकाणी आणले गेले. 'कोप्'+'इश्वर' अर्थात महादेव Happy

भग्नावस्थेत असले तरी मंदिर बर्‍यापैकी टिकून आहे, हत्ती, नक्षीदार खांब व रामायण, महाभारतातील प्रसंग, बारा राशींची चिन्हे, निसर्ग यांच्या कलाकुसरतेने अक्षरशः मढले आहे. प्रवेशद्वारातच वर्तुळाकार मोकळे छत आहे आणि त्याला आधाराला असलेल्या खांबांवर देवदेवतांच्या मूर्ती आहेत. नंतर सभामंडप, गाभारा लागतो जो अंधुक आहे आणि शिवलिंगाचे दर्शन होइल इतपतच प्रकाशमय आहे.

असं म्हणतात की मोगलांच्या नासधुसीमुळे मंदिराला अशी अवस्था आली आहे. ही अवस्था बघून वाईट वाटतं तसेच पर्यटन विभागाच्या कारभाराचा राग येतो.

काही प्रचि Happy

प्रचि १

_MG_5147

प्रचि २

_MG_5149

प्रचि ३

Khidrapur

प्रचि ४

_MG_5163

प्रचि ५

_MG_5154

प्रचि ६

_MG_5171

प्रचि ७

_MG_5263

प्रचि ८

_MG_5244

प्रचि ९

_MG_5231

प्रचि १०

_MG_5257

प्रचि ११

_MG_5219

प्रचि १२

_MG_5229

प्रचि १३

_MG_5223

प्रचि १४

_MG_5222

प्रचि १५

_MG_5261

प्रचि १६

_MG_5226

प्रचि १७

_MG_5249

प्रचि १८

_MG_5212

प्रचि १९

_MG_5207

प्रचि २०

_MG_5213

प्रचि २१

_MG_5217

प्रचि २२

_MG_5176

प्रचि २३

_MG_5179

प्रचि २४

_MG_5159

प्रचि २५

_MG_5210

तळटीप : वॉटरमार्क कसेही पडलेत, तेव्हढं सांभाळून घ्या ही विनंती Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy , हो PostProcessing मुळे काही ठिकाणी जास्त बदल (Drastic change) दिसतोय. मुळात भर दुपारी उन्हात फोटो काढल्यामुळेपण प्रचिंमध्ये भडकपणा दिसत असेल.

रंगासेठ मस्त फोटोग्राफी. मंदिराचा प्रश्नच नाही, अतीशय कोरीव व भव्य बांधकाम.

बाय द वे, या वेळेसच्या म्हणजे २०१२ सालच्या ग्रहसंकेत या दिवाळी अंकात कर्नाटक आणी बाकी महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांविषयी सुंदर माहिती आलीय्.उदा. हंपीचे विजयविठ्ठल मंदिर तसेच मुंबई चेन्नई मार्गावरील अणूमंत्रालय येथील गांधाल पंचमुखी मंदिर म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिर ( अहिरावण महीरावणाचा काळ ).

येडुर ( महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचे) कोपेश्वर मंदिर. दर फाल्गुनी पौर्णिमेस उत्सव होतो.

अणूमंत्रालय येथील गांधाल पंचमुखी मंदिर म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिर >>> राघवेंद्र स्वामींच्या मंत्रालयम इथले मंदिर का? त्याचे फोटो आहेत माझ्याकडे. एक दोन दिवसांत मायबोलीवर टाकेन.

होय, मूर्ती व नक्षीकाम खरच सुंदर आहे अजूनही.
नंदिनी, मंत्रालयम बद्दल खूप ऐकलय, फोटोंची वाट पाहतोय Happy

We met Mr Joshi, native of Khidrapur and scholar of archeology. He spared tremendous information about every sclupture in detail. Contact him on 09421243728 for guidance request. I am uploading one photograph guided by Mr Joshi. This photograph is taken in Swarg gruh (entrance of the temple) looking towards sky.Khdrapur 020.jpg

फोटो फारच भारी. मंदिरांवरचे कोरीवकाम अप्रतिम आहे.

पुण्याहून स्वतःच्या वाहनाने इथे जायला किती वेळ लागेल साधारणतः?

पुन्हा पाहिले फोटो, मस्तच Happy

खिद्रापूर, भुलेश्वर, अकोले हि मंदिरे विशलिस्टवर आहेत. Happy पाहु कधी योग येतो ते.

धन्यवाद लोक्स Happy जिप्सी उन्हाळ्यात जाऊ नकोस, जुलै-डिसेंबर एकदम मस्त कालावधी. कोल्हापूर्-पन्हाळा-जोतिबा- नरसोबाची वाडी-खिद्रापूर अशी ट्रीप एकदम मस्त होईल.

दगड कोरून त्यातून निर्माण करणे म्हणजे खरच अप्रतिम आहे हे आणि निर्माण करणाऱ्याबद्दल काय बोलणार

श्रीनरसोबावाडीच्या एवढे जवळ जाऊनही खिद्रापूरला जाता आले नाही.:अरेरे:

वाडीला जातांना उजव्या हातालाच मोठा बोर्ड होता खिद्रापूरचा. परत योग आला की नक्की जाणारच्.:स्मित:

बाय द वे कोल्हापूरकडे जातांना कर्‍हाडच्या पुढे पेठ नाका विचारावा, तिथुन पूलावरुनच डावीकडे वळुन सांगलीकडे सरळ जावे. बरेच पुढे गेल्यावर ( बहुतेक जयसिंगपूरच्या जवळ ) उजव्या हाताला हा खिद्रापूरचा बोर्ड आहे.

Pages