....जिप्सी-लमाणी ती

Submitted by वैवकु on 15 November, 2012 - 11:33

इतरत्र प्रकाशित करण्यास आधीच दिलेले असल्याने व इथे प्रकाशित करायची परवानगी त्या प्रकाशकाकडून न घेतल्याने हे लेखन काढून टाकले आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>गझलच्या आकृतीबंधात अवघड दोन ओळी मी
सरल अष्टाक्षरी छंदात अनवट बोलगाणी ती

मनावर हिरवळी दाटायच्या भेटायची तेंव्हा
सहार्‍यासारख्या माझ्या मनी पाऊस आणी ती

किती ती शुद्ध हरपावी कुणी प्रेमामधे सांगा
सवे असलो जरी मी ...गायची माझी विराणी ती>>

अत्यंत सुंदर,

पण पहिली अन शेवटची द्विपदी जरा स्पष्ट झाली नाही..

जगालेखी म्हणे वेडापिसा मी अन् दिवाणी ती
नका विश्वास ठेवू माणसे भलती शहाणी ती
पहिल्या ओळीत 'मी वेडापिसा' अन 'ती दिवाणी 'असेच ना ? असे जग म्हणते म्हणजे 'ती माणसे' म्हणतात, तर विश्वास या दोन्हींवर नाही की यातल्या एकावर? कारण अन्यत्र मी अन ती चे वेगळेपण मांडलेय..

तिच्यासाठी शहरवस्तीत आता नांदतो आहे
खरेतर जिंदगी जगलोय मी जिप्सी-लमाणी ती
तिच्यासाठी शहरवस्तीत नांदणे म्हणजे ती शहरी असली पाहिजे, मग 'लमाणी ती' कशी ?की माझी समजून घेण्यात काही चूक होतेय?

आता स्पष्ट झाले, हे कळल्यावर की 'ती'' हे विशेषण जिंदगीचे आहे. मतलाही 'ती' चे वेगळेपण समजून घेतल्यावर अधिक उलगडला..
लेखन शुभेच्छा !