शरद पवारांचा १२ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने
मला भावलेले शरद पवार : प्रभाकर [बापू] करंदीकर
आमचे आणि पवार कुटुंबांचे संबंध नेहमीच निकटचे राहिले आहेत. माझे वडिल - कै. द.स. करंदीकर वकील - स्वातंत्र्य सैनिक आणि काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रिमांड होम, होमगार्ड, माळेगाव सहकारी साखर कारखाना, नाट्यसाधना, लायन्स क्लब, ऑस्ट्रेलियन मिशन, यांसारख्या अनेक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. माझी आई - कै. पद्माताई करंदीकर- या सर्व कामात सहभागी होत असे. माझ्या वडिलांनी स्वतः कधी कोणती निवडणूक लढवली नाही परंतु सुमारे तीन दशके ते तालुका काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष होते. महिला प्रचार आघाडीचे काम माझी आई सांभाळत असे. त्यामुळे निवडणुका आल्या की आमचे घर-दार प्रचाराच्या कामात दंग असे. त्या निमित्ताने, साहेबांचे आमच्या घरी नेहमी येणे-जाणे होत असे.
माझ्या आठवणी प्रमाणे, मी साहेबांना प्रथम जवळून पाहिले तो काळ १९६०च्या सुमाराचा असावा.निवडणुकीच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांच्या प्रभातफेर्या निघत. त्याचे मार्गदर्शन युवक काँग्रेसचे नेते या नात्याने साहेबांचे असे. पुढे १९६७ मध्ये साहेबांना अगदी तरुण वयात काँग्रेस पक्षाने आमदारकीचे तिकीट दिले. त्यावेळी तालुक्यातल्या काही ज्येष्ठ इच्छुकांची थोडी नाराजी झाली होती. कै. यशवंतराव चव्हाणांनी फोन करून माझ्या वडिलांना सांगीतले होते, " बंडोपंत, हा युवक फार हुशार आहे आणि कर्तबगार आहे. तो निवडून आला पाहिजे. तालुक्यातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची समजूत काढणे आणि सगळ्यांचा सहभाग मिळवणे ही तुमची जबाबदारी राहील!." सुदैवाने साहेब चांगल्या मतांनी निवडून आले.
निवडणुकांची धामधूम संपली तरी सामजिक आणि शैक्षणिक कार्यामुळेही पवार कुटूंबियांशी आमचा नेहमी संपर्क रहात असे. पुढे साहेबांच्या राजकीय कर्तृत्वाची कमान सतत चढती राहिली. ते आमदार झाले, मंत्री झाले आणि मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झाले परंतु त्यामुळे कौटुंबिक संबंधात कोणताच फरक पडला नाही. दरवर्षी दिवाळीत घरी येऊन शुभेच्छा देण्याचा साहेबांचा शिरस्ता होता. माझ्या आईच्या निधनापर्यंत, म्हणजे २००३ पर्यंत त्यात कधी खंड पडला नाही.
मी बी.ए.ची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो, तेंव्हा साहेबांनी मला एम.बी.ए.चा कोर्स घेण्याचा सल्ला दिला होता आणि सांगीतले की. 'मुंबईच्या जमनालाल बजाज संस्थेत तुला अॅडमिशन मिळवून देतो.' पण त्यावेळी एम.बी.ए. विषयी फारशी कुणाला माहिती नव्हती आणि मला तर आय.ए.एस.कडे जायचे होते. त्यामुळे मी त्या कोर्सला अॅडमिशन घेतली नाही. पुढे यु.पी.एस.सी. च्या परीक्षेला बसलो. ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळी साहेब दिल्लीत होते. तिथे वर्तमनपत्रात त्यांनी रिझल्ट पाहिला.प्रशासकीय सेवा [आय.ए.एस.] आणि प्ररराष्ट्र सेवा [आय.एफ.एस.] या सेवांच्या संयुक्त यादीत माझे नाव पहाताक्षणी साहेबांनी फोन करून माझ्या वडिलांना सांगीतले की, "बापूचे हार्दीक अभिनंदन. तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला म्हणावे, आय.ए.एस. चीच निवड कर.फॉरिन सर्व्हीसच्या मोहात पडू नकोस." साहेबांचा सल्ला मला मनोमन पटला.
