Submitted by पियू on 27 November, 2012 - 11:02
हा धागा घरून काम करणार्या लोकांसाठी.. भारतातले आणि बाहेरचे सुद्धा..
इथे तुम्ही चर्चा करू शकता:
१. हा निर्णय तुम्ही का घेतलात (घरून काम करण्याचा)
२. तुम्हाला आलेल्या/ अजूनही येत असलेल्या अडचणी
३. तुम्ही त्यांच्यावर शोधून काढलेले उपाय/ मार्ग
४. काही सकारात्मक बाबी (घरच्यांना/ मुलांना वेळ देता येतो याव्यतिरिक्त)
५. इतर कोणाला घरुन काम करायची इच्छा असल्यास उपलब्ध असलेले पर्याय
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद धागा काढल्या
धन्यवाद धागा काढल्या बद्दल,
गेले ३ महिने मी नोकरीचा राजीनामा टाकुन घरी आहे.
मी एच आर हेड म्हणुन काम केले आहे. आता घरच्या जबाबदार्या संपल्या आहेत. नोकरीत फार्सा रस राहिला नाही.
मला एच आर संदर्भात ७०-८० टक्के घरुन काम कसे मिळेल ? २०-३० टक्के साईट व्हिजीट मिटींग ला अडचण नाही.
किंवा अन्य काही पर्याय सजेस्ट करु शकाल का ?
जेथे ऑन लाईन काम खात्रीलायक असते अश्या साईटस च्या लिंक दिल्यात तर आभारी होईन.
साईटएचआर किंवा एचआर डॉट कॉमचे
साईटएचआर किंवा एचआर डॉट कॉमचे मेंबर व्हा आपले अनुभव ज्ञान इतरांना वाटा, संधी आपोआप येतील असे नाही. पण सोशल नेटवर्किंग वाढेल. आणि संबंधित लोक तुम्हाला ओळखू लागतील. संधी शोधता येतील.
मानव संसाधनात घरून काम करण्यासारखे रिक्रुटमेंट, ट्रेनिंग असते. साईटवर जायला तयारी असेल तर लेबर प्रॅक्टिशनरकडे चौकशी केल्यास फायदा होईल
आपणास मनापासून शुभेच्छा.
www.elance.com
www.elance.com
मी स्वतःची कन्सल्टन्सी करते.
मी स्वतःची कन्सल्टन्सी करते. माझ्याच क्षेत्रातली इतर वेगळी कामे - जी इथे लिहित नाही ..
घरच्यांचा सपोर्ट महत्वाचा . मी घरी पेशंट बघते . फ़ोर्मल बैठक आहे बैठकीच्या खोलीत . उत्तम इंटिरियर . त्यामुळे प्रश्न नाही . इतर डॉक्टरांच्या क्लिनिक ला पण जाते - बोलावल्यास . पेशंट असल्यास.
१. माझी सुरुवात होती , तेव्हा घरच्यांचा सपोर्ट होताच .
२. अजूनही स्ट्रगल पिरेड आहे . जोवर लोकांना भले मोठे मूर्त स्वरूप दिसत नाही , तोवर त्यांना कळतच नाही मी काय करते आहे ते !
एकतर माझे फिल्ड वेगळे . त्यातून मी वेगळे काही करण्याचा प्रयत्न करीत आहे.
३. पैशाची दरमहा हमी असलेले उत्पन्न नाही .
४. अनेक कामे करावी लागतात . खूप गोष्टी टेक्निकल , व्यावहारिक शिकले अनुभवातून . नोकरी मध्ये हे झाले नसते.
५. नोकरीतील राजकारणा पासून दूर आहे .
६. दुसर्याच्या हाताखाली काम करावे लागत नाही .
७. आमच्या क्षेत्रात पैसा फार कमी नोकरीत . त्यामुळे पायाभरणीसाठी मी आत्ता झगडले तर योग्य वयात नीट सेटल होईल.
८. मी कधीतरी खचून जाते तेव्हा अनेकांचे मैत्रीपूर्ण मार्गदर्शन मिळाले .
९. इथे सारे काही आपणच करायचे असते . मनाची समजूत पण आपणच काढायची . अखंड काम , नव्या संधी शोधणे.
