अहिराणी

Submitted by जेम्स बॉन्ड on 1 December, 2012 - 03:30

महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे. "जावयाचं पोर नि हरामखोर". आता यात किती सत्यता आहे हा भाग निराळा.
अहिराणी ही मुख्यत्वे खानदेशात बोलली जाणारी बोली भाषा.हीचा बाज आणी ढंग काही अंतरा-अंतराने बदलतो.महाराष्ट्राच्या तीन वेगवेगळ्या पट्ट्यात अहिराणी बोलली जाते आणी त्या त्या पट्ट्यानुसार तिचा लहेजा,उच्चार, बांधाही बदलतो.
हे तीन पट्टे साधारणता असे
१.नाशिकच्या पुढे कळवण, सटाणा, बागलाण, तोरखेडा इकडे
२. धुळे, साक्री, शहादा, तळोदा
३. जळगाव, भुसावळ, अमळनेर,

वर जावयाची म्हण द्यायच्या मागे उद्देश हा की खानदेशात जावई आला म्हणजे त्याला, जर तो शाकाहारी असेल तर जेवणाला दोनच पर्याय.
१. पुरणपोळी, खीर्/बासुंद, रसोइ-भात, भज्यापापड, कुर्डाया किंवा मग
२. पुरणपोळी, आंब्याचा रस, रसोइ-भात, भज्यापापड, कुर्डाया.

"माय वं, जवाइजम इ र्‍हाय्ना अनं तेस्ले का मंग कोल्लपल्ल रांधी चालीन का, असं व्हस का कोठे बरं " ?
"कालदिन बईन ना फोन उन्था पर्होनदिन इ र्‍हायनात त्या आपलं घर. तुम्ही काय खाटलं तोडी र्‍हायनात, जवाइ इ र्‍हायना म्हंत कामले लागातुन"
( अय्या/अस काय करतां, जावईबापु येताहेत त्यांना काय कोरडंबिरडं बनवु. अस असत/होतं का कधी ? काल ताईचा फोन आला होता परवा येत आहेत आपल्या घरी. तुम्ही काय खाट तोडत बसला आहात, जावई येतोय म्हटलं कामाला लागा.)
जावई-लेक यायच्या आधी हमखास हा संवाद आपल्या कानी पडतो.
मग सुरु होते घरातल्यांची धावपळ. आणी जावयाची ही जर पहिलीच वेळ असेल तर मग धुमाकुळ काय विचारु नका. लग्नात दिल्या गेल्या उपद्रवावरुन जावयाचे उपद्रवमुल्य ठरवुन त्या नुसार आवभगत केली जाते.
"पहिलाच सावा जवाइ इ र्‍हायनात, तुमुन अस करा ते बजारमा जाइसन चांगलामेंगला कपडा लै या, जरा देखीदाखी लयजात मन्हा भाउ उन्था तव्हय जे रटकं उचली लयन्थात तस नका उचली लयजात बरं.
बाइनं साडीन साठे तिन्हा बरोबर मी जाइ इसु."
(पहिल्यांदाच जावई येताहेत तुम्ही अस करा बाजारात जावुन चांगले कपडे घेवुन या जरा नीट बघुन आणा, माझा भाउ आला होता तेव्हा जे गोणपाट उचलुन आणलं होत तस नका आणु म्हणजे बरं, बहिणीच्या साडीसाठी मी जाईन तिच्याबरोबर बाजारात.)
अश्यातच तो दिवस आणी जावईही येवुन ठेपतो.मग तितके दिवस त्याच त्याच कोडकौतुकात सरतात.
जावई पुराण पुरे. हे फक्त संवादा करता घेतले असे समजा.
आपण बोलत होतो अहिराणी संबंधी.
सटाणा,बागलाणकडे अहिराणी ऐकायला मिळते ती साधारणपणे.....
समजा गावात आलेल्या पाहुण्याला गावकरी विचारतोय
गा: कधी आलात ? कसं काय चाललय तुमचं?
पा: आजच आलो सगळ मजेत
तर ते म्हणतील

गा: कव्हळ उनात? कसं चाली र्‍हायनं
पा: आजच (च हा च्य). बाकी मजामा शे !
अशी असते.

