घरून काम करणारया लोकांचे हितगुज

Submitted by पियू on 27 November, 2012 - 11:02

हा धागा घरून काम करणार्या लोकांसाठी.. भारतातले आणि बाहेरचे सुद्धा..

इथे तुम्ही चर्चा करू शकता:

१. हा निर्णय तुम्ही का घेतलात (घरून काम करण्याचा)
२. तुम्हाला आलेल्या/ अजूनही येत असलेल्या अडचणी
३. तुम्ही त्यांच्यावर शोधून काढलेले उपाय/ मार्ग
४. काही सकारात्मक बाबी (घरच्यांना/ मुलांना वेळ देता येतो याव्यतिरिक्त)
५. इतर कोणाला घरुन काम करायची इच्छा असल्यास उपलब्ध असलेले पर्याय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. हा निर्णय तुम्ही का घेतलात (घरून काम करण्याचा) >> नवीन ऑफिस घेण्याइतके पैसे नव्हते म्हणून.

२. तुम्हाला आलेल्या/ अजूनही येत असलेल्या अडचणी>>

- स्त्री च्या बाबतीत घरच्या लोकांना ती घरात दिसत असल्याने घरकामासाठीच्या अपेक्षा असतात.

- बाहेरच्या जगाशी संपर्क नाही म्हटलं तरी कमी होत.

- सगळा दिवस एकाच खोलीत जातो. यामुळे कंटाळा फार लवकर येतो.

- घरात अचानक आलेले पाहुणे तुमचे कामाचे प्लान्स hamper करू शकतात.

- लोकांना असे वाटते कि तुम्ही दुपारी झोपा काढत असाल. Happy

- जर आधी नोकरीची सवय असेल तर सेल्फ डिसिप्लीन आणणे बरेच अवघड जाते. (कायम कोणीतरी काठी घेऊन मागे लागेल.. मग आपण काम पूर्ण करेल अशी सवय लागलेली असेल तर किंवा डेडलाईन्स असणार्या जॉब ची सवय असेल तर).

- स्वत:च स्वत:साठी कामाच्या डेड लाईन्स बनवा हे वाटते तितके सोप्पे नाही. थोडक्यात स्वयंशिस्त अंगी बाणवणे अवघड आहे. जे "work from home" चा पाया आहे.

३. तुम्ही त्यांच्यावर शोधून काढलेले उपाय/ मार्ग>>

- सध्यातरी काही नाही.

४. काही सकारात्मक बाबी (घरच्यांना/ मुलांना वेळ देता येतो याव्यतिरिक्त)>>

- कामाच्या फ्लेक्झिबल वेळा..

- बाहेरगावी गेल्यास काम अडून राहत नाही. नातेवाईकांची भेट पण होते आणि फोनला आणि नेटकनेक्टला रेंज असेल तर laptop वर व्यवस्थित काम पण चालू राहते.

घरून काम करण्याचं ऑप्शन तुम्हाला असलं तरी त्याच्या फार प्रेमात पडू नका.

घरून काम करण्याचे फायदे/तोटे सांगणारं एक अफलातून व्यंगचित्र इथे पहायला मिळेल. (थोडी अश्लिल भाषा आहे, सांगून ठेवतो, पण मार्मिक आहे)

http://theoatmeal.com/comics/working_home

१.मी केलंय घरून काम जवळपास चार वर्ष. लहान मुल सांभाळायला कोणी नाही, चांगलं पाळणाघर नाही इ कारणांनी घरून काम सुरु केलं. नंतर मुल थोडं मोठं झालं तरी ८-९ तास कामाचे आणि ४ तास कम्युटींगचे असं १२-१३ तास घराबाहेर काढणं मला आवडत नव्हतं म्हणून...

