Submitted by बेफ़िकीर on 24 November, 2012 - 01:09
गूढ युगांचे मिश्रण त्यावर लेप उभ्या इतिहासाचे
मी कडबोळे विश्वाचे
रितेपणाने ओसंडत मी व्यापत जातो नसण्याला
जन्म देत या असण्याला
तुडुंबतेची क्षणभंगुरता अस्तित्वाला गर्भारे
अनंत त्यावर बंधारे
निर्माता मी मीच निर्मिती शोषित मी अन् शोषक मी
खेळाडू अन् प्रेक्षक मी
मुक्त व्हायच्या कल्पनेस ना काळ दिशा किंवा न मिती
अथ ना ज्यास न ज्यास इती
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुड वन! आवडले.
गुड वन!
आवडले.
मला पण आवडली. डॉ. हू म्हणून
मला पण आवडली. डॉ. हू म्हणून एक सीरेअल येते त्याला चपखल बसेल गाणे.
मस्त बेफीजी तुमचे आधीचे दोन
मस्त
बेफीजी तुमचे आधीचे दोन कवितासन्ग्रह माझ्याकडे आहेत मी वाचले आहेत अत्ता तुमच्यातला कवी त्यातल्या कवीपेक्षा कितीतरी परिपक्व वाटत आहे
तुमच्या आजकालच्या हरेक कवितेस एक नवा इनोवेटिव्ह आकृतीबन्ध (माण्डणीच्या दृष्टीकोनातून) बहार आणतो खुमारी चढतच जाते
अतीशय चिन्तनीय व अन्तर्मुख करणार्या आशय-विषयान्च्या बद्दल मी पामर काय बोलू ....!
बेफीजी आजकाल तुमच्या प्रत्येक कवितेगणिक मराठीसाठी एक अत्यन्त महत्त्वाचा मानला जाईल असा कवितासन्ग्रह पूर्णत्वाकडे जाताना मला दिसतो आहे ...तुम्हीही मनावर घ्याच तिसर्या कवितासन्ग्रहाचे
_____/\_____ !! I am
_____/\_____ !!
I am dumb-struck..
आवडली कविता!
आवडली कविता!
आवडली छान.
आवडली छान.
अतिशय सुंदर ! निस्तब्ध करणारी
अतिशय सुंदर ! निस्तब्ध करणारी कविता !
बेफिकीर, पहिल्या दोन ओळी
बेफिकीर,
पहिल्या दोन ओळी अफाट.. ही जाणिव झालेला क्षण सुंदर व शब्दांत मस्तच पकडलाय.. पुढे अपेक्षा बळावतात आणि त्याचस्पीस्ड्ने भंगतातही
ंमी कडबोळे म्हणून झाल्यावर उरलेल्या कवितेत निव्वळ "मी" व्यापूनराहायला नको होता असे व्यक्तिशः वाटले
सेम पोस्ट दोनदा म्हणून
सेम पोस्ट दोनदा म्हणून संपादित
गूढ युगांचे मिश्रण त्यावर लेप
गूढ युगांचे मिश्रण त्यावर लेप उभ्या इतिहासाचे
मी कडबोळे विश्वाचे
रितेपणाने ओसंडत मी व्यापत जातो नसण्याला
जन्म देत या असण्याला
तुडुंबतेची क्षणभंगुरता अस्तित्वाला गर्भारे
अनंत त्यावर बंधारे
>> व्वा!
अप्रतिम!
अप्रतिम!
व्वा....
व्वा....
>> रितेपणाने ओसंडत मी व्यापत
>> रितेपणाने ओसंडत मी व्यापत जातो नसण्याला
जन्म देत या असण्याला >>
नि:शब्द करणारे शब्द.
खरं तर या कवितेतील प्रत्येक शब्द.
बेफिकीर, आयला, काय जबरी कविता
बेफिकीर,
आयला, काय जबरी कविता आहे!
>> मुक्त व्हायच्या कल्पनेस ना काळ दिशा किंवा न मिती
>> अथ ना ज्यास न ज्यास इती
बापरे! तुम्ही मुक्तछंदाकडे झुकताय की काय असं क्षणभर वाटून गेलं.
विनोदाचा भाग सोडलात तर म्हणेन की, ही कविता तुमच्या कवितेवरील कविता आहे. पण मी तुमचे कवितासंग्रह वाचले नाहीयेत बरंका! त्यामुळे (आपल्या संदर्भातलं) माझं मत अत्यंत मर्यादित काव्यपानावर आधारित आहे. कृपया अज्ञ रसिकास सांभाळून घेणे. 
आ.न.,
-गा.पै.
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार.
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार.
गा मा -