१०. पैसे आणि त्यानुसार खर्च वगरे बघणे देवाच्या कृपेने फार अवघड नाही गेले. मी उपजतच कंजूस … हाहा
११. आपल्यावर काही जबाबदार्या पडायच्या आत स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास शुभारंभ करा . ही महत्वाची टीप .
१२. आपल्याकडे व्हिजन नसेल , तर व्यवसायाच्या भानगडीत पडू नये . आणि सुरुवातीचे अडथळे , अनेक गोष्टी आपण अनुभ्वान्तीच शिकतो तरी अनुभवाने नैराश्य येऊ देणे नाही .
१३. स्वतःला काय हवे हे खूपच क्लियर हवे . यासाठी घरातील परिस्थिती - मानसिक , आर्थिक , स्वतःचे शिक्षण इत्यादी अनेक गोष्टी महत्वाच्या .
जर महिन्याला ठराविक उत्पन्न हवे असेल , नाहीतर मानसिक दडपण येणार असेल तर नोकरी च बरी .
१४. स्वतःचे छंद , उत्तम पुस्तके , चांगल्या माणसांचा सहवास अशा काही चांगल्या गोष्टी बरोबर असतील तर हा अवघड प्रवास काहीसा सुसह्य होतो हे नक्कीच .
१५. लोक खरच खूप गृहीत धरतात, हे खरे . आणि सुट्टीच्या दिवशी किवा घरातले लोक घरी असतील तर सारे बिनसून जाते. नाहीतर आपले - आपले शेड्युल असते . सकाळी इतका वेळ , मग लंच टाइम , चहाची वेळ , फोन वर गप्पांची वेळ :))
१६. मानसिक स्वास्थ्य , मूड , डोकं ठिकाणावर असणे महत्वाचे . सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा . प्रोफेशनल टच येण्यासाठी खर्च फार वेगवेगळ्या अंगांतून मेहनत करावी लागते .
१७. कोणाला सल्ला / गप्पा मारायच्या असतील / त्यांच्या समस्या शेअर करायच्या असतील तर बिनधास्त विपु करा . कारण मला माहित आहे , कोणत्याही क्षेत्रातील व्यवसाय असला तरी सुरुवातीला मिळालेले लहानसे सपोर्ट पण फार महत्वाचे ठरतात.
L&L चे घर आणि घरून काम
L&L चे घर आणि घरून काम यासंदर्भात नियम, अनुभव, उदाहरणे वगैरे माहिती असतील तर प्लीज शेअर करा.
म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायासंदर्भातल्या क्लाएंट मिटींग्ज L&L च्या घरात करू शकता का?
किंवा विविध प्रकारचे क्लासेस वा वर्कशॉप्स हे L&L च्या घरात चालू शकते का, त्यासंदर्भाने काय नॉर्म्स आहेत?
नी L & L चे प्रोफेशनल रूल्स
नी L & L चे प्रोफेशनल रूल्स हे सोसायटी अंतर्गत बदलतात. आमच्या सोसायटीमध्ये डान्स क्लासेस, बेबी सिटींग, केटरिंग, घरगुती ब्युटीक्स व ब्युटीपार्लर्स (यात क्लायंट्स मैत्रीणी म्हणून किंवा रिलेटिव्ह्स म्हणून येतात), सोसायटी मधल्या मुलांचे ट्युशन्स, हॉबी क्लासेस चालवले जातात पण इन्स्टीट्यूट्स, ऑफीशियल मिटींग्ज यांना परवानगी नाही. दुसरे मेंबर्स ऑब्जेक्शन घेऊ शकतात. बर्याच सोसायट्यांमध्ये अशी परवानगी नसते म्हणे. पण माझ्या मामेसासर्यांचे अशील त्यांना घरी येतात भेटायला. यात तुमचे नाव आणि सोसायटीमधील मानाचे स्थान तसेच इतर मेंबर्स सोबत असलेले रिलेशन्स महत्वाचे ठरतात. सोसायटी ऑफीसमध्ये रितसर लेखी अॅप्लीकेशन देऊन परवानगी घ्यावी हे उत्तम.
L&L चे घर आणि घरून काम
L&L चे घर आणि घरून काम यासंदर्भात नियम, अनुभव, उदाहरणे>>
1. सोसायती मीतींग घेउन नियम थरवएते.