२. घरी असल्यामूळे घरातलं काम + घरून काम असं डबल प्रेशर. पूर्वीपासूनच घरात पाहूणे खूप होते, पण घरात आहेत म्हणून त्यांच्या अपेक्षा वाढायला लागल्या.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभर घरी असल्याने, कामाच्या वेळा फ्लेक्सिबल असल्याने मायबोलीवर टीपी, आळशीपणा करणे हे प्रकार वाढले. घरी दिवसभर टीपी करून मग रात्र रात्र जागून डेडलाइन्स सांभाळणे असला प्रकार सुरु झाला. सेल्फ डिसिप्लिन कमी पडायला लागलं.
प्रोफेशनमधल्या लोकांशी संपर्क कमी पडायला लागला. एकाच कंपनीकडून काम मिळत होतं. त्या कंपनीकडचे काम संपल्यावर नविन काम मिळवण्यासाठी त्रास व्हायला लागला.

३. घरकामाच्या बाबतित जोपर्यंत रोजचं ठरवलेलं काम संपत नाही तोपर्यंत घरातल्या बर्‍याच जास्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करायला शिकले. रोज कोणत्याही परिस्थितीत सकाळी १० ते १ आण२त२.३० ते ५.३० काम करायचंच हे ठरवलं. उरलेलं काम रात्री ८-९ नंतर.
पाहूणे आले तरी शक्यतो या वेळापत्रकामध्ये जास्त बदल करायचे नाहीत हे जाणिवपूर्वक पाळलं. (क्वचीत कधी काम नसलं तरी कामाशी संबंधित रिपोर्ट्स वाचणे, अभ्यास करणे या गोष्टी करायच्या, टिव्हीकडे दुर्लक्ष करायचं )
तरीही दिवसभर लॅपटॉप चालू असल्याने माबो वरचा वेळ कमी करता आला नाही. दिवसातून ठराविक वेळ ऑनलाइन काम करणे, बाकीवेळ ऑफलाइन काम करणे असे उपायही केले.

४. माझ्यासाठी सगळ्यात सकारात्मक बाब घर - मुलाला वेळ देणे आणि कम्युटींग मधला वेळ आणि दगदग वाचणे हा होता.
एक प्रयत्न म्हणून काही काळ अर्धवेळ कंपनीतून आणि अर्धवेळ घरून काम असेही करुन बघितले. पण कम्युटींगची खूप दगदग होत होती ४ तासाच्या कामासाठी साडेतिनतास प्रवास करण्यापेक्षा घरून काम करणे जास्त सोयीचे वाटायला लागले.

जर मला पुर्वीसारखीच कामं मिळत गेली असती तर मी बहूदा घरून काम करण्याचा पर्याय चालुच ठेवला असता. अगदी रोज नाही तरी आठवड्यातून २-३ दिवस तरी घरून काम आणि मिटींग्ज किंवा इतर बाबींसाठी ऑफिस असं करायला मला आवडलं असतं. पण असं होवू शकलं नाही आणि कमी कम्युटींगवालं काम सापडलं म्हणून घरून काम करणं बंद केलं.

माझं तर स्वप्नं आहे घरून काम करायला मिळण्याचं. पण ते स्वप्नंच राहणार बहुतेक. कम्युटिंगमध्ये खूप वेळ जातो.

मी घरुन काम करते. मला सगळ्यात मोठा फायदा वाटतो, तो म्हणजे "तयार होऊन बाहेर पडायला न लागणे". हे जे तयार होणे आहे ना, त्यात ईतर अनेक गोष्टी आल्या. जसे कि, ऑफ़िसला सूट होतील असे कपडे, अ‍ॅक्सेसरिज खरेदी करणे, कपड्याना इस्त्री करणे, डबा तयार करणे, गाडी असेल तर तिचे पोट भरणे नाहीतर वेळेवर स्टॉपवर पोचणे....इ...इ...

बाकी नकारात्मक बाबी फारशा नाहीएत माझ्या कामात, फक्त रात्रीपण काही वेळ बसावे लागते, त्याचा थोडा कन्टाळा येतो, पण ठिक आहे.

हा निर्णय तुम्ही का घेतलात (घरून काम करण्याचा) <<<
स्वतःचे वेगळे ऑफिस थाटणे खिशाला शक्य नाही आणि सध्या गरजेचे नाही.

