Submitted by खडूसराव on 21 May, 2012 - 03:04
कमजोर माणसाने बाही न सरसवावी
लोकामधे स्वत:ची इज्जत स्वत: जपावी
बाराखडीसही जर ना वाचले कधीही
गझलेवरी कुणाच्या अक्कल न पाजळावी
हर एक भावनेला ना मांडणे जरूरी
जर छंद बोचती तर कविताच का लिहावी ?
टीका पचेल त्याने लोकांसमोर यावे
केवळ स्तुतीकरीता कविता घरी म्हणावी
कविता लिहायची ह्या मुक्तांगणात ज्याला,
त्याला "गुलाम झालो" ही बोच का रहावी '
'मी श्रेष्ठ' दाखवाया करती विरोध कोणी,
ती 'श्रेष्ठता' अशांनी गझलेत दाखवावी
"का माजलास इतका ?" म्हणती तुलाच 'केशव'
प्रतिभाच माजण्याची त्यांच्याकडे नसावी !
- के.गो.
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
(No subject)
प्रत्येक शेर स्वतंत्र
प्रत्येक शेर स्वतंत्र लटकवलेल्या पाटीसारखा वाटला.
लहान तोंडी मोठा घास. चु.भु.द्या.घ्या.
भुंगा पाटी हा शब्द आवडला
भुंगा
पाटी हा शब्द आवडला
भुंगेश...
भुंगेश...
बेफी, पुणेरी पाट्यांचा परिणाम
बेफी, पुणेरी पाट्यांचा परिणाम
बाकी इथे कोणी पाट्या टाकल्यात वगैरे अर्थाने मला काही म्हणायचे नाही हो
अश्या वैतागून गझला पडल्या की
अश्या वैतागून गझला पडल्या की हजलांचा भाव आपसूक वधारतो
( चु.भु.द्या.घ्या. आणि गै ही नसावा)
पुन्हा सर चु.भु.द्या.घ्या.!
"गझलेची बाराखडी न वाचलेल्यांनी गझालेवरच्या आशयावर वक्तव्य न करावे, गझला करून दाखवा मग पाहू इ.इ." असा एकसंध संदेश वाचून मात्र गम्मत वाटली.
पुढील गझलेसाठी शुभेच्छा
बाराखडी वाचून तरी कुठे गझला
बाराखडी वाचून तरी कुठे गझला येतात
बेफिजी.. अहो पण त्यामुळे
बेफिजी.. अहो पण त्यामुळे 'ट'ला'ट' जोडण्याचे 'टॅ'लें'ट' येते की
असेच काही नाही म्हणजे येतेच
असेच काही नाही
म्हणजे येतेच असे काही नाही
हो ना.. तेही खरेच!
हो ना.. तेही खरेच!
केशवराव आपणास आम्ही मा बो वर
केशवराव आपणास आम्ही मा बो वर प्रथमच पाहत आहोत
आपले सर्व सदस्यांच्या वतीने हार्दिक स्वागत
प्रस्तुत गझल तंत्रानुसार बरी आहे यावरून आपण एक जाणकार गझलकार आहात हे स्पष्ट होते आहे .
आपल्या इतर रचना येवुद्यात
त्या सर्वांच्या पसंतीस उतराव्यात याकरीता अनेकानेक शुभेच्छा
पहीलीच पेश्कश आहे म्हणून ..............पुढे आमचे "रचना कशी आहे " यावरचे प्रामाणिक प्रतिसाद आपणास मिळतीलच
पुलेशु!!
गझलेच्या काफिल्यात आपले
गझलेच्या काफिल्यात आपले स्वागत, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !
'माजण्याची प्रतिभा' हा शब्दप्रयोग आणि शेर फारच आवडला.
माजण्याची प्रतिभा ही कल्पना
माजण्याची प्रतिभा ही कल्पना आहे छान, स्वागतही आहेच, पण ही रचना गझल म्हणून कितपत उभी राहते हा एक वेगळा प्रश्न
तुमची प्रतिभा अद्याप पुरेशी
तुमची प्रतिभा अद्याप पुरेशी माजलेली नसल्याने तुम्हाला असे प्रश्न पडणे साहजिक आहे, बेफिकीर !
तुमची प्रतिभा अद्याप पुरेशी
तुमची प्रतिभा अद्याप पुरेशी माजलेली नसल्याने तुम्हाला असे प्रश्न पडणे साहजिक आहे, बेफिकीर>>
हे तुमच्या लक्षात येत आहे याचा अर्थ तुमची माजलेली असणार
प्रतिभा माजणे ही प्रक्रिया अजूनही व्हिज्युअलाईझ करण्याचा प्रयत्न सुरू आहे
टीका पचेल त्याने लोकांसमोर
टीका पचेल त्याने लोकांसमोर यावे
केवळ स्तुतीकरीता कविता घरी म्हणावी >>>>>>>>>>>>>> हा फार आवडला........ बाकी जाणकार मार्गदर्शन करतीलच मी करणार नाही ...... मला कविता गझल यातला ओ की ठो ही कळत नाही
मंदार +१
मंदार +१
मला कविता गझल यातला ओ की ठो
मला कविता गझल यातला ओ की ठो ही कळत नाही >> कोणाला कळते? त्याने फक्त एक गझल पोस्टून दाखवावी... प्रत्येक शेरास सव्वा(लाख) शेर आहेत माबो वर!
