तिसर्‍यांची कोशिंबीर

Submitted by शैलजा on 6 December, 2012 - 04:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- २ वाट्या तिसर्‍यांची साफ केलेली मासटं. (तिसर्‍यांच्या शिंपल्यांच्या आतमधे जो खाण्याचा भाग असतो, त्याला मासटं म्हणतात.)
- १ छोटा कांदा - बारीक चिरुन
- १ वाटी खवलेले खोबरे
- २ लसूण पाकळ्या
- २ ओल्या मिरच्या
- २ टेस्पू खोबरेल तेल
- मसाला - ४ मिर्‍या, अर्धा चमचा धणे, १ चमचा चिंचेचा घट्ट कोळ, ३-४ सुक्या मिरच्या, पाव चमचा हळद.
- चवीप्रमाणे मीठ

क्रमवार पाककृती: 

१. तिसर्‍या स्वच्छ करुन आतील मासटं काढून घ्यावीत.
२. कांदा बारीक चिरुन घ्यावा.
३. वर दिलेला मसाला थोडे पाणी घालून खसखशीत वाटून घ्यावा. खूप पाणी घालायचे नाही.
४. गॅसवर लंगडी ठेवून त्यात खोबरेल तेल घालून, गरम झाल्यावर त्यात चिरलेल्या ओल्या मिरच्या व कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावे.
५. कांदा व्यवस्थित शिजल्यावर त्यावर मासटं व वाटण घालून, किंचित पाणी घालून सगळे एकजीव करावे. खूप पाणी घालायचे नाही, सुकेच ठेवायचे आहे. ह्यासाठी लंगडीवर झाकणी ठेवून त्यात पाणी घालावे व मंद विस्तवावर ५ ते ७ मिनिटे शिजवावे.
६. चवीनुसार मीठ घालावे.
७. पाच ते सात मिनिटांत मासटं शिजतात.

गॅसवरुन उतरल्यावर सजावटीसाठी वरुन चिरलेली कोथिंबीर पेरता येईल.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

तिसर्‍या मूळच्याच खारट असतात, त्यामुळे चव पाहून मीठ बेताने घालावे.

तिसर्‍या साफ करताना एकतर मासटं ठेवून दोन्ही शिंपल्या टाकून देता येतात, वा एक शिंपली मासट्यासकट ठेवता येते.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
ही कोशींबीर पद्धत गोव्याची खासियत आहे का?
मागे हायवे गोमांतकमध्ये पहिल्यांदा नाव वाचले.

स्वाती, थोड्याफार फरकाने( मसाला) सगळीकडे बनते.
इन्ना, कधीही ये Happy
रिया, गूगल कर तिसर्‍या असं.
नंदिनी, रविवारी फोटो टाकते नक्की.
साधना Happy

प्रि, तु चालु पड या धाग्यावरुन. तुझ्यासाठी नाहीच्चे. Happy कारण नंतर काय आहे कळलं कि किंकाळ्या मारायला लागतेस. Wink

तिसर्‍या साफ करताना एकतर मासटं ठेवून दोन्ही शिंपल्या टाकून देता येतात, वा एक शिंपली मासट्यासकट ठेवता येते.>> तिसर्‍या साफ कशा करतात.?

अवल, ये नक्की Happy
डॅफो, निकाल कळव Wink
शोनू, तुला चायनाटाऊनला खुबे ( काळ्या रंगाच्या तिसर्‍या) मिळतील! अधिक चविष्ट!

पाटील, एकतर कुकरमधे ठेवून एक १० एक मिनिटे उकडल्यात की शिंपल्यांची तोंडे मोकळी होतील, मग त्यातून मासटं काढून घ्यायची आणि शिंपल्या टाकून द्यायच्या.
दोन शिंपल्यांच्या मधे जी चीर असते, ती विळीवर धरुन, चीर उघडूनही साफ करता येतात, पण त्याला सवय लागते. Happy

इब्लिसभौ Happy

सगळ्यांना थ्यांक्यू!! रविवारी तिसर्‍या मिळाल्या तर बनवून फोटो टाकते. Happy

पहिल्यांदा नाही, अकदा आजीकडून शिकलो तेव्हा आणि आता ४ ५ वर्षांनंतर. ठाण्याला मासेमार्केटात सकाळी ६ ते ७ फक्त खेकडे, तिसर्‍या, लॉब्स्टर मंडळीच मिळतात, बाकी मंडळी त्यानंतर.

Pages