तुम्हाला आलेल्या/ अजूनही येत असलेल्या अडचणी <<<
१. असिस्टंटस, ड्रेसमेन किंवा कामासंदर्भातल्या इतर लोकांना ऑफिसमधे बोलवायचे म्हणजे डायरेक्ट घरी बोलवावे लागते आणि मग २४ तासाची कामवाली घरात नसल्यामुळे पाहुण्यासारखी चहापाण्याची उस्तवार मलाच काम बाजूला ठेवून करत बसावी लागते.
२. कामवाल्या बायकांना मी काही काम करत बसलेली आहे त्यामुळे समोर दिसले तरी तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला, गप्पा मारायला मी उपलब्ध नाहीये हे झेपत नाही/ समजत नाही. परिणामी कामवाल्या असतात त्या १-२ तासात करायचे काम हे अतिशय टाइमपास स्वरूपाचे किंवा मग काम न करता इतर काही असे करावे लागते. हे नेहमीच शक्य होते असे नाही.
३. कुठल्याही प्रकारची सर्व्हिस ज्यांच्याकडून आपण घेतो ती सगळी माणसे आपल्या मनाप्रमाणे उगवतात. त्यांच्या दृष्टीने 'मॅडम थोडीना काम करती है.. वो तो घरमेही होती है!' असं असतं
४. घरबशेगिरी वाढते.
५. माझ्या कामाचा पसारा वाढतोय आणि त्यात व्हरायटी प्रचंड असल्याने मल्टीटास्किंग करायचे तर जागा मोठी हवी. ती मिळत नाही.

तुम्ही त्यांच्यावर शोधून काढलेले उपाय/ मार्ग <<
अगदी नाइलाज असल्याशिवाय मी कामाच्या मिटींग्ज घरी करत नाही. बाहेर कॉफी शॉपमधे किंवा त्या त्या प्रोजेक्टच्या मेन ऑफिसवर बोलावते. आमचेच प्रोजेक्ट असेल तर मेन ऑफिस म्हणजे नवर्‍याचे ऑफिस असतेच. ट्रायल्स डिरेक्टरच्या हपिसातच करते. ड्रेसमेन/ सेटिंगदादा/ स्पॉटस फक्त पेट्या उचलायच्या वेळेलाच येतात. असिस्टंटस हे बर्‍याचदा घरातले होऊन जातात त्यामुळे ज्याच्या हाताला सवड त्याने चहा करायचा आणि ज्याच्या हाताला सवड त्याने कपबश्या विसळायच्या असे होते.
दुसर्‍या आणि तिसर्‍या मुद्द्यावर काहीही उपाय नाहीत.
चौथ्या मुद्द्यावर म्हणायचं तर रोज संध्याकाळी तरी बाहेर पडायचेच किंवा बाहेर जाऊन करायची काही कामे नियमितपणे आपल्या अंगावर घ्यायची. बरे पडते.
पाचव्या मुद्द्यावर उपाय म्हणजे काम असे आणि इतके वाढवायचे की हपिस + स्टुडिओ थाटण्याची ऐपत येईल.

काही सकारात्मक बाबी (घरच्यांना/ मुलांना वेळ देता येतो याव्यतिरिक्त) <<<
घरच्यांना, मुलांना वेळ देता येणे ही माझ्यासाठी 'नॉट अ‍ॅप्लिकेबल' बाब आहे तर ते असो.
१. हपिस थाटण्याचे, सफाईचे वगैरे सगळेच पैसे वाचतात
२. मी दिवसातल्या कुठल्याही वेळी, आठवड्यातल्या कुठल्याही दिवशी कामाला बसू शकते. डेडलाइन्स असतील तर घरी पोचण्याची चिंता न करता रात्री-अपरात्री काम करत बसू शकते.
३. रात्री उशीरा काम संपवून घरी येण्यातली रिस्क नाही.
४. घरीच काम करत असल्याने ऑफिसमधे जाऊन बसायच्या वेशभूषेचे डेकोरम पाळायची गरज नसते. परिणामी वॉर्डरोब मर्यादित ठेवता येऊ शकतो.
५. असिस्टंटस, इतर टेक्निशियन मित्र जे एखाद्या प्रोजेक्टमधे बरोबर काम करतायत अश्यांबरोबर बसून वेळेची चिंता न बाळगता काम करता येते. आपले काम वेळच्यावेळी पूर्ण व्हावे म्हणून त्यांना घरी थांबा काम उरकून इथेच पडी टाका आणि सकाळी उठून जा हे म्हणता येते. विशेषतः 'चलो मै कुछ खानेको बनाता हूं!' म्हणणारे उत्साही सहकारी असतील तर नक्कीच. Happy

