"प्रेम म्हणजे काय?" यावर धागा काढला तर हजारो पोस्ट पडूनही प्रश्न अनुत्तरीतच राहणार यात कोणालाही शंका नसावी.
प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तरीही बरोबर असू शकते.
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो?
(मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, आपण यापुढच्या लेखात आपल्या सोयीनुसार "दोघींशी" किंवा "दोघांशी" असे काहीही वाचू शकता.)
इथे प्रेम म्हणजे मैत्री, ममता, वात्सल्य असे काही अपेक्षित नाही, तर स्त्री-पुरुष वयात आल्यानंतरचे होणारे प्रेम ज्याला प्रमाण मानून आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो त्याला डोळ्यासमोर आणा.
काही जण म्हणतात, एकीवरच प्रेम कसे करणार...
कोणाचे डोळे सुंदर असतात, कोणाचे केस, तर कोणाचे गाल...
एखादीचे बोलणे आवडते, एखादीचे दिसणे, तर एखादीचे हसणे...
फिल्मी डायलॉग निव्वळ...
कारण माझ्यामते एखादीचे नुसते आपल्या आयुष्यात असणे जेव्हा आपल्याला आवडायला लागते तेच खरे प्रेम..
इतर गोष्टींना वासना म्हणा, आकर्षण म्हणा, आवड म्हणा...... पण प्रेम .... नाह...!
आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचे तर ते "इश्कवाला लव" नक्कीच नाही..
असो, तर हे असे प्रेम एकाचवेळी दोघींशी कसे होऊ शकते??
एखादीत मन खरेच गुंतले तर ती आपले सारे आयुष्य व्यापून टाकते तर तिथे दुसरीसाठी जागा कुठून करणार.? त्यासाठी फोर्थ डायमेन्शनमध्येच जावे लागेल ना..
हृदय म्हणजे कप्प्याकप्प्यांचे कपाट आहे का? .. स्वताला हवे तेव्हा एक कप्पा उघडला अन दुसरा बंद केला..
हृदय म्हणजे ड्युअल सिम मोबाईल आहे का? .. कार्ड बदलले की नवीन नेटवर्क पकडले..
हृदय म्हणजे चॅनेल बदलणारा एफ एम रेडिओ आहे का? .. एक खटका दाबला आणि आपोआप ट्यूनिंग होऊन नवीन फ्रीक्वेन्सी सेट झाली..
एखादीवर तुम्ही प्रेम करत आहात आणि त्याचवेळी आणखी एखादी तुम्हाला आवडते याचा अर्थ एकतर त्या दुसरीबद्दलच्या भावना प्रेम नसून वर सांगितल्याप्रमाणे वासना, आकर्षण, आवड या सदरात मोडणार्या असाव्यात,
किंवा
तुमचे पहिलीवर आता प्रेम राहिले नाही वा कधी नव्हतेच मुळी..
पण तरीही तुम्हाला असे वाटत असेल तर आता हे तुम्ही स्वताच्या मनाचे समाधान म्हणा किंवा जोडीदाराची समजूत काढणे म्हणा...
वा आपल्या व्यभिचाराचे समर्थन..
पण मी याला व्यभिचारही म्हणू इच्छित नाही जर प्रामाणिकपणे दोघींपैकी कोणावर खरे प्रेम आहे हे स्वताच्या मनाशीच मान्य करून दुसरीजवळ त्याची कबूली दिली तर...
कुछ कुछ होता है या शाहरुखपटात एक संवाद होता - आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो, वगैरे वगैरे एकदाच करतो, तर तसेच हे प्रेम पण एकदाच करायला हवे.
पण पुढे काय होते तो इतिहास आहे. (चित्रपटप्रेमींना माहीत असेलच.)
हे असे पुन्हा प्रेम होणे यात काही वावगे नाही किंवा हे घडतेच घडते. कारण प्रेम आपण करत नाही तर प्रेम हे होते.
माणूस गेला की संपले सारे. भले त्याने एकेकाळी आपले सारे आयुष्य का व्यापून टाकले असेना.. उलट तेवढीच मोठी पोकळी तो आपल्या आयुष्यात निर्माण करून जातो, जी भरल्याशिवाय आयुष्य पुढे सरकू शकत नाही. अश्यावेळी खरे तर जास्तच गरज असते एखाद्याची.. त्यामुळे प्रेमभंगानंतर पुन्हा प्रेम होणे, आणि या दुसरीशीही प्रेमभंग होऊन परत पहिलीच्याच प्रेमात पडणे असे काहीही होऊ शकते.....
