दिवली ग सईबाई ...

Submitted by कमलाकर देसले on 29 November, 2012 - 10:31

दिवली ग सईबाई ...

दिवली ग सईबाई ,तुझी कोनाड्यात जागा ;
तुझं भकास आयुष्य ,कसं जळे भगभगा ..

नटण्याचा थटण्याचा , सोस हरवला कसा ;
चिंधी वातीच्या जागेला , तरी प्रकाशाचा वसा ..

उजळविते घराला , सुख सोज्वळ देवून ;
काळं कुट्ट तुझं दु:ख , येतं काजळी होवून ..

तुझ्या वाट्याला ग कुठं , वाडा काचेचा सुंदर ;
तुला वेगळालं कुठे , घर,स्मशान,मंदिर ..

वारा उघड्यावरचा , तेल सरता सरता ;
तुझ्या मरणाच्या फक्त , दोन आहेत श्यक्यता
..
दिवली ग सईबाई ,तुझी कोनाड्यात जागा ;

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देसले साहेब मस्त
अगदी पहाटे कुणीतरी सईबाई खरोखरच दिवलीशी(बाहेरच्या कोपर्‍यातल्याही अन् आतल्याही !!) सन्वाद साधत ह्या ओव्या गातगात पीठ दळते आहे अन मी त्या दृष्यात अदृष्यसा समोर बसून मुग्ध होवून ऐकतो आहे असा भास झाला
जिवन्त काव्य
सह्ही...................

दिवली ग सईबाई ,तुन्ही कोनाड्यामां जागा ;
तुन्हं भकास आयुषं ,कसं जये भगभगा ..

वैभव दादा , तुम्हीभी त भू मस्त आहीराणी लिव्हाले लाग्यात . म्हंजे तुम्ह्ले बोलताभी यस हुई ! तुम्हनासारखा मोठा माणसे अहिराणीवर जीव लावतस याम्हानच आहीराणीनं मोठं पण लपेल से . मन्ही एक आहीरानिनी गझल से टाकू का ?

इब्लिस भाऊ , तुम्ही माले नावधरी वयखतस . आते आवढच सांगा !तुम्हनं नाव ,गाव आणि नातं .. मी वाट दखि र्हायाणू बरका ..

मला अहिराणी अजिबातच येत नाही पण शंका आली होती की मनही ऐवजी मन्ही वगैरे असणार म्हणून पण मी चुकेन की कीय म्हणून नाही बोललो............ प्रतिसादात संपादित केलेत बरे केलेत

गप्पा मारण्यात वेळ का घालवायचा उगाच ??तुमची रचना प्रकाशित करा की इब्लिसराव

आबा, माफ करा! हा धागा पहायचा राहून गेला होता नंतर.
वैवकु तुम्हाला तुमची अहिराणी रचना टाकायला सांगत आहेत. ते करा की लवकर!

तुमच्या कवितेतली मूळ कल्पना तुम्हाला स्फुरली. माझी ताकत पुरली तर करीनही अहिराणी-करण, पण कितपत जमेल ही शंका आहे. एक शेर जमला, तसे सगळे जमण्यासाठी ते अनुभव-भावविश्व जुळायला हवं, अन ती 'तार लागायला' हवी..

तशी तार लागनी, तर मंग लिखसूच आठे Happy

व्वा!

कमलाकर देसले | 4 December, 2012 - 05:24

वैभव दादा , तुम्हीभी त भू मस्त आहीराणी लिव्हाले लाग्यात . म्हंजे तुम्ह्ले बोलताभी यस हुई ! तुम्हनासारखा मोठा माणसे अहिराणीवर जीव लावतस याम्हानच आहीराणीनं मोठं पण लपेल से . मन्ही एक आहीरानिनी गझल से टाकू का ?

***
वैभव वसंतराव कु... | 3 December, 2012 - 23:02

मन्ही एक आहीरानिनी गझल से टाकू का ?>>>>>>>>
विचारताय काय लवकर टाका की !!!
***