पण जर तुम्ही एकत्र कुटुंबात रहात असाल तर पैसे वाचतात आणि ऑफिसच्या वेशभूषेचा डेकोरम पाळायची गरज नाही हे सोडून कुठलेही फायदे मिळण्याची शक्यता नाही. अडचणी मात्र अनंत...

मी आर्किटेक्ट आहे. नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे ठरवले, तेव्हा सुरवातीला काम कमी असल्याने सगळा वेगळा मांड मांडण्यापेक्षा घरून काम करणे सोपे वाटले. पण त्यात मिटिंगसाठी लोकांना घरी बोलवायला नको वाटणे, पाहुण्यांमुळे कामात अडथळा येणे, साबा-साबू टी.व्ही. बघत बसल्याने एकाग्रता न होणे इ.इ. अडचणी होत्या.

कामाचा व्याप वाढत गेला आणि मदतनीसाची गरज भासू लागली. घरात ते अवघड होत. त्या दरम्यान नवी सदनिका घेताना वर-खाली दोन घेतल्या. वरची बैठकीची खोली माझ ऑफीस झाली. त्याला बाहेरून दरवाजा आहे. त्यामुळे ऑफीस संदर्भातील लोक बाहेरच्या बाहेर येऊ शकतात. मी आतल्या जिन्याने ये-जा करते.

तोटे म्हणले तर, घरचे लोक गृहीत धरतात, मन एकाग्र करणे कठीण जाते. आपण मन लावून करत असलेल्या कामाला व्यावसायिक रूप न येत घर सांभाळून केलेल्या अर्धवेळ व्यवसायाचे रूप येते. कामाचे पैसे मागताना काही जणांनी मला हे ऐकवले आहे!

फायदे बरेच आहेत. मुलगा लहान असताना त्याला आणि आता साबा गेली ७ वर्षे अंथरुणावर असताना कामाच्या बायकांना माझा आधार/ धाक वाटतो. ऑफीस कधीही चालू करता येते किंवा सुट्टी घेता येते. डेडलाईनसाठी रात्री काम करताना घरीच असल्याने एकटे वाटत नाही. कामाच्या स्वरूपामुळे साईट/ मीटिंग/ मनपा असे फिरावे लागतेच. निदान घर-ऑफीस चकरा नाहीत. रोज सकाळी उठून तयार व्हावे लागत नाही, हा मुद्दा अश्विनीने मांडला आहेच. जो मलाही लागू होतो.

योग्य धागा योग्य वेळी वाचनात आला. मी राजिनामा दिला आहे. आता महिन्याभरात मोकळी होइन. घरातुन क्न्सल्टन्सी चालु करते आहे. आर्थात माझ्या कामाचं स्वरुप बघता क्लाएंट्च्या ऑफिस मधे जाणे अपरीहार्य आहे. तसेच घरुनच शेअर ट्रेडिंग करणार आहे. क्लाएंट खुप फ्लेक्झीबल आहेत. कामही आवडीचे आहे. हा निर्णय घ्यायचे कारण
१. मुलगी वेड्या वयात आहे ( ११ पुर्ण १२ चालु). माझ्या शी खुपच अ‍ॅटॅच आहे. ( मी ही माझ्या आईशी अजुनही आहे)
२. इतकी वर्ष ( सी.ए. झाल्या पासुन गेली १७-१८ वर्ष) मी प्रचंड बीझी होते. अगदी ८ ते ८. त्या मुळे आयुष्यात एक मरगळ आली होती. ती झटकायची होती.
३. साबा आणि सासरे आता ७०-७५ आहेत. खुप अ‍ॅक्टीव्ह आहेत. तरी पण थकले आहेत. ( माझ्या इतक्या वर्षात त्यांनी प्रचंड मदत केली म्हणुन माझ्या उड्या)
४. पोटापुरते सेव्हींग झालेले आहे.
५. नवरा खुप मोठ्या पोस्टवर आहे आणि खुपच चांगली करीअर आहे.
६. प्रक्रुतीच्या छोट्या छोट्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. त्या वेळीच अटेंड करायच्या आहेत.
७. माझे छंद ( जसे फोटोग्राफी, भविष्य शास्त्राचा अभ्यास, मुलीच्या बरोबर फ्रेंच शिकणे, पोहोणे) हे सगळे करायचे आहे.