२.in our society we charge 20 % extra maintenance (10 % for L&L +10% for commercial use of premise)
3.Coaching classes are not allowed.
commercial use of premise
commercial use of premise <<
याच्यामधे काय काय येऊ शकते?
उदाहरणार्थ (ही उदाहरणे आहेत. मी हे करतेच आहे असे नाही. पण कदाचित इव्हेन्च्युअली करेन.)
१. मी घरात बसून लिखाण करून दिले, जे नेटवरून पाठवले किंवा कुरिअर केले. आणि समजा महिन्यातून एकदा माझ्याकडे लिखाणासंदर्भात एखादी मिटींग होते तर तो कमर्शियल यूज होतो का? कसा? आणि यामधे वेगळा मेंटेनन्स सोसायटीला काय करावा लागतो? रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमधे गेस्टस येऊ नयेत असा नियम नसतो. महिन्यातून एकदाच काय दहावेळाही पाहुणे येतात लोकांकडे.
२. मी काही हस्तकलेच्या वस्तू माझ्या घरात बसून बनवल्या. यामधे जास्तीचे पाणी वा वीज लागत नाही, ड्रेनेजवर वेगळा ताण येत नाही, याचा होईल तो कचरा मी वेगळा नेऊन टाकते, काम करणारी मी एकटीच आहे, मदतनीस वा इतर असिस्टन्स करणारे लोक महिन्या दोन महिन्यातून एकदा येतात. आणि एकावेळेला २ माणसांपेक्षा जास्त येत नाहीत.
या बनवलेल्या वस्तू मी घरात स्टोर केल्या आणि ऑनलाइन विकल्या. सोसायटीला यामधे वेगळी काय तोशीस पडली की माझ्यावर २०% किंवा तत्सम पेनल्टी लावावी?
वरच्या उदाहरणांमधल्या क्लाएंट
वरच्या उदाहरणांमधल्या क्लाएंट मिटींग्ज किंवा लोक घरी येणे वजा केले तरीही सोसायटी पेनल्टी लावू शकते का?
पेनल्ती म्हनजे दंड या अर्थी
पेनल्ती म्हनजे दंड या अर्थी असेल तर तो वेगळा असतो.
१. सोस्सायटी ने मीटींगमधे बहुमताने थरवले तर तुम्हाला Extra maintenance द्यावा लागेल.
२.उदा. आमच्याच सोसायटीमधे घरमालकाचे(ते राहतात दुसरीकदे) एक Agency कार्यालय आहे.it is registered office for 2 different business ventures त्यात त्यांची बायको As assistant बसते आणि फोनवर निरोप घेते. फार फार तर एखादी मीटिंग होत असेल .आम्हाला तरी कधी कोणी जाता येताना दिसत नाही. त्यांचे Actul manufacturing and distribution MIDC मधुन होते.कधीतरी एखादा मोठा खोका आतबाहेर होतो.पाण्याचा वापर इतराम्च्या मानाने नगण्य . तरी देखील त्यांना नियमानुसार Commercial use चे १०% जास्त द्यावे लागत्तात.
जर भाडेकरु असते तर २०% जास्त द्यावे लागले असते.मग ते वरचे १०% कदाचीत मालकने दिले असते.
३.त्या उलत दुसर्या सदनिकेला Students नी भाड्याने घेतले आहे. प्रचंड पाणी वापर ,गाड्या येजा तरीही त्यांच्याकडुन फक्ळ १०% Extra maintenance घतला जातो L&L चा.
I know this is unjust, but rules are rules. you can always demand change of rules in society meeting .
४. सोसायती अवाच्या सवा रक्कम मागत असेल तर तुम्ही challenge करु शकता.किंवा तुमच्या निरुपद्रवी व्यवहार जसे की online goods, सोसायतीला कुठलीही कल्पना न देने हे उपायही आहेत.
५.पण मागील पोष्ट वाचल्यावर असे दिसते की तुमचे Full-fledged office आहे, त्याचा Extra maintenance,
Not penalty तुमच्या सोस्सायटीने जो काही थरवला असेल तर द्यावा लागेल.
Still I will recommend to read latest rule book on society laws and bylaws which keep changing.
