Submitted by rmd on 21 November, 2012 - 15:12
(मूळ कविता - भिजवून ठेव अवघी सकाळ - http://www.maayboli.com/node/39273
(बेफिकीर यांची माफी मागून हा एक उस्फूर्त विडंबनाचा प्रयत्न :))
भिजवून ठेव ना मूगडाळ
दे घालुनी खिचडीत तू
बनवू नकोस ती आगजाळ
ठेवत कमी तिखटास तू
गाळू नकोस बघुनीच लाळ
कढी सोबतीस देशील तू
जेवायचीही वेळ पाळ
फुकटच उशीर करशील तू
माझ्यावरी आणशी किटाळ
मज हावरट म्हणतेस तू
पण हादडतेस तूही फराळ
जेवण शिवाय करतेस तू
मज बोलतेस तिन्हीत्रिकाळ
अन् त्रासही देतेस तू
तरी आवडतेस मज सर्वकाळ
माझीच फक्त आहेस तू!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त
मस्त
(No subject)
(No subject)
(No subject)
वा वा. मला हसू नाही आले, पण
वा वा. मला हसू नाही आले, पण आवडले विडंबन रमड देवी
मज बोलतेस तिन्हीत्रिकाळ
अन् त्रासही देतेस तू
तरी आवडतेस मज सर्वकाळ
माझीच फक्त आहेस तू!
<<<
मस्त
मूळ रचनाच कोणी पाहात नाही.
(No subject)
चला आता मूळ रचने कडे वळूयात
चला आता मूळ रचने कडे वळूयात
(No subject)
छान
छान
लै म्हज्जे लैच भारी मूळ
लै म्हज्जे लैच भारी
मूळ रचनाच कोणी पाहात नाही>>> अहो बेफि, मुळ रचना वाचल्या बिगर विडंबनाची मजा कशी येनार?? ती बी वाचलीच की.... हां आता तिथे काही प्रतिसाद नाही दिला कारण आमची ती लायकी नाही हो .... आम्ही तिथे फक्त वाचन मात्र
मुळ रचना वाचली. पण जड जड
मुळ रचना वाचली. पण जड जड वाटली. हे मस्तय. कसं हलकं फुलकं
अवांतर : <<<<< मूळ रचनाच कोणी पाहात नाही.>>>>>>> बेफी तुमचं प्रत्येक लिखाण वाचलं जातं ओ. (मी वाचते. पण त्यातलं कळतं किती म्हणजे गझला, जडशीळ कविता वैगेरे ते नका विचारु.) पण प्रत्येक वेळी प्रतिसाद देतेच असं नाही.
मस्तच!! मज बोलतेस
मस्तच!!
मज बोलतेस तिन्हीत्रिकाळ
अन् त्रासही देतेस तू
तरी आवडतेस मज सर्वकाळ
माझीच फक्त आहेस तू!>> हे नक्की कोणाला उद्देशून आहे? मूगडाळीला की कॉय?
आर एम डी !! कश्शाला...
आर एम डी !! कश्शाला...
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
धन्यवाद सर्वांना! पौर्णिमा:
धन्यवाद सर्वांना!
पौर्णिमा: काय पण प्रश्न! आणि तो तू विचारावास?
पौर्णिमा.. >>
पौर्णिमा.. >>
(No subject)
रूपा इज ब्याक! पौतै
रूपा इज ब्याक!
पौतै
छान
छान