पण एकाच वेळी..? दोघींच्या प्रेमात..? कोण कसे पडू शकते राव..?? हे या अंड्याला कोणीतरी समजवा इथे.
तळटीप - बेफिकीर यांच्या एका ललित-कथेवरून हा विषय निघाला. प्रतिक्रियेत माझे मत एका वाक्यात मांडले तर तिथे पुढच्या सार्या प्रतिक्रिया या विरोधातच आल्या. अगदीच राहवले नाही आणि मूळ कथेचा धागा भरकटू नये म्हणून त्यावर सविस्तर मत वेगळा धागा काढून मांडणे योग्य समजले.
अवांतर - मायबोलीकरांचा सरासरी वयोगट अंदाजे माझ्या वयाच्या दीडपट असावा .. त्यातही महिलांचे प्रमाण लक्षणीय .. पण .. पण .. प्रेम हे प्रेम असते, तुमचे आणि आमचे सेम असते .. त्यामुळे दरदिवशी दरडोई किमान एक प्रतिक्रिया तरी अपेक्षित आहे.
- आनंद
आधी शिकवून तयार तर करा राव,
आधी शिकवून तयार तर करा राव, मगच अंड्यातून बाहेर पडेन. अन्यथा हे निर्दयी जग या पिलाचा जीव नाही का घेणार.>>>>>>>>>>
अंड्या लेका तू स्वयंभू आहेस..... एका रात्रीत विसरलास...... मी आणि उदय मिळून तुझी शाळा घ्यावी काय
हा खरंच दोघींच्या प्रेमात पडलाय काय
झकोबा, भुंग्या
झकोबा, भुंग्या
अंड्या लेका तू स्वयंभू
अंड्या लेका तू स्वयंभू आहेस... >>>>>>पण भुंगा ...आधी अंड की आधी कोंबड .........?
>>एकाच वेळी दोघींच्या प्रेमात
>>एकाच वेळी दोघींच्या प्रेमात .. ?? .. ?? ..>><<
बरं मग?
आता उत्तर,
आम्ही(एका काकूनं सांगितलेले) धर्मेंद्र व जितेंद्र वर सारखेच एका वेळीच प्रेम केले.
तर काका म्हणाले, आमचे जया व हेमावर एकाच वेळी प्रेम केले.
एक थियरी वाचलेली, विनोदी होती. माणसाला एकापेक्षा अधिक गंध आवडतात. विशिष्ट गंधाकडे माणूस खेचला जातो... ब्ला ब्ला... वगैरे वगैरे. तर आता समजून घ्या.
अंड्या, प्रेमाचा विचार
अंड्या, प्रेमाचा विचार करण्यापेक्षा, प्रेम करणे जास्त सोपे आहे..
( रच्याकने, मराठीत प्रेमग्रंथ या नावाचे, एक खरोखरीच चांगले पुस्तक आहे. लेखक बहुदा बाळ सामंत आहेत. )
अंडेराव, अगदी "लाखातली एक"
अंडेराव,
अगदी "लाखातली एक" गोष्ट लिहीलीत बर का...
रच्याकने: तुम्ही बेफींच्या कथा वाचत नाही काय? थोडी मोठी स्वप्ने, ऊद्दीष्टे, ठेवत चला हो.. मराठी माणूस मागे पडतो वगैरे बोंबा ऐकाव्या लागतात अशाने...
भुंग्या,
तू खरच एक पॅकेज डील कंसलटंसी (बघ फुकटचे सल्ले असे म्हणत नाहीये हा... जरा स्टेटस ठेवलाय तुझा!) काढ बरे- नावही सुचवतो, नाहीतर ऊगाच ते विचारायला एक बाफ काढशील
"K2MC" कमळापासून ते मधू चंद्रापर्यंत.
अंड्याला घेवून फोडा नारळ...
अंड्या, प्रेमाचा विचार
अंड्या, प्रेमाचा विचार करण्यापेक्षा, प्रेम करणे जास्त सोपे आहे..
>> व्व्वा दिनेशदा! लईच पटलं..
अंड्याला घेवून फोडा
अंड्याला घेवून फोडा नारळ...
<<<
अंड्याला घेऊन नारळ कशाला फोडायचा? अंडंच फोडता येईल की मुहुर्तासाठी!
नुसतं द्यायचं टाकून हातातनं! नारळ आपटावा वगैरे लागतो.
===========================================================
एखादीत मन खरेच गुंतले तर ती आपले सारे आयुष्य व्यापून टाकते तर तिथे दुसरीसाठी जागा कुठून करणार.? त्यासाठी फोर्थ डायमेन्शनमध्येच जावे लागेल ना..<<<
थोडी रेटारेटी, स्टँडिंग वगैरे चालतंच! तो काय बिझिनेस क्लास थोडीच आहे लुफ्तान्साचा!