हीच भाषा धुळे, शिरपुर कडे सरकलात तर
गा: कव्हय उनात ? घरनी मंडयी काय म्हनी र्‍हायनी?
पा: आजच उनु. घरना बठ्ठा चांगला शेतस तुम्हुन सांगा ?

आता अहिराणी भाषेचे काही धडे गिरवु यात.
रोजचा संवाद
समजा सरलाबाई ह्या/ही विमलाबाईला विचारतेय
सबा: का वं ईमल काय शाक(भाजी) रांधी र्‍हायनी आज ? (काय गं विमल आज काय बनवायचा विचार आहे)
विबा: काय नै वं. रातलेस्नी खिचडी पडेल शे ती देखी आज ते कांदानी पात कराना इचार व्हयी र्‍हायना मन्हा. (कस्च काय रात्रीची खिचडी पडलेली आहे, त्यामुळे आता कांद्याची पात बनवायचा विचार चालु आहे माझा)
सबा: माय वं सक्काय सक्काय मां कांदानी पात ? ( अय्या/आई गं सकाळी सकाळी कांद्याची पात्)
विबा: बठ्ठी हडवाय रातले भाइर चरी येले व्हती म्हनीसन इतली खिचडी पडी र्‍हायनी, आते तिच मांडस.(सगळे नमुने रात्री बाहेरुन खावुन आले त्यामुळे इतकी खिचडी पडुन राहिली आता तिच मांडते त्यांच्या समोर)

भाजीवाला : कोथ्मेर ल्या हो, कांदानी पात, पोक्या, मुय्या, निंबु, बटाटा, पालक, निय्या मिरच्या सस्तामा लाइ दिधं, ल्या ल्या भाउले पेडा बइन ले बर्फी भाउले लाडु बइन ले बर्फी.
कोथिंबीर घ्या हो, कांद्याची पात, पोकळा, मुळा, लिंबु, बटाटा, पालक, निळ्या (हिरव्या) मिरच्या स्वस्तात लावल आहे. घ्या घ्या......... पुढच म्हणजे तो एक प्रकारचा जुमला आहे लोकांचे लक्ष वेधुन घेण्याकरिता.

आता कधी कधी पोर ऐकत नाहीत बापाचं मग खालील प्रसंग घडतो.
पो: पप्पा/दादा/तात्या/अण्णा माले किनै ती टिकल्या फोडानी बंदुक जोयजे.( मला किनै टिकल्या फोडायला बंदुक पाहिजे)
बा:बेटा असं नही करो, इतला फटाका लयेल शेत ना तुन्ह साठे, त्या टिकल्या तु दघडवरे फोडी लेजो.(बेटा अस करु नये आपण तुझ्यासाठी इतके फटाके आणलेत ना. त्या टिकल्या तु दगडाने फोड)
पो: नही माले बंदुक जोयजे म्हनजे जोयजे.(नाही मला बंदुक पाहिजे म्हणजे पाहिजे)
बा: नही सांग ना एकडाव. (नाही सांगितल ना एकदा)
पो:माले बंदुक जोयजे म्हनजे जोयजे नही ते मी आठेच लोइ जासु. (मला बंदुक पाहिजे म्हणजे पाहिजे नाहीतर मी इथेच लोळेन)
बा: मातीग्या का भडवा. लोयतुन मंग देखस मी तुन्हा हात.तुन्हा यम गर्दी करी येल दिखी र्‍हायनात मल्हे.(मातलास का भडव्या. लोळतर खरा मग बघतो मी तुझा हात.तुझे यम गर्दी करत आहेत असे मला दिसतेय)

बापच्या ह्या निर्वाण वाक्याने मग पोरगा थंडावतो.