६. जर तुम्ही मालक नसाल तर अशा गोष्टींकदे दुर्ल्ख केले तरी चालते
.अंतिम वसुली मालकांकदुन होइल जर सोसायटी फारच Aggressive असेल तर. बर्याचदा
अशा वसुलीसाठे जो वेळ द्यावा लागतो तो कुणाकडेच नसतो. मालकांना मात्र कधी न कधीहे पैसे द्यावेच लागतात.
७. कित्येक घरगुती व्यव्साय करणारे लोक कुठलेच tax भरत नाहीत कि Extra maintenance देत नाहीत.कारण कुणालाही वेल नसतो ह्या followup साठी.
L&L चे घर आणि घरून काम
L&L चे घर आणि घरून काम यासंदर्भात नियम, अनुभव, उदाहरणे>>
बोर्ड लाऊन - जाहिरात करुन लोक येत असतील तर सोसायटीच्या लोकांना त्रास होतो. उदा लिफ्ट चा अतिरिक्त वापर, सोसायटीच्या आवारात होणारी घाण इ>
परंतु आपण जाहिरात न करता काही लोक अनाहुत पणे, अनिवार्य असल्यास आपल्याला भेटायला येत असतील तर यावर सोसायटीचे ऑब्जेक्शन असायचे कारण नाही.
शॉप अॅक्ट चे लायसन्स मुळी घरमालक / सोसायटीच्या एन ओ सी शिवाय मिळत नाही ( जागा कर्मशियल असल्यास ) असा प्रश्न उद्भवत नाही.
घरुन काम करायचा अनुभव नहि
घरुन काम करायचा अनुभव नहि अजुन.....................
पन मिलाल्यास अवदेल करायला.......
Hii Mi darshana, thanyat
Hii
Mi darshana, thanyat rahte. Mala typing kiva data entrych kaam kute milel without investment.
Plz help me
Mi navi mumbait rahate. mala
Mi navi mumbait rahate.
mala hi ghar baslya data entry or copy paste ase kahi kam chalu karayche ahe.
konala kahi mahit asel tr sanga plzzzz.
"सकाळच्या" छोट्या
"सकाळच्या" छोट्या जाहिरातींमधे खुप जाहिराती येतात, घरबसल्या काम करून पैसे मिळवा. डेटा एन्ट्री, लिखाण काम, इ.

यामधे एक जाहिरात अशी असते की लिखाणाच्या कामासाठी पानाल १०० रू. मिळतील.
मला एक कळत नाही एवढे काय लिखाण काम असू शकते ?
आणि हे लोक टायपिन्ग किंवा कॉम्प्युटराईज्ड नाही का करून घेऊ शकत ?
जवळ जवळ रोज या अशा जाहिराती नेमाने येत असतात. म्हणजे जाहिरातींवर पण बक्कळ खर्च करत आहेत.
मी फोन करून पाहिल एक दोनदा, पण कधी नुसती रिन्ग वाजते तर कधी रिचेबल नाही असे झाले.
मला फार उत्सुकता आहे की असे कोणते लिखाण काम आहे ?
महेश याबबत इथे कुणीतरी
महेश याबबत इथे कुणीतरी लेखिकेने खारघर परिसरातील अशा जाहिरातीबद्दल अन्हुभव लिहिला होता आणि तो आनददायक नव्हता.
माझ्या ओळखीतील एका मुलीचा
माझ्या ओळखीतील एका मुलीचा डाटा एंट्री कामाचा अनुभव क्लेशदायी आहे. परंतु हे कदाचित कंपनी-सापेक्ष असेल. त्या मुलीला कामाचे पैसे देताना कंपनीचे लोक खूप चालढकल करायचे. तिला वेळोवेळी त्यांचा पेमेंटसाठी पाठपुरावा करायला लागायचा व एवढे करूनही केलेल्या कामानुसार पेमेंट मिळायचेच नाही. कंटाळून तिने तो जॉब सोडून दिला. नाउमेद करण्याचा हेतू नाही, परंतु पूर्ण खात्री करून मगच अशी कामे स्वीकारावीत ही कळकळीची विनंती.
महेश, हँडरायटींग जॉब स्कॅम?
महेश, हँडरायटींग जॉब स्कॅम? - http://www.maayboli.com/node/50223 हे वाचा. असल्या अमिषांना भुलू नका.
धन्स मामी !
धन्स मामी !
Pages