माझी 'उलट-चित्रकारी'

Submitted by निंबुडा on 4 December, 2012 - 01:01

राजसच्या वेळी दिवस राहिले असताना मनशक्ती (लोणावळा) केंद्र आयोजित एकदिवसीय गर्भसंस्कार शिबिराला आम्ही उभयतांनी हजेरी लावली होती. तेव्हा होऊ घातलेल्या माता-पित्यांनी करावयाचे आचार-विचार तसेच गर्भावतीचा आहार-विहार इ. बद्दल समुपदेशन, माहितीपर व्याख्यान इ. दिले गेले. त्यात गर्भवतीने अधून - मधून एक धैर्य-प्रतीक चित्र काढावे असे सांगितले गेले. त्यांनी दिलेल्या एका माहितीपर पुस्तकात काही राष्ट्रीय संत, थोर पुरुष इ. ची चित्रे दिली होती. आणि ती चित्रे नेहमी काढतो तशी काढायची नव्हती. तर चित्र उलटे (म्हणजे खालची बाजू वर व वरची बाजू खाली. उपडे नव्हे!) ठेवायचे. आणि आता ते जसे दिसते तसे काढायचे. त्यामुळे म्हणे गर्भातल्या बाळाच्या उजव्या मेंदूचा (क्रीएटिव्ह गोष्टी करण्यासाठी मेंदूचा हा भाग कामी येतो असे व्याख्यानात सांगितले.) विकास होण्यास मदत होते.

संपूर्ण गर्भारपणात फक्त ६ चित्रे काढली. ती खाली देत आहेत. मला स्वतःला शाळेत असताना चित्रकला ह्या विषयाचा अत्यंत तिटकारा होता. Sad बाकी विषयांचे गुण कायम चांगले मिळत पण चित्रकलेत अगदी काठावर पास होत असे मी! त्यामुळे सरासरी गुणसंख्या खाली आणणारा विषय हे चित्र माझ्या मनात ठसले होते. त्यामुळे मी अशी ६ चित्रे काढली हे त्या चित्रांचेच नशीब म्हणावे लागेल Proud

घरात असलेल्या अध्यात्मिक पुस्तकांवरील काही चित्रे आवडली होती. त्यामुळे मनशक्ती कडून मिळालेल्या चित्रांमधील सर्वच काढली नाहीत.

प्रयत्न कसा आहे ते जरूर सांगा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला अजूनही उलट म्हणजे काय कळ्ले नाही.
>>>
अगं मी एका प्रतिसादात एक्स्प्लेन केलंय त्यावरूनही समजलं नाही का? Uhoh

आता बघ समजतंय का? हे चित्र असं काढलंय!

काढून झाल्यानंतर सुलट धरली तर चित्रे कशी दिसताहेत ते हेडर पोस्ट मध्ये दिले आहे. चित्राखाली नाव अर्थात सुलट बाजुने घातले आहे. उलट्या बाजुने नाही. Happy

बापरे, हे उलटी चित्र काढणे म्हणजे अवघडच प्रकरण आहे.

पण चित्र खरच छान काढली आहेत. श्री क्रिष्ण सगळ्यात छान Happy

>>बाकी विषयांचे गुण कायम चांगले मिळत पण चित्रकलेत अगदी काठावर पास होत असे मी!

हायला, आणि तरी सुध्दा ही चित्रं - आणि तीसुध्दा उलटी - छानच काढली आहेस तू. पण तू चित्रं उलटी काढल्याने गर्भातल्या बाळाच्या उजव्या मेंदूचा विकास कसा होणार ते मला कळलं नाही. Sad

पण तू चित्रं उलटी काढल्याने गर्भातल्या बाळाच्या उजव्या मेंदूचा विकास कसा होणार ते मला कळलं नाही. >> मला पण हा प्रश्न आहे.

पण तू चित्रं उलटी काढल्याने गर्भातल्या बाळाच्या उजव्या मेंदूचा विकास कसा होणार ते मला कळलं नाही. >>>

अरे, खरंच. बर्‍याच जणांना हा प्रश्न पडू शकतो.

मला त्या व्याख्यानातले सांगितलेले सर्वच आता आठवतेय असे नाही. पण माझ्या वाचिक माहितीवरून मी सांगण्याचा प्रयत्न करते.