दोन शेतकरी आपल्या शेताविषयी बोलत असताना.

शे१: राम राम हो आप्पा काय म्हनी र्‍हायनं खेतपानी ? यंदा काय पेरेल शे वावरमां ? (राम राम आप्पा शेतपाणी काय म्हणतय ? काय लावलय यंदा शशेतात्)
शे२: राम राम नाना. दिखी ते ठीक र्‍हायनं पन हातमा इन तव्हय खरं. कांदा लायेल शेतस .मांघला सालले भाव पडेल होता म्हंत या सालले इन जरा बरा. पन हाइ लाइट काय सुधरु दी नही र्‍हायनी ! (राम राम नाना दिसतयं तर ठीक पण हातात येयील तेव्हा खरं. कांदा लावला आहे. मागच्या वर्षी भाव जरा पडलेलाच होता म्हटलं या वर्षी येयील जरा बरा पण ही लाइट काय सुधरु देत नाहीये)
शे१: काय व्हयनं लाइटले (काय झल लाइटला)
श्२:ते चाली र्‍हायनं ना लोड्शेडींग.सरकारनं पायले थोडीच्य माटी लागी र्‍हायनी, तेस्न काय जाइ र्‍हायनं तठे बठीसन बोलाले. तेस्ना कोन्था कांदा, के ना बाग बयी र्‍हायनात.(ते चाललय ना लोडशेडींग. सरकारच्या पायाला थोडीच माती लागतेय, त्यांच काय जातय तिथ बसुन बोलायला, त्यांचे कोणते कांदे, केळीच्या बागा जळताहेत)

साधारण संवाद.
१ला: तुम्हनी पोरले देखाले तो पोर्‍या उन्था तेन्ह काय व्हयना का नै ?(तुमच्या मुलीला बघायला तो मुलगा आला होत त्याचे काय झाले?)
२रा: अरे त्या हो. हा हा देखी ते जायेल शेतस पन सोनामा गोट अडी बठी जायेल शे. (अरे ते होय. हो हो बघुन तर गेलेत पण सोन्यामधे गोष्ट अडकलीय)
१ला: कस्काय हो ? (कशी कय हो ?)
२रा: देखा तेन अस शे पोर्‍या नि पोर्‍याना बाप क्षक्ष तोयावर राजी हुयी गयथात पन मधमा तेस्ना तो शिकेल सवरेल जवाइ बोली पडना आंखो वाढावानं कुरता मंग तठे हाइ गंढ फशी गे.(बघा त्याच अस आहे पोरगा आणी पोराचा बाप क्षक्ष तोळ्यावर राजी झाले पण त्यांचा तो शिकलासवरलेला जावई मधे बोलला आणखी सोनं वाढवण्याकरता मग तिथे गम्मत फसली/अडकली)
१ला: मंग आते ? (मग आता?)
२रा: आते काय हुयीन पसंत त येतीन परत नही त्या ग्यात चुल्हामा. (आता काय असेल पसंत तर येतील परत नाहीतर गेले चुलीत.)

मी आठे कंपु बनाडीसन मन्हा बाफवर लोकेस्ना गैर्‍हा प्रतिसाद लेवाले देखी र्‍हायनु पन ह्या लोके काही हालततं नयथीन. (मी इथे कंपु बनवुन माझ्या बाफ वर लोकांचे भरपुर प्रतिसाद मिळवु इच्छितोय पण लोक काय हलायला मागत नाहीत.)
किंवा.
नवा नवा आयडी लीसन भी काही उपेग नही हुयी र्‍हायना आठे, कोन्ता भी आयडी लेवाउप्पर भी लोके माले वयखीच लेतस. (नवे नवे आयडी घेवुन पण काय उपयोग होत नाही, कोणताही आयडी घेवुन सुद्धा मला ओळखुनच घेतात.)