यथावकाश आय.ए.एस. मध्ये 'काडर' ची निश्चिती झाली आणि सुदैवाने मला महाराष्ट्र काडर मिळाले. त्यामुळे नंतर मी प्रशासकीय सेवेत असताना अनेक प्रसंगी साहेबांशी माझे सतत संबंध येत राहिले आणि त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे मला जवळून निरीक्षण करता आले. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांची मते ते जाणून घेतात आणि शेवटी आपला निर्णय शांतपणे आणि ठामपणे घेतात. त्यानंतर मग त्या धोरणाची किंवा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात कोणतीही हयगय झालेली ते खपवून घेत नाहीत. वेळप्रसंगी कटु किंवा अप्रिय निर्णय घेतानाही ते कधी कचरत नाहीत. त्यामुळे एक खंबीर आणि विचारी नेता तसेच कुशल प्रशासक अशी त्यांची ख्याती देशभरात झाली आहे. त्यांच्या हाताखाली काम करताना अधिकार्यांना कसलेच 'टेन्शन' येत नाही, उलट त्यांचा उत्साह द्विगुणित होतो. आमचे निकटचे कौटुंबिक संबंध असले तरी त्याचा संबंध सरकारी कामकाजात त्यांनी कधीच येऊ दिला नाही. इतर अधिकार्यांप्रमाणेच त्यांनी मला सन्मानाने आणि ऋजुतेने वागविले.
महिला धोरण, उद्योग-धोरण, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण, रोजगार हमी योजनेद्वारा फळ-बागायत, उर्जा क्षेत्रात भरीव गुंतवणूक करणे, यांसारख्या विषयात त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी स्वरूपाचे ठरले. यात त्यांचे 'द्रष्टेपण' दिसून येते. १९९१ चे नवे उदारमतवादी आर्थिक धोरण केंद्राने स्वीकारण्यापूर्वी सुमारे दीड-दोन वर्षे साहेबांनी औद्योगिक संघटनांच्या वार्षिक सभातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने बोलताना ज्या ठामपणे उदारीकरणाची आवश्यकता मांडली, ती ऐकून खुद्द उद्योगपतीही चकीत झाले होते. साहेबांच्या 'त्या' भाषणाची प्रत वाचल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी, 'तुम्ही नेहमी काळाच्या पुढे दोन पावले असता आणि आपली मते रोख-ठोकपणे मांडता' अशा शब्दात साहेबांचे अभिनंदन केले होते.
राजकीय पक्ष कोणतेही असले आणि त्या क्षेत्रात कितीही मतभेद असले तरी साहेब वैयक्तिक संबंध कसोशीने जपतात हे त्यांचे एक स्वभाव वैशिष्ट्य मी जवळून अनुभवले आहे. त्याचप्रमाणे कला, साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, क्रीडा, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिंशी त्यांची अगदी जवळचे संबंध राहिले आहेत याचे प्रमुख कारण म्हणजे या सर्व विषयांचा ते बारकाईने अभ्यास करतात आणि रसिकतेने, जे जे उत्तम त्याचा आस्वाद घेण्याची उच्च अभिरुची त्यांनी जोपासली आहे. राजकारण आणि प्रशासन, प्रवास, यात इतके व्यग्र राहूनही साहेबांचे वाचन थक्क व्हावे इतके विस्तृत आणि सखोल असते. त्यांच्या वाचनासाठी त्यांना कोणताच विषय वर्ज्य नसला तरी त्यांची आवड-निवड अगदी चोखंदळ असते.
राजकारणात, संभाषणात, वक्तव्यात 'डिसेन्सी'ची एक विशिष्ट पातळी कधीही न सोडण्याचा त्यांचा गुण इतर राजकीय नेत्यांनी घेतला तर मला वाटते की आपल्या राजकीय क्षेत्रात एक सुसंस्कृतपणा नक्कीच येईल. आज त्याची नितांत गरज आहे.
(No subject)
अमेरिकेत शरद पवार पॅटर्न
सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. मतदान प्रक्रियेसाठी चार दिवसांचा कालावधी राहिले असून आता प्रचारही शिगेला पोहोचला आहे. जो बायडेन यांचं फ्लोरिडा येथील भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांचं भाषण सुरू असताना अचानक पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवलं. गेल्या वर्षी साताऱ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं भाषण सुरू असताना अचानक पाऊस आला होता. त्यावेळी त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरू ठेवलं होतं. त्याचा निवडणुकीतील प्रचारावर मोठा प्रभावही दिसून आला होता
____
ट्रम्प चा फडणवीस होणार
https://www.loksatta.com/maharashtra-news/ncp-mla-rohit-pawar-reaction-o...
