नरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे

Submitted by मी अमि on 28 November, 2012 - 02:15

नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरावे? सांगलीच्या गणपतीचे आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे आहे. तेव्हा प्रवासाचा क्रम कसा ठेवावा. मुंबईहून ट्रेनने जायचा बेत आहे. कॄपया चांगली हॉटेल्सही सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, आम्बा३, उदयन, केश्वि, रावी आणि मनिष......खुप खुप आभार.

झणझणीत जेवणाला पास.... पण मिसळ जरूर टेस्ट करेन.

नंदिनी खिद्रापुरचे फोटो पाहिले. छान आहेत Happy

खिद्रापुरलाही लिस्टमध्य अ‍ॅड करून घेते. Happy

उघडी गटारे, सगळीकडे माश्या, गाढवं-डुकरं आणि काय काय. घाण झालेली नदी. त्यात अस्थिविसर्जनाचं कारण. वडिलांना नरकात सोडून आल्यागत वाटलं..
(कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व).

देवाचं नांव घरी बसून घ्यावं, दुसरं काय?

(विषयांतराबद्दलही क्षमस्व).. तुमचं चालू द्या...

ओह... Sad

ते सगळं घाटावर आहे.... गप्प स्टँडला उतरावं.. देऊळ गाठावं.. दर्शन घ्यावं आणि जावं.....
विधी वगैरे करायला घाटावर गेलात तर मात्र घाणीला तोंड द्यावे लागेल.

ओके

परदेसाई, आपल्याकडच्या कुठ्ल्याही तीर्थक्षेत्री बाकी काही असेल नसेल गचाळपणा, घाण हे नक्की आहे. तीर्थक्षेत्राचे व्यवच्छेदक लक्षण असल्यासारखे...

पर्देसाई, एकदा त्र्यंबकला त्या कुंभस्नानानंतर जायची वेळ आली होती. वासाने देऊळ लांबच, गावातसुद्धा शिरणं अशक्य झालं. स्टॅन्डवरून परत फिरले होते. तेव्हापासून मीही देवस्थानांचा धसका घेतला आहे.

असो. या धाग्याचा हा विषय नाही हे मान्य. क्षमस्व.

मी अमि, आम्ही दर पौर्णिमेला पुण्याहून वाडीला जातो. अनुभव चांगला आहे. आत्ताच काल २७-२८ ला ही गेलो होतो. सांगली वरून एसटी बस आहेत. रेल्वे नी जयसिंगपूरला आल्यावर रिक्षाही मिळतात. भक्तनिवासमध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. साधारण ५ जणांसाठी एक रूम व २०० रुपये लागतात. शक्यतो मुक्कामी जावे आणि पहाटे ५-५.३० ला नदीवर स्नान करावे. स्त्रियांसाठी वेगळी सोय आहे. रूमवर जावूनही कपडे बदलू शकतो. पौर्णिमेला प्रचंड गर्दी असते त्यामुळे काही नियम केला नसेल तर पौर्णिमा सोडून जावे. दत्तप्रभूंच्या पादुकांवर प्रत्यक्ष अभिषेक करायचा असेल तर ७.३०-८ नंतर केला जातो आणि खिडकीपाशी बसून आपल्याला तो व्यवस्थित पाहता येतो. वाडीला दत्तप्रभूंचे तिसरे अवतार नृसिन्हासरस्वती ह्यांदेऊळ नी १२ वर्षे तप केले होते त्यामुळे ह्या स्थानाचे खूप महत्व आहे. पुजारीवर्गही अत्यंत श्रद्धेने उपासना करत असतात. परदेसाई म्हणतात तो घाट जरा पुढे आहे त्याचा स्नानाशी संबंध येत नाही. पण भाविकांनी टाकलेले निर्माल्य आणि प्लास्टिकच्या पिशव्या नदी खराब करतात. वाडीला कृष्णा आणि पंचगंगेचा संगम आहे. कृष्णा महाबळेश्वरहून तर पंचगंगा कोल्हापूरहून येते. सांगलीहून येणार असाल तर आधी औदुंबर करून मुक्कामी वाडीला येणे सोयीस्कर आहे. औदुंबरला गेलात तर समोर भुवनेश्वरीचे मंदिर आहे बोटीने जाता येते अथवा गाडी पण मंदिराच्या आवारात जाते. सध्या पाणी जास्त नसल्याने बोटिंगचा आनंद घेता येत नाही इथे सोयी वाडीच्या तुलनेत खूप कमी आहेत आणि बाजारही देऊळ सिनेमात दाखवल्याप्रमाणे आहे. पण गर्दी खूप नसते. औदुंबर, खिद्रापूर करून मुक्कामी वाडीला जाणे सोयीस्कर. सकाळी स्नान करून ( नदीवर स्नान करायचे नसेल तर १५ रुपयांना १ बदली गरम पाणी मिळते) करायचा असेल तर अभिषेक करून कोल्हापूर ला जाता येते. वाडीला बासुंदी अप्रतिम मिळते विठ्ठल मंदिराजवळ सोमाणांच्या खानावळीत उत्तम जेवण मिळते पण ते दिवसाच असते रात्री जेवायला 'अन्नपूर्णा' बेस्ट. कृष्णाकाठच्या वांग्याची चव जगात कुठेही मिळत नाहीत हवी असतील तर सांगलीत घेता येतात ( वाडीलाही मिळतात ). कोल्हापूरला येवून उत्साह असेल तर ज्योतिबा बघून रात्री महालक्ष्मीच्या देवळाजवळ हॉटेल किंवा धर्मशाळेत राहता येते. पहाटे लवकर उठून दिनेशदा म्हणाले तसे देवळात जाणे उत्तम कारण त्यावेळचे देवीचे रूप अवर्णनीय असते आणि असे दर्शन दिवसभरात होत नाही. कोल्हापुरात बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत दिवस कसा जातो ते कळत नाही. रात्रीच्या गाडीने पुणे, मुंबईला येता येते. देवदर्शन हा उद्देश ठेवून जाणार असाल तर पूर्ण श्रद्धेने जा ( मांसाहार टाळावा कारण कोल्हापूरात जावून पांढरा / तांबडा रस्सा न खाणे मांसाहारीच्या जीवावर येते ). गुरुदेव दत्त !!