हा माझा निर्णय गेली १ वर्ष होत नव्हता. पण समहाउ आता मात्र हा निर्णय पक्का झाला. ऑफिस मधे दिड महिन्या पुर्वी सांगितले. आणि आता मात्र निर्णय बरोबर होता हे जाणवते आहे.

माझा जनसंपर्क व प्रोफेशन असे आहे की कामे नक्कीच मिळतिल. कदाचित जास्त मिळतिल. पण तरी स्वतः वर घातलेले बंधन ढळु द्यायचे नाही हे नक्की. खुप बीझी व्हायचे नाही. खुप बीझी रहाण्याचा आणि कॉर्पोरेट लाइफ चा अतिप्रचंड कंटाळा आला आहे.

इतरांचे अनुभव वाचायला आवडतिल.

या निर्णयाबद्दल अभिनंदम आणि कामासाठी शुभेच्छा मोकिमी.
मी सध्या घरुन काम करण्याच्या फेजमधुन जात आहे. सध्या त्या काम करण्यामधे पैसा काहीच मिळत नाहीये पण तरी मजा येतेय आणि भविष्यात काहिना काही चांगले ( कमाईच्या बाबतीत ) होईल अशा आशेवर आहे. त्या दिशेने प्रयत्न चालु आहेत.
आत्तापर्यंत वर मांडलेल्यापेक्षा किंचित वेगळे मुद्दे असतील हे -
१- घरातल्या जबाबदार्‍या आपल्यावर येऊन पडतात आणि 'घरातच आहेस म्हणुन...' या कारणाने खुप कामे करावी लागतात हा एक निगेटिव्ह मुद्दा.
२- ऑफिस मधे काही टेन्शन वगैरे असेल तर घर ऑफिस असे वेगवेगळे ट्रीट केल्यास ऑफिसचे टेन्शन घरी त्रास देत नाही. ( म्हणजे हे मला जमायचे ऑफिसमधे असताना ) आता घर हेच कामाचे ठिकाण झाल्याने टेन्शन , प्रॉब्लेम्स वेगळे ठेवता येत नाहीत. आणि ते घरातल्यांशी बोलता/ वागताना अफेक्ट करतात.
३- ऑफिसमधे कलिग्सशी मधे पाच दहा मिनीटे बोलणे / कॉफी ब्रेक घेणे यात थोडे रिलॅक्स होता येते. घरी कोणाशी बोलणार? आणि कॉफी प्यायची तर स्वतःच करायला लागणार Wink
४- काम करत असताना कुणाचा फोन आला तर टाळता येत नाही. ऑफिसमधे असताना ऑफिसचे कारण देता येते घरी तसे देणे जरा कठीण होते.
५- कामवाल्या आणि इतर कामाचे लोक कुठल्याही वेळी उगवतात.
६- आपल्या कामाची कुणाला कदर नाही असे फ्रस्ट्रेशन येऊ शकते Wink

फायदेही बरेच आहेत. ते वर बहुतेक जणिंनी लिहीले आहेतच. मुलीकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो. कुणी आजारी असेल तर ते बघता येते.

