Submitted by Kiran.. on 23 November, 2012 - 14:24
कोण मी, आहे कुणीसा, भारवाही दामिनींचा
या इथे आहे बिलोरी, आरसा का प्रतिमेचा ||धृ||
सावल्या त्या कल्पनेच्या, स्पर्शल्या होत्या मनाला
खेळ सारा अनुभुतीचा, या मनाचा त्या मनाला
थोरवी कविते तुझी ही, माध्यम मी जाणिवांचा
काळजी आहे सदाची, पात्रता माझ्या करांची
ज्ञानियांची साथ होता, शुद्धता होई मनाची
वंदिता तुजला कविते, प्रांत देशी नेणिवांचा
थारा नाही गर्व आणि द्वेष हेवा या गुणांना
ढाळते अश्रू प्रतिभा, रचुनी ऐसा काव्यमेणा
सावरावे, जाणवावे, शोध घ्यावा अंतरीचा
दु:खाच्या बांधाशी जेव्हां, अडविताना वेदनेला
वीज चमकूनी तळाला, शब्द फुटतो अव्यक्ताला
मी कवी मग निमित्तमात्र, खेळ टिपतो अद्वैताचा
- Kiran
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!!
व्वा!!
किरण, सहीच !
किरण, सहीच !
छानच !!!!!!
छानच !!!!!!
निव्वळ अप्रतिम! काव्यमेणा >>>
निव्वळ अप्रतिम!
काव्यमेणा >>> सुंदर शब्दयोजना!
छान.......
छान.......
छान रे
छान रे
वावावा!!! सुपर्ब रे.. !!!!
वावावा!!! सुपर्ब रे.. !!!!
अतिशय सुंदर सहज वाह! निघाला
अतिशय सुंदर
सहज वाह! निघाला
मित्र/मैत्रिणींनो यातल्या
मित्र/मैत्रिणींनो
यातल्या प्रत्येकाने अगदी शोधून वाचल्याबद्दल कसे आभार मानायचे हे समजेनासं झालंय !!!!
अजुन एक दोन असल्याच कविता
अजुन एक दोन असल्याच कविता किंवा खास किरण स्टाईलची ललितं येऊ देत
आभार पोहचतील
होय रिया म्हणतेय ते
होय रिया म्हणतेय ते बरोबरच्चय !!.अनुमोदन
धन्यवाद रीया आणि
धन्यवाद रीया आणि वैवकु
ब्लॉगची लिंक देईनच.
वाह!! छानच..
वाह!! छानच..