चिकन जालफ्रेझी

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 27 November, 2012 - 02:26

काल लग्नाचा वाढदिवस होता म्हटलं नवर्‍यासाठी काहीतरी स्पेशल करुया. पाईनॅपल केक तर तयार झाला होता. साथ में कुछ झणझणीत मंगता था. थोडी पुस्तकं चाळली. खालच्या दुकानातून चिकन घेऊन आले. वेगळं काय करावं हा विचार होताच. पण म्हटलं, आधी मॅरीनेशन तर करुन ठेवूया मग बघू पुढचं पुढे.

लग्गेच कृती सुरु केली. पुस्तकातली रेसीपी आणि माझी अक्कल ह्याचा छानसा(?) मेळ साधून सुपरहीट चिकन तयार झालं. अतिशय चविष्ट दिसणारं आणि लागणारं चिकन करायला अगदीच सोप्पंय.

DSC01813-001.JPG

साहित्य : मॅरिनेशन साठी

१ किलो चिकन,
३ टेबल स्पून टोमॅटो केचप,
लिंबाचा रस (साधारण २ लिंबांचा रस)(इकडे मोठी लिंबं रसदार मिळतात. त्यामुळे मी एकच घेतलं.)
२ टी स्पून लाल तिखट
मीठ

साहित्य : ग्रेव्हीसाठी

प्रत्येकी २ टी स्पून आलं, लसूण पेस्ट,
२ टेबल स्पून टोमॅटो प्युरी,
३ कांदे अगदी बारीक चिरुन,
२ अंडी फेटून,
१ टी स्पून हळद
२ टेबल स्पून हिरव्या मिर्च्या अगदी बारीक चिरुन,
१ टी स्पून बादशहा (किंवा कुठलाही) चिकन मसाला
तेल,
मीठ.

कृती :

चिकन स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळवून टाका.
मॅरीनेशन चं सगळं साहित्य एकत्र करुन चिकन ला चोळून ठेवा. साधारण २ तास झाकून ठेवा.
एका कढईत ३ टेबल स्पून तेल तापत ठेवा आणि त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या.
कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात टोमॅटो प्युरी घाला.
तेल सुटायला लागलं की त्यात आलं, लसूण पेस्ट घाला.
थोडं परतून नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या घाला.
मग त्यात हळद आणि चिकन मसाला घाला.
थोडं परतवून त्यात चिकनचे मॅरीनेट केलेले तुकडे घाला.
सगळं मिश्रण मस्तपैकी परतवून झाकण ठेवा.
साधारण १५ मिनिटात चिकन शिजत आल्यानंतर त्यात १ कप पाणी घाला.
पुन्हा झाकण ठेवा आणि चिकन पूर्ण शिजवा.
झाकण उघडल्यावर मस्त रसरशीत चिकन तयार Happy

पण थांबा पिक्चर अभी बाकी है .. Wink

फेटलेली २ अंडी त्यात घाला. मस्तपैकी ढवळा.
गरम असल्यामुळे अंडी लगेच शिजतील. छान ढवळल्यामुळे अंडी एकाच ठिकाणी न राहता सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील.
रश्श्याचं टेक्स्चर पूर्ण बदलेल पण घाबरु नका.
झाकण ठेवा ….आणखी एक वाफ काढा.
आता चिकन जालफ्रेझी एकदम तय्यार Happy

एका छानशा भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. तोंडाला पाणी नक्कीच सुटणार Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे रेसिपी --- पण आता एका प्रश्नाची उत्तरे तयार ठेवायची.. यात चिकन ऐवजी काय वापरता येईल !

सर्वप्रथम,
वाढदिवसाबद्दल अभिनंदन!.. Happy

"जालफ्रेझी" चा नेमका अर्थ काय...?

बाकी त्यातले चिकन वगळून ऊरलेले ईकडे पाठवा.. Happy

जयश्री... सुर्रेख रंगामुळे भलतीच अ‍ॅपिटायझिंग दिस्तीये डिश....
आपल्याला तर बाबा हीच हवी... नो चेंज

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. मस्त रेसीपी.
ह्या रविवारी घरी बनावे अशी तजवीज करण्यात येईल. >> मी पण विचार केला होता पण या रवीवारी संकष्टी आहे. सो नेक्स्ट सन्डे.
दिनेशदा सोया चंक किंवा मश्रूम्स वापरून केले तर...

शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद Happy

योग, "जालफ्रेझी" चा अर्थ माहिती नाही रे. खरं तर "चिकन जालफ्रेझी" ह्या रेसिपी मधे थोडीशी माझी अक्कल वापरुन केलंय तर ह्या पदार्थाचं नाव बदलायला हवं होतं Wink

तुम्ही लोक सुचवा एखादं झणझणीत नाव Happy

चिकन वगळून ........ नको रे...... सब मजा किरकिरा हो जायेगा Wink

विपा....... हो ज्ज्जाने दो Happy

जाल्फ्रेझी ही एक प्रकारचा रस्सा असुन मांसाचे पदार्थ दाट बनविण्यासाठी याचं प्रयोजन केले जाते. पंजाबी लोकं ह्यात मांस शिजल्यानंतर हिरव्या मिरच्या कच्च्या कापुन टाकतात त्या योगे ही भाजी फिक्की ते अति जहाल होते.
म्हणुन कदाचित तिला चिकन जहाल फ्रेझी म्हणत असावेत.

बादवे- केरळात चिकन मसाला म्हणुन एक जवळपास कोरडी भाजी मिळते त्यात अंड फेटुन टाकलेले असते. व्हेज फ्राईड राइस/चिकन फ्राइड राइस आणी तो चिकन मसाला काय लागतात म्हणुन सांगु.

>>ह्या रेसिपी मधे थोडीशी माझी अक्कल वापरुन केलंय तर ह्या पदार्थाचं नाव बदलायला हवं होतं

चिकन जयुफ्रेझी Happy

दिनेशदा,
बनवलत की पाठवा ईकडे..

जालफ्रेजी हा शब्द 'झाल फ्राय जी' म्हणजे 'साहेब, तिखट फ्राय' याचा अपभ्रंश आहे.
<<< खरं की काय? मग ते हाटिलातून मिळणारे जालफ्रेझी एवढे मिळमिळीत का बनवतात बरे? Happy एकदा मुंबईत व्हेज जालफ्रेझी मागवलेलं ते तर सोया सॉसमधे न्हाऊन आलं होतं.

रेसिपी मस्त.

फोटो फारच मस्त आलाय! Happy

मॅरीनेशन साठी टोमॅटो केचप चा वापर मी पहिल्यांदाच ऐकला ..

धन्यवाद लोक्स Happy

झालं फ्राय जी........ हे खरंच की गंमत ???

अंड्याचा वास अजिबात नाही येत. म्हणजे चिकनच्या वासामधे अंड्याचा वास मिसळून असा मस्त खमंग वास घरभर दरवळत राहतो Happy

चिकन बोनलेस नाहीये..... !!

एकदम खतरा फोटो, सोपी रेसिपी!

ओरीजिनल जालफ्रेजीची रेसिपी नसल्यामुळे याला 'झोलफ्रेजी' म्हणता येईल. काहीही म्हणा, नावात काय आहे, दिसतेय तर लै चविष्ट!

लग्नाच्या वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा.. Happy

मस्त झालय ते. इथे पाठवा.

ज्यांना शाकाहारी हवय त्यांनी चिकन ऐवजी सोया टाकुन बघा काही मजा येते का.. Wink

Pages