घरातल्या जबाबदार्‍या आपल्यावर येऊन पडतात आणि 'घरातच आहेस म्हणुन...' या कारणाने खुप कामे करावी लागतात हा एक निगेटिव्ह मुद्दा.>>>>

हा मुद्दा अगदी बरोबर. हा धोका माझ्या बाबतित ही मला जाणवतो आहे. पण एकंदर माझ्या नवर्‍याची मानसिकता बघता अत्ता तो जी कामे करतो आहे तो ती करतच राहील. ( अत्ता तरी हसरी बाहुली). त्यातुनही जर कामे अंगावर पडली तरी पुढ्चं पुढे....

सावली सगळे मुद्दे पटले ( तुझी भावी स्टुडंट)

अरे हो.. एक फायदा लिहायचा राहिलाच..

माझ्यापुरत म्हणायचं तर मी सी.एस आहे तशी क्लासेस पण घेते आणि बाहेर कुठे कुठे शिकवते पण.. मी जर जॉब करत असते तर माझ्यातली शिकवण्याची कला मला वापरताच नसती आली.

शिकवायला बाहेरही जायला लागत असल्याने बाहेरच्या जगाशी अगदीच संपर्क तुटत नाही.

सो.. अजून एक फायदा असा कि, जोपर्यंत तुमचा कामाचा पसारा कमी आहे तोपर्यंत कामाच्या वेळा सांभाळून (ज्या तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ठरवू शकता), तुम्हाला अजून एखादा साईड बिझनेस करता येतो जो तुमच्या उत्पन्नाला चांगला हातभार लावतो.

ह्या इतक्या ढीगभर अडचणी असूनही मला घरून काम करायला आवडायचे /अजूनही आवडेल. प्रवासाच वेळ वाचतो हा माझ्या दृष्टीने खूप मोठा प्लस पॉइंट आहे.

मी मध्यंतरी घरून काम न करता ऑफिसला जावून बघितले होते काही दिवस. त्यावेळी दिल्लीच्या हिवाळ्यात सकाळी सातच्या आतसायकल रिक्षानी कुडकुडत मेट्रोपर्यंत जाणे. नंतर तासभर लॅपटॉपसकट बॅगचं ओझं खांद्यावर सांभाळून मेट्रोत उभं राहणं. स्टेशनवर उतरल्यावर परत १५ मिनिट सायकल रिक्षाचा प्रवास. परतताना ऑफिस आडबाजूला असल्याने बॅगचं ओझं खांद्यावर घेवून २० मिनीट चालत मेट्रो स्टेशन गाठणं आणि मग परत मेट्रो + सायकल रिक्षाचा सव्वा तासाचा प्रवास. आणि मेट्रो नको असेल तर स्वतःची चारचाकी घेवून सकाळ-संध्याकाळ दिड-दोन तास ट्रॅफिकमध्ये घालवणं.

शैलजा, सावली, वत्सला... धन्स...

हा निर्णय घेण्यात माबो चा ही सहभाग आहे. मागे इकडे " सुपर वुमन सिंड्रोम" हा अनिता ताईंचा लेख वाचला होता. लेखाचा उद्देश वेगळाच होता. तरी माझ्या मनात काही वेगळेच पडसाद ह्याचे पडले. त्याच बरोबरीने इतर लेख, वेगवेगळे छंद इकडे वाचत होते. माझी मला मी गवसत होते. खुप वेगळे वेगळे विचार..वेगवेगळ्या आयडिया... मनात कुठेतरी ह्या सगळ्याची सांगड घातली गेली. आणि निर्णय झाला. मुक्त असण्याची गरज वाटायला लागली. "जिंदगी ना मिलेगी दोबारातल्या" ह्रितिक सारखी "मेरी भी आंख खुली" . एके क्षणी "आता बास..आणि बासच" असा सगळ्या माहौल चा उबग आला. मन वेगळ्या वाटा शोधायला लागलं..... आणि वाट सापडली... एक वर्ष लागलं.. पण मार्ग मिळाला.

