आता वाली कोण?

Submitted by रसप on 20 November, 2012 - 23:05

रक्त मराठी जपणा-याला आता वाली कोण?
"मी मुंबैकर" आवाजाला आता वाली कोण?

एका झेंड्याखाली जमता लाखोंचा समुदाय
थरथरणा-या व्यासपिठाला आता वाली कोण?

कुठल्या अंगुलिनिर्देशाची समजुन घ्यावी दिशा?
गोंधळलेल्या सैन्यदलाला आता वाली कोण?

कोल्हे, बिबटे आणि लांडगे अवतीभवती इथे
वाघानंतरच्या रानाला आता वाली कोण?

आता त्यांचे सिंहासन ते असेच राहिल रिते
माळेमधल्या रुद्राक्षाला आता वाली कोण?

....रसप....
२० नोव्हेंबर २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/blog-post_21.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्हे, बिबटे आणि लांडगे अवतीभवती इथे
वाघानंतरच्या रानाला आता वाली कोण?<<< आवडला. (गझलेपेक्षाही कविता म्हणून ही रचना वाचली).

कुठल्या अंगुलिनिर्देशाची समजुन घ्यावि दिशा

बेफिकीरजी,

कुठल्या अंगुलिनिर्देशाची समजुन घ्यावी दिशा? - ह्यात माझ्या मते मात्रा बरोबर आहेत. (२७)

माझी कुठे काही गडबड होतेय का?

कुठल्या अंगुलिनिर्देशाची समजुन घ्यावी दिशा? - ह्यात माझ्या मते मात्रा बरोबर आहेत. (२७)<<<

तुमचे बरोबर आहे, मी चुकून २८ च्या लयीत वाचत गेलो. क्षमस्व!

ही गझल आहे का? असा एक मूलभूत प्रश्न मला पडला आहे. कवींनी राग मानू नये. पण एखाद्या घटनेचा पडसाद म्हणून कविता जन्म घेणे स्वाभाविक आहे. परंतु अश्या रचनेत जर झाल्या घटनेचा संदर्भ कुठेच नसेल, तर तो संदर्भ काही काळापर्यंत स्मरणात राहून नंतर ह्या रचनेमागील वैचारिक बैठक जराशी कमजोर वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

सद्य स्थितीत ही एक उत्कृष्ट रचना आहे. उद्या कदाचित फक्त 'चांगली' रचना म्हणता येईल.

परंतु अश्या रचनेत जर झाल्या घटनेचा संदर्भ कुठेच नसेल, तर तो संदर्भ काही काळापर्यंत स्मरणात राहून नंतर ह्या रचनेमागील वैचारिक बैठक जराशी कमजोर वाटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. >
हे विचार मायबोलीवर वाचल्यासारखे वाटतात.

http://www.maayboli.com/node/35124

ही गझल अनंत काळ स्मरणात राहण्यासारखी असावी. Rofl

( माझा फोन नंबर 1-800-861-8380 हा आहे Lol )