माणूस बारा बारा चा आणि लेख
माणूस बारा बारा चा आणि लेख बारा बारा बारा चा.
पंधरा नऊचा पण तरकून असतो
पंधरा नऊचा पण टरकून असतो
शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा
शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा
105 घरी बसले म्हणून तोंड कडू झालेल्यानी आज मसाला दूध प्राशन करावे
घरी कसे बसतील? निवडू़न आलेले
घरी कसे बसतील? निवडू़न आलेले सगळेच विधानसभेत जातात.
बायडन जातीयवादी नाहीत.
बायडन जातीयवादी नाहीत.
एकदा फक्त स्वताच्या बळावर
एकदा फक्त स्वताच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता आणून दाखवा आणि मग बाकीच्या गमजा मारा
घरी कसे बसतील? निवडू़न आलेले
घरी कसे बसतील? निवडू़न आलेले सगळेच विधानसभेत जातात.>>>>>
भारी आहे. यंदा पावसाळी अधिवेशनात तोंडावर आपटलेले मग दुसर्याला उभयचर नावाने संबोधत बसतात. ( आले होते का ते विधानसभेत? )
काय ते कौतुक पावसात भिजल्याचे
काय ते कौतुक पावसात भिजल्याचे..... शिवसेनेनेने संधीसाधूपणा केला नसता तर यांचे पण जेवढे निवडून आलेत तेव्हढे (यांच्याच भाषेत) घरीच बसले असते!
पण झाले ते चांगलेच झालेय.... यांनी जो कारभार चालवलाय तो बघून पुढच्या निवडणूकीत (जेंव्हा होईल तेंव्हा) मज्जा येणारेय

चुकूनमाकून एकत्र लढलेच तर कोण कुणासाठी किती जागा सोडतेय ते बघायला मज्जा येईल.... भाजपा त्याबाबतीत किती उदार होती ते उमजेल सेनेला.... तोपर्यंत करुन घ्या मज्जा!
आमचे वाजपेयी पण भिजले होते
आमचे वाजपेयी पण भिजले होते बरं का पावसात, पण त्यांनी फोटोसेशन नाही केले स्वतःचे. काही लोक असतात बॉ मला पहा नी फुले वहा कॅटॅगरीतले.
ट्रम्प चा फडणवीस होणार
ट्रम्प चा फडणवीस होणार
>>
बिडेन कोणाला फोडणार? ट्रम्पचा कोणी युतीपार्टनर आहे का?
स्वताच्या बळावर महाराष्ट्रात
स्वताच्या बळावर महाराष्ट्रात सत्ता
असे आनि अशा अर्थाच बर्याच आयडींकडून सतत ऐकायला मिळत आहे .. हा काय प्र कार आहे . ? महाराष्ट्रदेम्हणजे मेंढरं आहेत का एकरकमी एक गठ्ठा एकीकडेच जायला ?? हे तमाम सो-काल्ड राजकीय पक्ष असे कोण लागोण गेलेत?? असं झालंच तर तुमही राहात असलेल्या समुदायाच्या निर्णय आणि आकलनक्षमतेवर भलेमोठं प्र श्नचिन्ह ठेवले पाहिजे हे कळायला फार अक्कल लागते का ?.
पाशवी बहुमत भयानक असतं हे पन्नाअसेक वर्षांपुर्वी आपण अनुभवलं, आताही अनुभवतो आहोत ..तरीही आपण असले विनोदी तारे तोडत असू तर आपल्या अक्कलेबद्दल गंभीर शंका येते ..आपल्या बिन्डोकपणाचा असा जाहीर प्रचार करू नका ,,ते राजकारण्यांचे काम आहे. संध्याकाळी ताटातली कोरभर भाकरी कमी होतेय का क्काय हे बघण्याचे काम आटोप्ण्यात अख्खा जलम आटोपतो.. चालले स्वबळावर महाराष्ट्राच्या गप्पा कराय्ला
स्वबळावर सत्ता - हे
स्वबळावर सत्ता - हे तुमच्यातल्या विविधतेवर ,, जी तुमची मूळ ओळख आणि संपत्ती आहे, ,दाखवलेला अविश्वास आहे. '''आमच्या गावात अशी पद्धत हाय' असं जेमेतेम पाच मैलावरच्या पावण्याला सांगून मग त्याला तसं आपसूक वागाय्ला भाग पाडून त्यचा पाहुणचर करणे; ही इथली हजारो वर्सांची पद्धत .. तुम्हा बिन्डोक लोकंना सारी मेंढर्म एका रंगात एका ढंगात एका शिस्तीत एका दावणीत चराय्ला लावण्याची हवस .. च्या आयला मानूस म्हनायचं का कोन तुम्ही.
