मनाने घेतले आहे नशेचा आसरा घ्यावा

Submitted by वैवकु on 29 November, 2012 - 00:12

मनाने घेतले आहे नशेचा आसरा घ्यावा
जवानीच्या टकील्यावर जरासा मोह चाखावा

मला भेटायला स्वप्नातसुद्धा येत नाहिस तू
कशाला मी तुझ्यावर एक माझा शेर खर्चावा

तुला वाईट वाटावे असे मी वागतो आहे
तुझा चांगुलपणा थोडातरी वाईट वागावा

तुझ्या वाटेकडे डोळे.......बिजेपासूनचे दादा
जरी जमणार नसल्याचा तुझा आलाय सांगावा
____________________________________

कशाने पांडुरंगासारखे ते सावळे झाले
कधी ठरले बरे माझे मनाला रंग लावावा

असे काहीतरी व्हावे मनाला छान वाटावे
जसे की शेर माझा विठ्ठलाची आरती व्हावा

विठ्या माझा तुझ्यावर तेवढा अधिकार आहे ना
तुझा असला जरी हा शेर मी माझाच मानावा
________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला वाईट वाटावे असे मी वागतो आहे
तुझा चांगुलपणा थोडातरी वाईट वागावा>> मस्त.

तुझ्या वाटेकडे डोळे.......बिजेपासूनचे दादा
जरी जमणार नसल्याचा तुझा आलाय सांगावा>> छान

विठ्या माझा तुझ्यावर तेवढा अधिकार आहे ना
तुझा असला जरी हा शेर मी माझाच मानावा>> हम्म्म

बरेच मिसरे सुलभ आलेत, अभिनंदन!

अन्तःकरणपूर्वक आभार अरविन्दजी

रडणार उद्या चे आधी उडणार उद्या असे लिहिले होतेत ना !! मी वाचले होते Happy

धन्स जितू

मतला अगदीच नाही आवडला.>>>>>५०% सहमत
मतला मुद्दाम म्हणजे अगदी मुद्दाम..... मला व्यक्तिशः असाच पाहिजे होता म्हणून अगदी .तसा केलाय !!(खासकरून पहिली ओळ= ५०%). आधी असा होता ..............

मलाही वाटते हल्ली विठ्याचा नाद सोडावा
जवानीच्या टकील्यावर जरासा मोह चाखावा

पण मग मलाच नको वाटले अन मी विचार बदलत बदलत कसाबसा आता आहे तिथवर आलो

बाकीचे शेर तसे तुलनेने सहजसाध्य ठरले

मला भेटायला स्वप्नातसुद्धा येत नाहिस तू
कशाला मी तुझ्यावर एक माझा शेर खर्चावा

तुला वाईट वाटावे असे मी वागतो आहे
तुझा चांगुलपणा थोडातरी वाईट वागावा

तुझ्या वाटेकडे डोळे.......बिजेपासूनचे दादा
जरी जमणार नसल्याचा तुझा आलाय सांगावा
<<<

आवडले.

बेफीजी :त्यादिवशी आपण भेटलो.... तुम्ही तुमचा खयाल मला सान्गीतला होता बघा व मला शेर करा असे म्हणालात मी त्यादिवशी एक शेर दिलाही पण तो तुम्हाला हवा तसा तन्तोतन्त उतरला नव्हता ........तोच इथे दुसर्‍याप्रकारे माझ्या मनात जसे आले तसा उतरवायचा प्रयत्न मी केला इतकेच

थोडक्यात बोलविता धनी तुम्ही आहात सर

धन्स बेफीजी त्या खयाला बद्दल

<<<<<<<<<<तुला वाईट वाटावे असे मी वागतो आहे
तुझा चांगुलपणा थोडातरी वाईट वागावा>>>>>>>>
_____________________-

प्रिय माबोकरहो!! तो शेर असा होता

तुला वाईट वाटावे असे मी वागलो नाही
मला जाणीव झाली "चान्गली आहेस तू!!!"...तेन्व्हा

तू =दुनिया या अर्थाने योजले आहे इतरही अर्थ लागत आहेत 'तू' चे

सर्वान्चे आभार
बेफीजी तुमचे विषेश आभार

त्याबद्दल मी काही बोललोच नाही वैवकु, ते माझ्या काल परवाच लक्षात आले होते. पण तुमच्या शेरातील खयाल आणि मी नोंदवलेला खयाल हे बर्‍यापैकी भिन्नही आहेत. तसेच, तुमचा शेर चांगला झाला आहे. शेर चांगला झाला की झाले, कोणी का करेना! Happy

होय बेफीजी ..........
मी फक्त कृतज्ञता व्यक्त करू बघत होतो .....माझी स्टाईल चुकीची असते व्यक्त व्हायची !!! सॉरी

मला भेटायला स्वप्नातसुद्धा येत नाहिस तू
कशाला मी तुझ्यावर एक माझा शेर खर्चावा

>>> य्ये अ‍ॅटिट्यूड! आवडला (शेर) Happy

मला भेटायला स्वप्नातसुद्धा येत नाहिस तू
कशाला मी तुझ्यावर एक माझा शेर खर्चावा

तुला वाईट वाटावे असे मी वागतो आहे
तुझा चांगुलपणा थोडातरी वाईट वागावा

अप्रतिम वैवकु.....जियो !

अमित, यात्रीजी, ताई .... खूप खूप धन्स

"खर्चावा"त अ‍ॅटिट्यूडच दाखवायचा होता पण कशी गम्मत झालीये पहा की कशाला मी तुझ्यावर एक माझा शेर खर्चावा असे म्हणता म्हणताच माझ्या हातून एक शेर तयार होवून बसलाय Sad + Happy

>>"खर्चावा"त अ‍ॅटिट्यूडच दाखवायचा होता पण कशी गम्मत झालीये पहा की कशाला मी तुझ्यावर एक माझा शेर खर्चावा असे म्हणता म्हणताच माझ्या हातून एक शेर तयार होवून बसलाय >>
अशीच असते ही गंमत खयालांची. छान उतरलेय.

कशाने पांडुरंगासारखे ते सावळे झाले
कधी ठरले बरे माझे मनाला रंग लावावा

हा खूप आवडला.