सायकल चालवणर्‍याने धडक दिली.....
धला: कथा देखी बिखी र्‍हायंता तु रे ?तुन्हा का डोया फुटी ग्यात इतला दांडगादुंडगा मानुस नै दिखी र्‍हायना तुल्हे ? (कुथे बघत बिघत होतास तु? तुझे काय डोळे फुटले काय इतका आडदांड माणुस दिसला नाही तुला?)
सावा: बापु माफ कर द्या हो. बही हाइ उननी तिरीपमा चमकाय गवु थोडा. (बापु माफ करा ह्या उन्हाच्या तिरीपेमुळे थोडा चक्रावलो)
धला: उननी तिरीप, येडाबिडा समझी लिधं का तु? तोंड ते गढेरनं मायक वास मारी र्‍हायनं , भिलाटीमाइन टाकी येल दिखस, तिरीप न नाव लेस कारे भडवा. (उन्हाची तिरीप, वेडाबिडा समजलास काय मला ? तोंड तर गटारीसारखं वास मारतय भिलाटीतुन टाकुन आलेला दिस्तोस आणी तिरीपेच नाव घेतोस काय रे भडव्या )

असो मला लग्नातले एक गाणे आठव्तेय पुर्ण येत नाही पण काही ओळी देतो.

शिरीक्रुष्ण पर्णाले जायजो (श्रीकृष्णा (वरा) लग्नाला जा)
काय काय आंधण लयजो (येतान आंदण घेवुन ये)
ताट लयजो वाटी लयजो (ताट घेवुन ये वाटी घेवुन ये)
ताम्याना गट्टु तु लयजो ((तांब्याचा लोटा/तांब्या आण) (सध्या इथे इ स्टिलना गल्लास तु लयजो हा बदल झालाय))
शिरीक्रुष्ण पर्णाले जायजो. (श्रीकृष्णा (वरा) लग्नाला जा)

या गाण्याला ५/६ कडवी आहेत पण मला येत नाहीत.

तर मंडळी ही अहिराणीची थोडी माहिती आहे बाकीचे नंतर कधी पण त्या आधी एक किस्सा.

कापुस निघाला की शेतकरी आपल्या घरातच त्याचा ढिग लावुन ठेवतात विक्रीपर्यंत.
आणी नेमका हा दिवाळीच्या आसपास निघतो.
असाच एक जावई सासरी गेलेला असतो. घरात कापसाचा ढिग लावलेला व वरुन त्याला झाकलेला.
संध्याकाळी सासुबै पणत्या लावत असतात.जावई विचारतो की तुम्ही हे काय लावत आहात ?
साबा: ही सुर्याची पिल्ले आहेत.
जावई म्हणतो अरे अस्स आहे होय. तो बायकोला सांगतो तुझ्या आईकडे भरपुर सुर्याची पिल्ले आहे तर आपण काही पिल्ले घेवुन जावु.बायको गोंधळुन विचारते काय ? कशाला?
मग ह्याचा काही भरवसा बसत नाही की आपली बायको हि पिल्ले नेवु देईल. म्हणुन हा काय करतो एक एक पणती गुपचुप उचलुन त्या कापसाच्या ढिगार्‍याखाली लपवतो जेणेकरुन जाताना नेवु.
मग काय आग लागुन कापुस खाक. सगळे म्हणतात आग कशी लागली, तेव्हा हा तिथेम्हणतो माझी सुर्याची पिल्ले माझी सुर्याची पिल्ले ती ही जळुन मेली असणार.
ढॅण्टॅढॅण....सासुबाई बेशुद्ध.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाण्डोबा,
थोडा नाही, बराच विस्कळीत झालेला आहे लेख..