==============
तळटीप - बेफिकीर यांच्या एका ललित-कथेवरून हा विषय निघाला. प्रतिक्रियेत माझे मत एका वाक्यात मांडले तर तिथे पुढच्या सार्या प्रतिक्रिया या विरोधातच आल्या. <<<
मास्टर ऑफ विबासॉलॉजीच्या क्लासमध्ये पहिलीतला प्रश्न विचारण्याचा परिणाम आहे तो
मास्टर ऑफ विबासॉलॉजीच्या
मास्टर ऑफ विबासॉलॉजीच्या क्लासमध्ये पहिलीतला प्रश्न विचारण्याचा परिणाम आहे तो >>>>>>>>>>>>>>
बेफी एकाच वेळी दोन काय २४
बेफी

एकाच वेळी दोन काय २४ च्या प्रेमात
he sara bhayankar aahe
he sara bhayankar aahe
he sara bhayankar aahe<<< हो.
he sara bhayankar aahe<<<
हो.
अंड्या, तुमच्या एकुणच
अंड्या, तुमच्या एकुणच पेशन्सची मला कमाल आणि कौतुक वाटते.
इब्लिस,
तुमचा प्रतिसाद भारीच! तशी तुम्हालाही बरीच नावं पडायला लागली की हो
(इब्लिसदा, इब्लिसदादा , इब्लिसभाऊ )
ऑमलेट करायच्या आधी
ऑमलेट करायच्या आधी काविलत्याने अंड्यावर टकटक केले असता जसे त्याला हलकेसे तडे जातात तसे माझ्या हृदयाचे झालेय... काही लोकांच्या प्रतिक्रिया बघून... त्यांचे प्रेमाबद्दलचे विचार ऐकून..
तरीही धागाकर्ता म्हणून विषयबाह्य पोस्टकडे दुर्लक्ष करून धाग्याशी संबंधित पोस्टना उत्तर देणे हे माझे कर्तव्य असल्याने तेवढे नक्की करेन... पण आता वेळ नाही, संध्याकाळी-रात्री सविस्तर उत्तर देईन.
देवा, मी अगोदर चहा पिताना
देवा, मी अगोदर चहा पिताना कीबोर्डवर साम्डला टाईप प्रतिक्रीया अतिशयोक्ती समजत असे पण बेफिंची नारळ कशाला फोडावा वाचून खरंच चहा सांडला.
>>अंड्याला घेऊन नारळ कशाला
>>अंड्याला घेऊन नारळ कशाला फोडायचा? अंडंच फोडता येईल की मुहुर्तासाठी!
कृ. ईथे लोकांच्या "धार्मिक" भावना दुखावू नयेत...
>>मास्टर ऑफ विबासॉलॉजीच्या क्लासमध्ये पहिलीतला प्रश्न विचारण्याचा परिणाम आहे तो

योग साहेब उपासाला चिकन चालते
योग साहेब

उपासाला चिकन चालते काहीन्ना तर मुहूर्ताला अंडे का नको?
बेफी आज तुम्ही बाफ 'निर्माण'
बेफी आज तुम्ही बाफ 'निर्माण' करण्यात संयम पाळल्यामुळे इतर सर्व बाफांवर तुमच्या आंतरीक शक्तीचा प्रत्यय येतोय.

(No subject)
श्रुती
श्रुती
श्रुती
>>he sara bhayankar
>>he sara bhayankar aahe<<<
अख्या बाफ वर ही एकच प्रतिक्रीया विषयास धरून आहे.....
(No subject)
प्रेम म्हणजे तुम्हाला वासना
प्रेम म्हणजे तुम्हाला वासना असे म्हणायचे आहे का???
. .अंड्याचा
.
.अंड्याचा मर्डर............इंस्पेक्टर शेखावत ला बोलवा लवकर...........
उदय आधी त्या आंड्याला भूत
उदय आधी त्या आंड्याला भूत बनावं लागेल
मग त्याची हेल्प करावी ल्;आगेल
तरच शेखावत चा उपयोग
टवाळा आवडे विनोद खन्ना. मला
टवाळा आवडे विनोद खन्ना. मला विनोदाचं वावडं आहे. हा निव्वळ कालापव्यय आहे.
इब्लिस नाही हो बावळटपणाने
इब्लिस नाही हो बावळटपणाने नाही, काही वेळेस तुमचे प्रतीसाद परखड आणी रोखठोक असतात ना.:फिदी:
सगळे प्रतिसाद .... अंड्या,
सगळे प्रतिसाद ....
