समुह गीत स्पर्धेसाठी गाणे सुचवा.

Submitted by मुग्धानंद on 20 November, 2012 - 01:09

ऑफिसमधे समुह गीत स्पर्धा आहे. आम्ही ५-६ जण आहोत. २-३ मुली बाकीचे पुरुष.
शिकलेले आम्ही १-२ जणेच आहोत. बाकी हौशी. पण तालात आहेत. गाणे हिंदी हवे कारण सगळे महाराष्ट्रीयन नाहीत.
कोणते गाणे निवडावे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१)सारे जहांसे अच्छा,हिंदोस्तां हमारा
२) ऐ नौजवान वीरताकी है कसोटी आज,तुम शेर हो दिलेर हो रखो वतनकी लाज

नाही विषय काही दिलेला नाही.
मी प्रश्न लिहुन वॉशरुम मधे गेले, परत येते तो ३ प्रतिसाद. धन्य माबो, धन्स माबोकर.

माझी ऑल टाईम फेव्हरिट समुह गीते म्हणजे , जयोस्तुते, ने मजसि ने, पण इथे मराठी न येणारे लोक्स असल्याने लोचा आहे. आम्ही कॉलेज मधे तर कोलंबसाचे गर्व गीत- हजार जिव्हा ,पण बसविलेले.
(टॅग करण्याची सोय असती तर धनश्री या आय डी ला इकडे टॅग केले असते.)

मायबोली शिर्ष़क गीत +१
किंवा...
श्री गणेशाय धिमही .. शंकर महादेवन यांनी गायलेलं. वेळ असेल आणि थोडीशी मेहनत घेतली तर उत्कृष्टरित्या सादर करता येईल. ऐकायलाही सुंदर वाटेल.

१) मा तुझे सलाम वंदे मातरम ------ ए आर रहमानच

२) ये होसाला ------- डोर सिनेमातलं

३) महालक्ष्मी अष्टकम

४) दुर्गे दुर्गट भारी ----- अगबाई अरेच्चा' या चित्रपटातलं

'महंगाई डायन खाए जात है' फ्रॉम पिपली लाईव!
मागाच्या वर्षी आमच्या ऑफिस मधे समुह्गीतांसाठी फेमस होतं Happy
अर्थात त्याला फार सुर ताल लय लागत नाही म्हणायला पण ऐकायला मजा येते जेव्हा सगळे म्हणतात.

अब के सावन ऐसे बरसे.. - शुभा मुद्गल
कंधोंसे मिलते है कंधे...
खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली.. सुपारी फुटली.. ह्याचा ही ठेका चांगला आहे...

शाम, विचारुन पाहाते, पण .....
पहिल्या राउंड ला जास्त वाद्ये नाहीत, सिंथ, किंवा पेटी, आणि तबला, बोंगो-कोंगो, म्हणजे एक सुरवाद्य आणि एक तालवाद्य

>>ए मालीक तेरे बंदे हम..

मैदान मारायचय का मैदानावर आडवं व्हायचय...? Happy
~d
रच्याकने: लोकं ईथे शंकर भाऊ अन शुभा ताईंची गाणी सुचवत आहेत.. वाचूनच घाम फुटला सादर करताना काय होईल?

<रच्याकने: लोकं ईथे शंकर भाऊ अन शुभा ताईंची गाणी सुचवत आहेत.. वाचूनच घाम फुटला सादर करताना काय होईल<> खरेच... रेह्मान च्या बाबतीत मी वर हेच म्हटले आहे. सेम विथ आशाताई.

हिन्दी गाणे हवे...

छोडो कल की बातें, कल की बात पुरानी |
नये दौर मे लिखेंगे, मिलकर नयी कहानी |
हम हिन्दुस्थानी, हम हिन्दुस्थानी...

गाणं खूप जुनं आहे... पण 'समुह-गायना'साठी उत्तम आहे... गायकांमधे स्व, मुकेशजींचा आवाज मेन आहे... चित्रपट मात्र आठवत नाही...

Happy

हम करें राष्ट आराधन
तन से मन से धन से
तन मन धन जीवनसे
हम करें राष्ट आराधन………………।।…धृ
अन्तर से मुख से कृती से
निश्र्चल हो निर्मल मति से
श्रध्धा से मस्तक नत से
हम करें राष्ट अभिवादन…………………। १

अपने हंसते शैशव से
अपने खिलते यौवन से
प्रौढता पूर्ण जीवन से
हम करें राष्ट का अर्चन……………………।२

अपने अतीत को पढकर
अपना ईतिहास उलटकर
अपना भवितव्य समझकर
हम करें राष्ट का चिंतन…।………………।३

है याद हमें युग युग की जलती अनेक घटनायें
जो मां के सेवा पथ पर आई बनकर विपदायें
हमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से
हमने शृंगार किया था माता का अरिमुंडो से

हमने ही ऊसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन
मां जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन
अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन
अपना तन मन धन देकर हम करें पुन: संस्थापन………………।४

आईगं <जोरात किंचाळणारी बाहुली> मी मगाशी गीत गंगा वरच होते.
सगळी संघ गीते आहेत त्यावर

जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया
ऐसा ही सुख मेरे मन को मिला हैं मैं जब से शरण तेरी आया, मेरे राम

'आसमा है नीला क्यू , पानी गीला गीला क्यू' हे रॉक ऑन मधले गाणे ग्रूप मधे म्हणायला छान आहे....ऑडीयन्स खूश होईल.

देशभक्तिपर पाहिजे असल्यास - सारे जहांसे अच्छा...
संस्क्रुत (नीट न लिहिता आल्याबद्दल क्षमस्व) चालणार असल्यास - वंदे मातरम (मूळ चालीवर) लता किंवा रेहमानच्या नव्हे
धिन्च्याक पाहिजे असल्यास - प्यार हमे किस मोड पे ले आया....

बाकी - आम्ही ५-६ जण आहोत. २-३ 'मुली' बाकीचे 'पुरुष' - हे एक नंबर!

http://www.google.co.in/music/album?n=Anand-Math&id=20100520134546_28u0g...

मूळ वंदे मातरम हे जनरली कुठल्याही सभेच्या समाप्तीला म्हणतात.
स्काउट - गाइड ची पुस्तके असतात ना. त्यात भरपूर गाणी असतात. त्यातली बरीच गाणी तिथल्या तिथल्या स्काउट ग्राउंडवर शिकवलीही जातात. मुंबईत हे असतं की नाही माहित नाही.
पुण्यात भिकारदास मारूतीजवळ आहे स्काउट ग्राउंड. शिवाजी कुल आहे ते. तिथे माहिती मिळेल.

मुली"च" आहेत त्या, (मला बाई म्हणु हवे तर...) आणि बाकीचे मुलगे नसुन वयाने मोठे पुरुष आहेत. गाणी जबरी सुचविली आहेत..

मुग्धानन्द - दिवा की काय ते घेतल्याबद्दल धन्यवाद पण माझ्या माहीतीत ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्या आहेत ज्या सहलीला जाताना देखील आम्ही मुली असा उल्लेख करतात, त्याची आठवण झाली..., अर्थात वय हे मनात असते (मला चाळीशी उलटल्यानंतर झालेला साक्षात्कार Happy )

रच्याकाने - संस्क्रुत ला नीट कसे लिहायचे ते सांगेल का इथे कोणी...

saMskRuta

Pages