अहिराणी येत नसणार्‍यांना उच्चार समजले नाहीत तर मजा नाही.
उदा. धला. हा उच्चार धड्ला असा आहे, अर्थ = तीर्थरूप, किवं बुजुर्ग पुरुष. (म्हातारा या अर्थी)
मातीग्या का = माती गया का हे तीन शब्द घाईत नॉर्मल बोलीसारखे बोलल्याने

अन जावायाला पाहुणचार फक्त गोडाचा? अरररर कुठे फेडाल पाप बंडोबा?

वा मस्त! लिहायला सुरूवात झाली, हे काय कमी आहे.

उत्तर नाशिक जिल्ह्यातली (सटाणा-बागलाण, देवळा, कळवण, मालेगाव) अहिराणी धुळे-जळगाव (खानदेश) मधल्या अहिराणीपेक्षा थोडी वेगळी आहे. वरच्या लेखात एक दुरूस्ती म्हणजे- उत्तर नाशिक जिल्ह्यात 'ते आले, तो आला' याला खानदेशातल्यासारखं 'त्या ऊनात, तो ऊना' असं न म्हणता 'त्या वनात, तो वना' असं म्हणतात. खानदेशीतले 'बठ्ठा' 'जायजो-लयजो' 'जुवान' सारखे अनेक शब्दही इथं आढळत नाहीत. खानदेशातल्यासारखं 'ळ' ला 'य' किंवा'ड' ही इथं म्हटलं जात नाही. उदा. दाळ, गुळ, धुळे, जळगावला दाय, गुय, धुडे, जडगाव इ. खानदेशी बोली ही जास्त हेलयुक्त (म्हणून कानाला कदाचित जास्त गोड) वाटते. म्हणूनच कदाचित त्या लोकांना उत्तर नाशिक जिल्ह्यातली अहिराणी बोली थोडी उर्मट वाटत असावी.

इतर अनेक भाषांप्रमाणे इथंही ३०-४० किमीवर भाषा, शब्द, उच्चार हेल आणि लहेजा बदलतो. थेरडाचं 'धयडा', 'धडला', 'धेडा' असं बदलत जातं.

छान लिहीलेत. नासिकपासुन खानदेशपर्यंतच्या पट्ट्यात अहिराणी विशेष ऐकली बोलली जाते. माझ्या क्लासमेटचे आजोळ खानदेशातलेच त्यामुळे कधीतरी तिचे कोणी नातेवाईक आले की ऐकायला मिळायचेच. आणी तिकडच्या ग्रामिण भागात याचा जास्त प्रभाव आहेच.

मस्त... कोल्लपल्ल, मातीग्या, चमकाय गौ... हे शब्द किती दिवसांनी वाचले/ ऐकले! Lol
<<तुन्हा यम गर्दी करी येल दिखी र्‍हायनात मल्हे<< Rofl
माझी आज्जीची शिवी 'भकवा' होती. आता ते 'भडवा'च अपभ्रंश आहे का माहित नाही.

<<तोंड ते गढेरनं मायक वास मारी र्‍हायनं<< गढेर कळलं नाही. Uhoh

खान्देश ग्रुपमधे नाहीये का हे?

तुम्ही धूयाना शेतस का? म्हाले इचारं त म्हाले जयगाव परीस अम्मळनेर च्योपडा शिरपूर पट्टानी अहिराणी आवडस. जयगाव कडतुन रावेर भुसावळ लाईनम्हा जरा जरा विदर्भनं पानी लागी जास.. तसा मी प्रॉपर नांदेड- मराठवाडाना शे, पण चार साल चोपडाम्हा हॉस्टेलले राहीशिन शिकी गऊ. मनं ते जसं प्रेम हुई जायेल शे अहिराणीवर!

इस्नु किस्नु कांडया भरे
इस्नु किस्नु कांडया भरे

रायरुखमनी पोयतं करे
रायरुखमनी पोयतं करे

तठलं पोयतं कोणले आणं
तठलं पोयतं कोणले आणं

एवढंच आठवतंय