आपल्या मेंदूचे डावा व उजवा मेंदू असे दोन मुख्य भाग पडतात. आपल्या शरीराच्या डाव्या भागावर उजव्या आणि उजव्या भागावर डाव्या मेंदूचे नियंत्रण असते. डावखुर्‍या माणसांमध्ये उजवा मेंदू जास्त कार्यक्षम असतो. बर्‍याचदा डावखुर्‍या लोकांमध्ये निरीक्षणशक्ती, कलाकारी, ग्रास्पिंग पॉवर (आकलनशक्ती) जास्त असते. किंवा एखादे तरी स्पेशल टॅलेंट असते, असे म्हणतात. (माझा अनुभव नाहीये ह्या बाबतीत. कारण पूर्णपणे डावखुरी व्यक्ती माझ्या जवळपासच्या पाहण्यात नाही.) मनोवैज्ञानिक किंवा तत्सम अभ्यास करणार्‍यांनी ते सिद्ध केले आहे, असेही ऐकले आहे. दैनंदिन व्यवहारात बरीचशी कामे उजव्या हाताने करण्यावर भर असल्याने डाव्या मेंदूचा वापर जास्त होतो.

जेव्हा कुठलीही व्यक्ती कलात्मक काम करत असते तेव्हा उजव्या मेंदूला जास्त चालना मिळते. आपणहून आपण स्वतःसाठी असे प्रयत्न केले जात नाहीत. पण गर्भारपणात करावेत असे गर्भसंस्कार मानणारे सांगतात. आणि आई जोप विचार करते, तिच्या मनातल्या विचारलहरी इ. चा थेट गर्भावर परिणाम होतो, असे गर्भसंस्कारशास्त्र मानते. त्यामुळे आईच्या उजव्या मेंदूला चालना मिळाली की त्याची स्पंदने बाळापर्यंत पोचतात, म्हणून हे करायचे. अशी बहुदा थीअरी असावा.

हुश्श!!

(इथे ही पोस्ट टाकून मी जरा घाबरलेय. Sad इथल्या कुठल्याही विधानाचा कृपया मला पुरावा मागू नका. त्या शिबिरात सांगितलेल्या सर्वच गोष्टींचे, विधानांचे मी दाखले मागितले नव्हते. त्यातले मला जे पटले, करावेसे वाटले आणि नोकरी व घरचे व्याप सांभाळून जे शक्य झाले ते मी केले. जाणकार लोकांना ह्या विषयात जास्त माहिती असल्यास त्यांनी प्रकाश टाकावा.)

मुलगा पण मग चित्रे काढतो का चांगली....
>>>

ते तर येणारा काळच सांगेल. Happy

सध्या तो फक्त तीन वर्षाचा आहे. सध्या तरी त्याच्या वयाच्या मानाने बराच क्रीएटिव्ह वाटतो मला तो. पण मी जास्त विचार करत नाही. Happy

हे शिबिर गर्भारपणाच्या दुसर्‍याच महिन्यात अटेंड केले होते. त्यामुळे माझ्याकडे ह्या सर्व गोष्टी करायला पुरेसा अवधी होता. पण वर म्हटल्या प्रमाणे सर्व सांभाळून फक्त ६ च चित्रे काढलीत मी अशी. त्यामुळे माझा मुलगा पुढे जाऊन काही कलाकारी शिकला तरी मी केलेल्या गर्भसंस्कारांमुळेच किंवा वरील उद्योगांमुळेच हे मी ठामपणे म्हणू शकेनच असे नाही. Happy

उलटी ठेऊन काढलीत तर छानच आलीत चित्रे. राजसवर परिणाम नक्कीच झाला असणार.
मला अन प्रज्ञाला उलटे (म्हणजे आरशात दिसते तसे ) भराभर लिहिता येते ते उगीच आठवले. :))

मला अन प्रज्ञाला उलटे (म्हणजे आरशात दिसते तसे ) भराभर लिहिता येते >>>
अरे वा... मस्तच! पण म्हणू पण शकत नाही की इथे माबोवर लिहा म्हणून... उलटे फॉन्ट्स कोण देणार आपल्याला इथे? Wink

Pages