मी कवी मग निमित्तमात्र

Submitted by Kiran.. on 23 November, 2012 - 14:24

कोण मी, आहे कुणीसा, भारवाही दामिनींचा
या इथे आहे बिलोरी, आरसा का प्रतिमेचा ||धृ||

सावल्या त्या कल्पनेच्या, स्पर्शल्या होत्या मनाला
खेळ सारा अनुभुतीचा, या मनाचा त्या मनाला
थोरवी कविते तुझी ही, माध्यम मी जाणिवांचा

काळजी आहे सदाची, पात्रता माझ्या करांची
ज्ञानियांची साथ होता, शुद्धता होई मनाची
वंदिता तुजला कविते, प्रांत देशी नेणिवांचा

थारा नाही गर्व आणि द्वेष हेवा या गुणांना
ढाळते अश्रू प्रतिभा, रचुनी ऐसा काव्यमेणा
सावरावे, जाणवावे, शोध घ्यावा अंतरीचा

दु:खाच्या बांधाशी जेव्हां, अडविताना वेदनेला
वीज चमकूनी तळाला, शब्द फुटतो अव्यक्ताला
मी कवी मग निमित्तमात्र, खेळ टिपतो अद्वैताचा

- Kiran

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्र/मैत्रिणींनो

यातल्या प्रत्येकाने अगदी शोधून वाचल्याबद्दल कसे आभार मानायचे हे समजेनासं झालंय !!!!