अभिनंदन मोकिमी आणि शुभेच्छा.. Happy
मेरेको नही घरसे कामका चान्स.. Sad
पण मला कितीही त्रास झाला तरी बाहेर जाऊनच काम करायला आवडेल हे तितकेच खरे. Happy

अभिनंदन आणि शुभेच्छा मोकिमी, खरच अशी वाट शोधणं, ती सापड्णं आणि त्यावर मार्गस्थ होण्याच्या निर्णयावर अंमल करणं खरच कौतुकास्पद आहे

मोकिमी अभिनंदन!

पियुपरी , चांगला विषय निवडला आहे.
लोकांचे अनुभव वाचायला आवडेल.

बहुदा घरून काम करण्यात स्त्रियांना पुरूषांपेक्षा जास्त अडचणी येत असाव्यात. कारण स्त्रिया घरी राहून काम करतात तेव्हा बर्याचदा त्याकडे बघायचा लोकांचा आस्पेक्ट ' घरबसल्या ' काम करून अर्थात फावल्या वेळात काम करून पैसे कमावतेय असा असतो.
आमच्या इथे डॉक्टर, वकील, इंजिनीयर, पिठाची गिरणी, ब्युटीपार्लर हे सगळे व्यवसाय ' आगे दुकान पिछे मकान किंवा उपर मकान नीचे दुकान ' असतात बहुतेकदा. Happy
त्यामुळे घरातूनच व्यवसाय करणे हा बर्यापैकी नॉर्मच आहे.

मोकीमीला शुभेच्छा! हा निर्णय घेणे आजिबात सोपे नसते, हे स्वानुभवावरून सांगते.

आवडीचे काम आणि चांगले पैसे देणारी नोकरी काही वैयक्तिक कारणाने सोडताना मनाला अक्षरशः इंगळ्या लागल्या होत्या. पण नवरा त्या दरम्यान वारंवार परदेशी जायचा. मलाही कामानिमित्त बरेच प्रवास करावे लागणार हे दिसत होते. साबा-साबू थकलेले. मग मन घट्ट करून राजीनामा दिला.

आता ह्या ‘नीचे मकान, उपर दुकान’ व्यवस्थेत चांगलीच स्थिरावले आहे. नोकरीएवढे पैसे अजूनही मिळत नाहीत. पण ताबेदारीसुद्धा नाही. माझ्या स्वतःच्या गरजा कमी आहेत. मिळतात त्या पैशात बचत करते. शिवाय आपले छंद जोपासायला, कधीतरी मैत्रिणीबरोबर मजा करायला वेळ मिळतो, तो अमोल आहे.

माझ्या स्वतःच्या गरजा कमी आहेत. मिळतात त्या पैशात बचत करते. शिवाय आपले छंद जोपासायला, कधीतरी मैत्रिणीबरोबर मजा करायला वेळ मिळतो, तो अमोल आहे.>>>>

तेच महत्वाचे अनया. नाहीतर कायम ८ ते ८ म्हणजे नरक असतो. आमच्या क्षेत्रात तर जेवढे तुम्ही जुने होता, तेवढे तुम्ही रुटीन मधे अडकत जाता. तोच तो मार्च, तेच ते रीपोर्ट्स, त्याच त्या मिटिंगा, सतत स्वतः ला पृव्ह करा, तेच ते ऑडिट, त्याच त्या डेड लाइन्स. तरी मी भाग्यवान होते की मला खुप छान छान फायनान्स असाइन्मेंट्स करायला मिळाल्या. एका मोठ्ठ्या कंपनीत सॅप सारखी इआरपी सिस्स्टीम राबवायला मिळाली. खुप शिकले. पण तेवढीच कंटाळले.

जेंव्हा तुम्ही कामाचा कंटाळा येवुन जॉब सोडत असता, तेंव्हा तुम्हाला अजिबात अपराधी वाटत नाही.

सॉफ्टवेअर / हार्डवेअर / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्र्टुमेंटेशन अशा इंजिनिअर्स ना पण घरून काम करता येते.

माझ्या ओळखितले २-३ सिनिअर सिटिझन्स इंजिनिअर नसतानासुद्धा आवड म्हणून रेडिओ / टीव्ही / पीसी / लॅपटॉप / मोबाइल रिपेरिंग अशा गोष्टी साइडबिझिनेस म्हणून करतात.

Pages