मदत हवीय. आई आणि तिच्या मैत्रिणी ३ -४दिवसा करता कोल्हापुर ला जायचा विचार करत आहेत, सोमवारी पहाटे निघुन गुरुवारी दुपारी ठाण्यात परत यायचे आहे. स्वताची गाडी करुन जाणार. तर कुणी सांगु शकाल कि कुठे जावे, कुठे रहावे, वरची सगळि ठिकाण बघायची आहेत.

अजून जाऊन आला नसाल अस गृहीत धरून सांगत आहे .
मुंबई वरून संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान छत्रपति शिवाजी टर्मिनल्स - सह्याद्री एक्ष्प्रेस्स हि गाडी सुटती ती बरोबर पहाटे ५.०० च्या दरम्यान जयसिंग पूर येथे पोहचते , तुमी जयसिंगपूर येथे उतरून तीतून अगदी १ तासाच्या अंतरावर कृष्ण नदी काठी वसलेले अतिशय प्रसन्न असे नरसोबाची वाडी हे क्षेत्र आहे , सकाळी अतिशय सुंदर वातावरणात तेथील दर्शन घेऊ शकता , तिथून अगदी २० ते २५ किमी अंतरावर खिद्रापूर हे एक पाहण्यासारखे ठिकाण आहे (जुनी लेणी आणि कोरीव कामाचा एक अद्भुत नजर पाहायला मिळेल ) , वाडीतून कोल्हापूर हि फार फार तर १ ते १.३० तसच रस्ता आहे , कोल्हापूर मध्ये गेलात तर महालक्ष्मी चे दर्शन , त्यानंतर जोतीबा , पन्हाळा , आणि संध्याकाळी रंकाळा तलाव , अतिशय मस्त नजर असतो रात्रीचा .
वस्ती केलीच तर दुसर्या दिवशी कोल्हापूर पासून १५ किमी वर कणेरी मठ आहे , येथे तुमाला ग्रामीण भागातील बारा बलुतेदार , पाटील वाडा, जुनी मोठ , आड , विहीर , अश्या अनेक ग्रामीण भागाशी निगडीत गोष्टी पहावयास मिळतील (वसवलेले गाव ) , तीतून बाहेर पडल्यानंतर थोड्याच अंतरावर कात्यायनी हे क्षेत्र आहे , अतिशय छान व निसर्ग्याच्या सानिध्यात वसलेले हे आई कात्यायनी देवीचे मंदिर आहे .
तुमी दोन दिवस आरामात हि सगळी ठिकाणे पाहू शकता .

मी योगी यांच्याशी सहमत आहे. आम्ही गेल्यावर्षी दोन्ही वाडीला गेलो होतो. नरसोबा वाडीला भक्तनिवासमध्ये खरंच चांगली सोय होते.
आजही डोळे बंद केले तर मी वाडीला पोहोचते. नजरेसमोर येते संथ वाहाणारी कृष्णा...मंदीरातील घंटानाद...सायंकाळी निघालेली पालखी...
आणि कृष्णेकाठची पहाट आणि निवलेलं मन...
जायचेच असेल तर वाडीला मुक्काम करा. पहाटे मंदीरात, कृष्णेच्या निकट जा. बघा, मन कसं शांत शांत होतं. त्या वातावरणाशी, मंदीरातील पुजाविधीशी, घंटानादाशी उच्चारल्या जाणार्‍या मंत्रोपचाराशी तद्रुप व्हायला होतं. इतकं की डोळे उघडायची किंवा उठायची इच्छा होत नाही. कर्मकांडात फारसा रस नसेल तर मानसपुजेची अनुभूती घ्या.
औंदुबरलाही अशीच शांती अनुभवास येते. भुवनेश्वरीचे मंदीर देखणे आणि प्रसन्न आहे. फक्त गेल्या गेल्या बोटीची चौकशी करुन ठेवली तर सोयीचे होते.
हा सगळा अनुभव घेण्यासाठीच तर जायचे. त्यासाठी एखाद्या मुक्कामाचे प्लानिंग करता आले तर पहा. भोज्याला शिवून परत आले तर मग मनाला हुरहुर लागते. काहीतरी राहिल्यासारखे वाटते. परत जायची इच्छा असते पण जाणे होतेच असे नाही. अर्थात हे आपले माझे मत झाले. पण जिकडे जायचे तिथले होण्यासाठी एखादा तरी दिवस जास्तीचा काढावा असं वाटतं.
घरी आपण ठरवलं तरी इतका निवांत वेळ मनाला आणि आपल्यालाही मिळत नाही हे ही खरंच की नाही..