तर ते असो. ही रचना गझल म्हणून
तर ते असो.
ही रचना गझल म्हणून उभी राहते की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे, पण यातले सल्ले / पाट्यावजा शेर आणि मिसरे इतर गझलांवर प्रतिसाद म्हणून द्यायला अत्यंत उपयुक्त आहेत असे माझे मत आहे.
माबोवर अनेकदा गझलांना प्रतिसाद म्हणून काय लिहावे असा प्रश्न पडत असे. आता निदान माझ्यापुरता तरी हा प्रश्न सुटला आहे !
बिवेअर, शायर लोक्स !!
ज्ञानेश
ज्ञानेश
म्हणजे नक्की काय सुटल म्हणायच
म्हणजे नक्की काय सुटल म्हणायच ज्ञानेशजी!
'मी श्रेष्ठ' दाखवाया करती
'मी श्रेष्ठ' दाखवाया करती विरोध कोणी,
ती 'श्रेष्ठता' अशांनी गझलेत दाखवावी
"का माजलास इतका ?" म्हणती तुलाच 'केशव'
प्रतिभाच माजण्याची त्यांच्याकडे नसावी !
हे दोन शेर आवडलेत.
----------------
व्वा केशवराव. पुलेशू.
ही रचना गझल म्हणून उभी राहते
ही रचना गझल म्हणून उभी राहते की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे, पण यातले सल्ले / पाट्यावजा शेर आणि मिसरे इतर गझलांवर प्रतिसाद म्हणून द्यायला अत्यंत उपयुक्त आहेत असे माझे मत आहे.
माबोवर अनेकदा गझलांना प्रतिसाद म्हणून काय लिहावे असा प्रश्न पडत असे. आता निदान माझ्यापुरता तरी हा प्रश्न सुटला आहे !>>>
होय, त्या दृष्टीने ही रचना प्रभावी आहे. ज्ञानेश पाटलांना प्रतिसाद देण्यासाठी अशी एक रचना आवश्यक वाटली यावरून मायबोलीवरील सद्य गझलस्थिती स्पष्ट व्हावी
अर्थात, सन्माननीय अपवाद आहेत म्हणा
=========
म्हणजे नक्की काय सुटल म्हणायच ज्ञानेशजी>>
========
ज्ञानेश,
या गझलेला पर्यायी शेर असू शकतील का?
होय, त्या दृष्टीने ही रचना
होय, त्या दृष्टीने ही रचना प्रभावी आहे. ज्ञानेश पाटलांना प्रतिसाद देण्यासाठी अशी एक रचना आवश्यक वाटली यावरून मायबोलीवरील सद्य गझलस्थिती स्पष्ट व्हावी >>>
अर्थात, सन्माननीय अपवाद आहेत म्हणा >> अपवाद कि नुसतेच वाद बेफिजी!
ज्ञानेश,
या गझलेला पर्यायी शेर असू शकतील का? >>>
कुठ्ल्या गझलेला नसू शकतात का?
नानूभाऊ, तुमच्या सदस्यत्वाचे
नानूभाऊ, तुमच्या सदस्यत्वाचे नांव बदलून काडीबहीण असे ठेवा
फारच "गोटीबंद" अभिप्राय दीलात
फारच "गोटीबंद" अभिप्राय दीलात हो बेफिजी !
<<<< या गझलेला पर्यायी शेर
<<<< या गझलेला पर्यायी शेर असू शकतील का? >>>>
पर्यायी शेर???
बेफी तुमचे पर्यायी शेरावर फारच प्रेम दिसतेय.
सतिशरावांनी यापूढे पर्यायी शेर लिहिणार नाही म्हटल्याने तुमची निराशा झाली आहे काय?
मग एक पर्याय सांगतो.
तुम्हीच एक आता अॅड गझलगावकर या नावाने पर्यायी आयडी (ड्युआय) काढा. आणि सुरू होऊन जाऊ द्या पर्यायी शेरांची आतिषबाजी.
स्वगत : आपण तर या पर्यायी गझलेचा फारच धसका घेतलेला आहे बुवा.
गझलेवरच्या फुटकळ गमतीजमती असे
गझलेवरच्या फुटकळ गमतीजमती असे एक सदर चालवायला हवे आता
तुम्हीच एक आता अॅड गझलगावकर
तुम्हीच एक आता अॅड गझलगावकर या नावाने पर्यायी आयडी (ड्युआय) काढा. आणि सुरू होऊन जाऊ द्या पर्यायी शेरांची आतिषबाजी. >>>
मुटे, मला माझे ओरिजिनल शेर लिहायलाच वेळ नाहीये, पर्यायी कुठले लिहितोय
लोकहो, दाद द्यायला सरसावून बसा.... बहुधा आज गुलमोहरात माझी एक नवी गझल पडेल
Pages