नरसोबाची वाडी आणि कोल्हापुर बद्दल माहिती हवी आहे

Submitted by मी अमि on 28 November, 2012 - 02:15

नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरावे? सांगलीच्या गणपतीचे आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे आहे. तेव्हा प्रवासाचा क्रम कसा ठेवावा. मुंबईहून ट्रेनने जायचा बेत आहे. कॄपया चांगली हॉटेल्सही सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाडीला जायचे असेल तर सांगली मधे उतरावे लागेल. वाडी आणि औदुंबर जवळजवळ आहेत. ते करुन त्याच दिवशी कोल्हापुरात जाता येईल. एक रात्र राहून सकाळी देवीचे दर्शन घेता येईल. हाटेल साठी पास Sad

सांगली स्टेशनबाहेर पेड टॅक्सी वगैरे मिळतात का? >> नाही बहुदा.. सांगली रेल्वे आणि ST कॅण्ड बर्‍यापैकी लांब आहे Happy रिक्षा सोय आहे.

मुंबईहून सांगली स्टेशनला या. तिथुन रिक्षाने किंवा चालत गणपतीचे देऊळ पहा.

मग रिक्षा करून सांगली स्टँड गाठा.

तिथून कुरुंदवाडकडे जाणारी बस पकडा.

एक तासात वाडीला पोहोचाल.

वाडीत उतरा.

दत्तदर्शन करा.

वाडीतून कोल्हापूरला डायरेक्ट बसेस आहेत.

किंवा वाडीहून जयसिंगपूरला या. तिथुन कोल्हापूरला जायला भरपूर सोय आहे.

वेळ मिळाला तर कुरुंदवाडला येऊन आंबा३ महाराजांचे दर्शन घ्या! Proud

सांगली स्टँडवर हॉटेल्स आहेत. वाडी स्टँडवरही हॉटेल आहे.

कोल्हापुरात चार वाजता जरी पोहोचलात तरी देवदर्शन करुन रात्रीच्या खाजगी बसेसने जाऊ शकाल.. पण थोडी दगदग होईल.

हॉटेल तसेही तुम्हाला सोयीचे होणार नाही... कारण माझ्या प्लॅन नुसार तुम्ही येणार सांगलीत आणि जाणार कोल्हापूरहून, हॉटेलचा मग उपयोग काय?

किंवा हा एक प्लॅन...

सांगली गणपती करा. वाडीला या. वाडीत हॉटेलवर रहा. वाडी पहा. रात्री तिथेच रहा. दुसर्‍या दिवशी पहाटे कोल्हापूरला जा. दुपारनंतरच्या गाड्ञ्ना वाडीत प्रचंड गर्दी असते- कोणत्याही दिवशी आलात तरी... पहाटेच्या गाडीला हा त्रास होणार नाही. दुसर्‍या दिवशी कोल्हापूर पहा. तिथुनच मुंबईला परत जा.

अमि, एवढी दगदग करु नका. कोल्हापूर हि निवांतपणे राहण्याची जागा आहे. तिथे मुक्काम करा. तिथून एकेका दिवसात वाडी, सांगली होईल.

आमच्या कोल्हापूरात खाण्या / बघण्यासाठी भरपूर काही आहे. वाहतुकीच्या सोयी पण तिथून चांगल्या आहेत.
महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वेळा तेवढ्या सोयीच्या नाहीत. रस्ता उत्तम असल्याने, कोंडूसकर / घाटगे पाटील यांच्या बसने प्रवास केल्यास, पोटातले पाणी पण हलत नाही. चेंबूरला या गाड्या थांबतात. येताना, प्रियदर्शिनी ला पण थांबवता येतील.

दिनेशदा.... हम्म... बाय रोड जायचाही पर्याय चांगला आहे म्हणा. पण प्रायव्हेट बसेस मध्ये रात्री २-३ वाजेपर्यंत सो कॉल्ड विनोदी चित्रपट लावले जातात, त्यांचा मी धसका घेतलाय.