स्वामींचं नाव नृसिह सरस्वती आहे ना . मग नृसिह चं नरसोबा कुणी केलंय ? नृसिह वाडी का नाही म्हणत ? नरसोबा वाडी का म्हणतात ?

नृसिह वाडी का नाही म्हणत ? नरसोबा वाडी का म्हणतात ? >>>

अक्षय तृतियेला 'आकिती' का म्हणतात?
आदित्यवार ला ऐतवार का म्हणतात?

अनिल ला अन्या का म्हणतात?
अपूर्वाला अप्पू का म्हणतात?
दक्षिणाला दक्षे का म्हणतात?
तसेच काहीसे असावे! Wink

नृसिह वाडी का नाही म्हणत ? नरसोबा वाडी का म्हणतात ? >>>

अक्षय तृतियेला 'आकिती' का म्हणतात?
आदित्यवार ला ऐतवार का म्हणतात?

अनिल ला अन्या का म्हणतात?
अपूर्वाला अप्पू का म्हणतात?
दक्षिणाला दक्षे का म्हणतात?
तसेच काहीसे असावे! Wink

ती आमच्या कोल्हापूर ची पद्धत आहे

माणसाचा नावात आपले पण आणणं

आम्हाला पुणे, कोल्हपुर जोतिबा करायचे आहे.एका दिवसात परत, कसे मँनेज करावे,जमले तर खरेदी ही करायची आहे 17 जणींचा ग्रूप आहे

पुणे बेंगलोर् हायवेवरुन् शिरोलि च्या आधी टोप लागेल तिथुन उजव्या बाजुस एक छोटा रस्ता आहे. (पुण्याहुन येताना) हा जोतिबाला जातो. तिथुन अंबाबाई त्यानंतर नरसिंहवाडी
नरसिंहवाडीला ज्या रस्त्याने जाल त्याच रस्त्याने परत येताना हातकणंगले स्टॅंड समोरचा रस्ता किणि वाठार येथे हायवे ला जाऊन मिळतो. बहुतेक टोल हि वाचेल
Happy

जोतिबा जवळ पन्हाळा ही चांगला पॊईंट आहे.

पुढच्या विकांताला कोल्हापूरला यायचा plan आहे.
शनिवारी सकाळी पोहोचू. अष्टमी असल्याने गर्दी असेल , देविचे दर्शन सोमवारी करायचा विचार आहे.
स्वतः ची कार आहे. शक्यतो कोल्हापूरमध्येच राहण्याचा विचार आहे.सोमवारी दुपारी परत निघायच पुण्यासाठी.
रंकाळा, कणेरी मठ , पन्हाळा , खिद्रापूर , नरसोबाची वाडी
खादाडी , रहाण्याची सोय , खरेदी , फिरायचा plan --- any suggestions ??

राहण्यासाठी हॉटेल गोविंद पुरम..खरी कॉर्नर ला आहे..walkable from अंबाबाई देऊळ..
तिथेच जवळ मिसळ स्टेशन आहे...इतर फडतरे,चोरगे,गावरान मिसळ पण आहेत.. दावन गिरी डोसा अर्धा शिवाजी पुतळ्याजवळ...राजाभाऊ भेळ खा...
राजमंदिर चे पेरू आइस cream मस्त आहे....

वाडी ला जायचे ठरत आहे गुरुवार शुक्रवार शनिवार असे तीन दिवस कोल्हापूर दौरा करायचं ठरत आहे,
सगळ्यात आधी वाडी ला जायचं आहे तर राहण्याची चांगली सोय कुठे होईल?
कोल्हापूर साठी 3 दिवस ठीक होतील की जास्त होतील?कोल्हापूर मध्ये राहण्याची सोय कुठे करता येईल(कमी खर्चात चांगली सोय होऊ शकेल का? वाडी किंवा कोल्हापूर ला)
सोबत अपंग सासू आहे so खूप जास्त चालणे असणारी ठिकाणे नकोत उदा कणेरी मठ

Pages