भांडा
भांडा
तिकडे मोदींनी ब्यांक अन एटीएम वर टेक्स लावला
नसरुद्दीन शहाचा भाऊ
नसरुद्दीन शहाचा भाऊ जमिरुद्दीन शहा सैन्यादलात मोठ्या पोस्टवर होता, अहमदाबाद दंगलीच्यावेळी तो म्हणे नेमका तिथेच होता.
त्याचे आत्मचरित्र आले आहे व ते मराठीमध्येही भाषांतरीत झाले आहे.
तो लिहितो , मुंबई दंगल शरद पवारांनी जशी लवकर शमवली, तशी गुजरातच्या राज्यकर्त्यांना तिकडची दंगल लवकर शमवणे जमले नाही.
शहाचे वडील फाळणीच्यावेळी सर्व पाकिस्तानात सोडून भारतात आले व इथे शून्यातून सर्व निर्माण केले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2159727367527375&id=10000470...
बरा वर निघाला हा लेख. मला
बरा वर निघाला हा लेख. मला ह्यात काय इंट्रेस्टिंग वाटलं ते म्हणजे दोन वेगळे दृष्टिकोन. एक करंदिकरांचा ज्यांनी पवारांचे काम जवळून बघितले आहे आणि दुसरा पादुकानन्दांचा जो माझ्यामते बर्याच बाहेरुन बघणार्या, बातम्यांच्या आधावार, राजकीय घडामोडी बघून त्याच्यावर बेतलेला.
मी पण हे दोन्ही दृष्टिकोन एकलेले आहेत आणि ते नेमके कसे आहेत, आयुष्यात त्यांचा मेन गोल, ड्राईव काय आहे हे खरं कोणालाच माहित नसावं. लोकल लेवलला ते काय करतात, त्याचा नक्की फायदा कोणाला होतो आणि त्याचं जेव्हा रिपोर्टिंग (मिडिया मध्ये) होतं त्यात त्यांचा काय अजेंडा आहे हा पण बायस असतोच. आपल्याकडे अनबायस्ड असं रिपोर्टिंग सध्या अस्तित्वात आहे की नाही ह्याबद्दल मला शंका आहे.
बाकी करंदिकरांच्या डिटेल्ड पोस्ट आवडल्या. ह्यातली काहीच माहिती नव्हती.
ब्राह्मण समाजासाठी आरक्षणाचं
ब्राह्मण समाजासाठी आरक्षणाचं सूत्र बसणार नाही”
“ब्राह्मण संघटनांची दुसरी मागणी होती की ग्रामीण भागातील हा वर्ग शहरी भागात येत आहे. त्यामुळे त्यांना नोकरीत अधिक संधी मिळण्याची स्थिती हवी आहे. आम्ही केंद्र आणि राज्याची माहिती गोळा केली होती. त्यात नोकऱ्यांमध्ये त्यांची लोकसंख्येनुसार संख्या अधिकच दिसली. त्यामुळे या ठिकाणी आरक्षणाचं सूत्र बसणार नाही असं मी सांगितलं,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
“काहींनी कुणालाच आरक्षण नको असं म्हटलं”
“काहींनी कुणालाच आरक्षण नको असं म्हटलं. मात्र, मी मागास घटकांना आरक्षण द्यावंच लागेल असं सांगितलं. तसेच आरक्षणाला विरोध करू नये, असंही मी सांगितलं.
https://www.loksatta.com/pune/sharad-pawar-first-reaction-after-meeting-...
देव , देवाचा बाप इ विषयावर
देव , देवाचा बाप इ विषयावर बोलणार होते म्हणे, हे तर नोकरी , आरक्षण इत्यादीवर बोलून आले.
हेच बोलायचे होते तर कविता, केतकी ही कारणे कशाला हवी होती ? हे तर ते पवारांशी कधीही बोलू शकले असते.
केंद्रात ह्यांनी मोदीना 10 वर्षे बसवले , फडनविसना 5 वर्षे इथे बसवले, आणि आरक्षण मागायला 2022 मध्ये पवारांकडे जायचे ?
हे म्हणजे 10 वर्षे एकाबरोबर प्रकरण , 5 वर्षे एकाबरोबर लगीन आणि शेवटी मूल व्हायला विकी डोनर शोधण्यासारखे झाले.