वाडीत राहिलात तर दिवसभरात एक काम करु शकाल... स्पेशल रिक्षाने खिद्रापूरला जाऊन येऊ शकाल... ३००-४०० रु घेतील... खिद्रापूरचे देऊळ पहा... बसेसही आहेत. पण अगदी कमी आहेत. दोन दिवसाच्या प्लॅनने आलात तर हे सांगली वाडी खिद्रापूर कोल्हापूर सगळे मॅनेज होईल .

तीनांब्या, तो खिद्रापूरचा रस्ता सुधारलाय का?
आम्ही दोनेक वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा खाडबाड खाड्बाड बैलगाडीत बसल्यासारखे गेलो होतो. देऊळ्सुंदर आहे यात वाद नाही. मी माबोवर फोटो टाकले होते त्याचे.

कोंडुसकर च्या स्लीपर्स आहेत. त्यात बेड्स आहेत. झोपून जाता येते. अजिबात व्हीडिओ वगैरे नसतो.
येताना या बसेस रात्री साडे अकराला वगैरे सुटतात , तेवढ्या वेळात सोळंकीकडचे मोठे आईसक्रीम कॉकटेल खाता येते, त्या आधी महाराजा / गोकूळ मधे भरपेट जेवता येते.

कोल्हापूरात पहाटे पोहोचले तर थेट अंबाबाई गाठायची. पहाटे पाच वाजता, जसे दर्शन होते, तसे दिवसभरात कधीच होत नाही.. जगदंब !

खिद्रापूर मात्र बघाच. पण गाड्या कमी आहेत.

मुंबईहून सांगली स्टेशनला या. तिथुन रिक्षाने किंवा चालत गणपतीचे देऊळ पहा. >> चालत खूप लांब आहे. रिक्षानेच जावे लागेल.

मुंबईहून कोल्हापूरला आधी जाउन मग तिथून वाडी आणि सांगली करा आणि सांगलीतनं बसनं/ट्रेननं मुंबईला परत जा. कोल्हापूरला स्टँडवरच तुम्हाला भाड्यानं गाडी करता येइल. खिद्रापूर, वाडी आणि सांगलीचा गणपती एका दिवसात करता येइल (थोडी दगदग होइल पण करणं शक्य आहे)

आंबा ३ आणी दिनेशजींना धन्यवाद. माहिती सेव्ह करते. वाडीला जायचे आहेच आगामी काही दिवसात. त्यामुळे तिकडे जाऊन कामे आटोपल्यावर किंवा अंबाबाईचे दर्शन घ्यायचे बेत आहेत.

कोल्हापूरात एक रात्र रहाण्याकरता हॉटेल सुचवा.

खादाडी काय काय आणि कुठे करावी?

स्टँडजवळच बरीच आहेत. रेल्वेस्टेशनसमोर पण आहेत. शक्य असल्यास आधी बुकिंग करा.

अभिमानाने सांगतो, कोल्हापूरात बेचव असे अन्नच मिळत नाही.. अगदी लकी बाजाराच्या बाहेरच्या गाड्यावरचे खा किंवा मोठ्या हॉटेलमधे खा.

कोल्हापूर मधे एकदा रात्री `नित्त्या' नावाच्या हॉटेलमधे जेवलो होतो. बरोबरची सर्व आबालवृद्ध मंडळी पण खूश होती जेवणावर.

वेदभवनात रहायची सोय आहेका माहीत नाही.. त्यांच्याबरोबर काही पूजा काँट्रॅक्ट असेल तर कदाचित मिळत असेल, कल्पना नाही.

कोल्हापुरात कुठेही जेवण करा.......मस्त तांबडा पांढरा रस्सावर ताव मारा......... फक्त मिसळ खाताना जपुन....लय तिखट राव......

ठाणा किंवा सायनहून रात्री आट ते नऊच्या सुमारास बसेस निघतात. त्या कोल्हापूरला सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान पोहोचतात. ८ ते १० तासांचा प्रवास आहे.

Pages