अंड्या, एकीवर प्रेम करा की दोघींवर करा की 'क्ष' जणींवर करा. प्रेमाचं काय इतकं मनाला लावून घ्यायचं? ते तर काय होतंच राहतं.
पण 'तिकडून' ही प्रतिसाद आला पाहिजे ना?
त्यातून समजा की, आलाच प्रतिसाद, तर त्या प्रेमाचं चांगलं लोणचं घाला आणि इथे बरण्यात विकायला आणून ठेवा. असल्या आंबट्ट लोणच्यांना इथे खप आहे.
सुखदा जोशी तुमचा लेख
सुखदा जोशी
तुमचा लेख लिहिण्याचा उद्येश्य समजला ...
नाही करता येत दोघान्वर प्रेम ...
--------------------------------------------------------
धन्यवाद, अधूनमधून अशी एखादी प्रतिक्रिया बघितली की मृगजळानेही तहान भागल्याचे समाधान मिळते.
झक्कासराव,
--------------------------------------------------------
समाजनियम, कायदा या भानगडीत पडायचेच नाही राव. बस अपने मन की सुनो और वो क्या बोलता है वो इधर लिखो.
भुंगा,

हा खरंच दोघींच्या प्रेमात पडलाय काय?
--------------------------------------------------------
नाही बा, एकीच्याही प्रेमात पडलो तर प्रामाणिकपणे कबूल करणार आपण. आतापर्यंत तिघींच्या पडलो पण वन बाय वन.
आणि त्यावरूनच हा अनुभव की एकावेळी दोघींच्या प्रेमात.. नाय नाय नाय.. शक्यच नाय..
मी त्यापैकी प्रत्येकीच्या प्रेमात असताना मला ती आणि तीच जगातली सर्वात सुंदर मुलगी वाटायची. सुंदर म्हणन्यापेक्षा अंड्यासाठीच वो बनेली है अगदी अगदी असेच वाटायचे.
आज आता या क्षणाला मात्र मी सिंगल आहे, ना कोणी आयुष्यात आहे ना कोणी मनात.
झंपी
एक थियरी वाचलेली, विनोदी होती. माणसाला एकापेक्षा अधिक गंध आवडतात. विशिष्ट गंधाकडे माणूस खेचला जातो... ब्ला ब्ला... वगैरे वगैरे.
--------------------------------------------------------
हाईला ही थिएरी आणि विनोदी???
एक्स इफेक्ट की काय त्या बॉडी स्प्रे परफ्यूमाचे दुकान याच थिएरीवर चालते हो.... बाकी त्याच्या जाहीरातीत जे काही दाखवतात ते तर जनावरांच्या प्रेमाच्या व्याख्येतही येणार नाही.
दिनेशदा,
अंड्या, प्रेमाचा विचार करण्यापेक्षा, प्रेम करणे जास्त सोपे आहे..
--------------------------------------------------------
लाखातली एक गोष्ट दादा,
पण............... पण....... पण.....
प्रेम करणे सोपे असले तरी प्रेमिका मिळणे सोपे नाही ना राव..
आणि लोकांना एकाचवेळी अनेकांशी व्हाया लागले तर निभावणे तर त्याहूनही कठीण मग..
माधवी अंडरस्कोर नयनीश
अंड्या, तुमच्या एकुणच पेशन्सची मला कमाल आणि कौतुक वाटते.
--------------------------------------------------------
लोकांचे प्रेम आहे हो, आणि असे प्रेम एकाच वेळी हजार जणांनी केले तरी हा अंड्या झेपवून जाईल.
योग,

>>अंड्याला घेऊन नारळ कशाला फोडायचा? अंडंच फोडता येईल की मुहुर्तासाठी!
>>कृ. ईथे लोकांच्या "धार्मिक" भावना दुखावू नयेत...
--------------------------------------------------------
तुम्हाला लोकांच्या भावनांचे पडलेय राव, अंड्याच्या भावनांचे कोणाला काय नाय??
मामी
अंड्या, एकीवर प्रेम करा की दोघींवर करा की 'क्ष' जणींवर करा. प्रेमाचं काय इतकं मनाला लावून घ्यायचं? ते तर काय होतंच राहतं.
--------------------------------------------------------
अहो मामीमावशी, त्या काय कूकरच्या शिट्ट्या आहेत काय? एकदा लावला कूकर की होतच राहतात.. मनातली घंटी फक्त एकीसाठीच वाजते..
Pages