पवारांनी होळकरांच्या जागा
पवारांनी होळकरांच्या जागा हडपल्या असे आयटी वाले व्हाट्सपज्ञान देतात, नेमके काय आहे हे ?
मुंबईतल्या शिंद्यांच्या
मुंबईतल्या शिंद्यांच्या मालमत्ता (ज्या खूप होत्या) विकल्या, दबावाखाली विकल्या, हडपल्या गेल्या आहेत. अशा लोकांना देशी परदेशी पसरलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवायला वेळच नसतो. कित्येकदा रखवालदार, काळजीवाहक, मुनीमजी वगैरेसारखे लोक मधल्यामध्ये बऱ्याच गोष्टी करतात.
शिंद्यांच्या/होळकरांच्या
शिंद्यांच्या/होळकरांच्या/पेशव्यांच्या मालमत्ता म्हणजे?
कित्येकदा रखवालदार, काळजीवाहक
कित्येकदा रखवालदार, काळजीवाहक, मुनीमजी वगैरेसारखे लोक मधल्यामध्ये बऱ्याच गोष्टी करतात.
त्या यादीत चौकीदार शब्द राहिला
:haahaa:
मुंबईत आणि इतर अनेक मोठ्या
मुंबईत आणि इतर अनेक मोठ्या शहरात राजेरजवाड्यांचे महाल, फार्म हाऊसेस, विश्रांतीस्थाने असत. मुंबईत काळाघोडा, फाऊंटन, पेडर रोड भागात अजूनही धनराज महाल, सिंदिया हाऊस, हैदराबाद हाऊस ( किंवा अन्य नाव) अशी विलासस्थाने आत्ताआत्तापर्यंत होती. फाऊंटन जवळ बँक ऑफ इंडिया चे मुंबई ऑफिस हेही एका संस्थानिकांचे राहाते घर होते. सिंदिया स्टीम (की सुमती मोरारजी शिपिंग? नीटसे आठवत नाही. बहुतेक सिंदिया नाव राहिले नव्हते) च्या इमारतीत - जे पूर्वी राजघराण्याचे मुंबईतले निवासस्थान होते - जाण्याची संधी एकदा मिळाली होती. जुना आब राहिला नव्हता तरी राजेशाही पोशाखातले वेटर्स, सगळा म्हणजे काटे, चमचे, बोल्स, थाळ्या वगैरे चांदीचा सरंजाम (निदान पन्नास माणसे होतीच) होता.
अंधेरी पूर्वेस आता विशाल हॉल आहे त्या परिसरात शिंद्यांचा एक सुंदर निवांत असा बंगला होता. मोठे नीट राखलेले आवार होते. तो भाग पूर्वी निसर्गरम्य होता आणि आसपास अनेक फिल्म स्टुडिओज होते. त्या बंगल्यातून एकेक चीज कमी होताना पाहिली आहे. पुढे पुढे तो अगदी भकास बनला. आता आहे की विकला गेलाय ते माहीत नाही.
आनंद दवे यांनीच शरद
पवार सुज्ञ असतील तर ( वाटत नाही ) त्यांनी तोंडघशी पडु नये, बाकी त्यांची मर्जी.
मटण आमटी म्हणजे काय?
मटण आमटी म्हणजे काय?
एखाद्या ब्राह्मणाने काही बाही बोलले की लग्गेच अॅट्रॉसिटी लागेल
एकूण अॅट्रॉसिटी कशी लागते याचा काही गंध आपल्याला असेल असे काही वाटत नाही.
मीट करी मिटकरी
मीट करी
मिटकरी
मटण आमटीचे नाव लिहायला चिंचगूळआमटीवाले घाबरतात
मटण आमटीचे नाव लिहायला
मटण आमटीचे नाव लिहायला चिंचगूळआमटीवाले घाबरतात।।।।। चिंगुस कुठले
(No subject)
<< काय आहे , इतर जातीला
<< काय आहे , इतर जातीला एखाद्या ब्राह्मणाने काही बाही बोलले की लग्गेच अॅट्रॉसिटी लागेल, पण बाकी समाज कितीही गरळ ओकु द्या त्यांना कोणी काहीच बोलणार नाही. >>
------ गेल्या ७० वर्षात या अॅट्रॉसिटीचे बरेच स्तोम माजले आहे. यांना बरोबरीचे हक्क हवे आहेत हाच आजच्या ब्राह्मण्यवाद्यांवर मोठा अत्याचार आहे. त्या आधी अनेक अनेक शतके कसे मस्त छान चालले होते... ते गतवैभव परत कधी येणार?
Pages