अख्खा मसुर - २५० ग्राम
हिरव्या मिरच्या उभी चीर देउन कापलेल्या - २ ते ३
लसणाच्या पाकळ्या - ७ ते ८ ठेचलेल्या, अमेरिकेत मिळणार्या ३-४ पुरतील.
बारीक कापलेले कांदे - २
मीठ - चवी प्रमाणे
तुप - २ ते ३ चमचे
तेल - १ डाव
हिंग - १ छोटा चमचा
जीरं - १ चमचा
हळद - १ छोटा चमचा
लाल तिखट - १ ते दिड चमचा
कोथिंबीर
ह्यात आधी मसुर कुकर मध्ये शिजवुन घ्यायचा आहे आणि मग त्यात तुप + लसणाची फोडणी द्यायची आहे.
मसुर आधी रात्रंभर किंवा ७-८ तास भिजवुन घ्या.
मसुर शिजवायची कृती:
१. एका प्रेशर पॅन मध्ये, १ डाव तेल घाला.
२. तेल नीट गरम झालं की त्यात उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या, आणि कांदा घालून ५ मिनिटं परतुन घ्या.
३. नंतर त्यात हळद, तिखट घाला आणि ते २-३ मिनिटं परतुन घ्या.
४. आता भिजवलेला मसुर घाला. मसुन शिजायला लागेल इतकं आणि अंगासरशी रस्सा होईल इतकं पाणी घाला.
५. चवीप्रमाणे मीठ घाला, आणि प्रेशर पॅनचं झाकण लाऊन मसुर शिजवुन घ्या. एका शिट्टीमध्ये मसुर शिजवला जातो. जास्त शिट्ट्या केल्या तर लगदा होईल.
आता फोडणीची कृती:
१. फोडणीच्या भांड्यात तुप घाला.
२. तुप गरम झाल्यावर त्यात ठेचलेला लसुण घाला. लसुण एकदम कुरकुरीत लालसर झाला कि त्यात हिंग घाला.
३. ही फोडणी शिजवलेल्या मसुरवर ओता आणि व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
४. वरुन कोथिंबीर घाला, आणि गरमा गरम सर्व्ह करा.
हा फोटो:
१. तुप आणि लसणाची फोडणी मस्ट आहे, त्याशिवाय चव नाही.
२. मसुर पटकन शिजतो, म्हणुन कुकरची एक शिट्टी झाली कि गॅस बंद करा.
३. चवीप्रमाणे तिखट, मीठ अॅडजस्ट करा.
मस्त. लसूण आणि तुपामुळे एकदम
मस्त. लसूण आणि तुपामुळे एकदम टेस्टी लागेल.
वा वा, मस्तं पाककृती! अवलची
वा वा, मस्तं पाककृती!
अवलची आणि ही दोन्ही करून बघायला हव्या.
एकदम यम्मी दिसतोय... मसुर खुप
एकदम यम्मी दिसतोय...
मसुर खुप आवडतात... सो नक्की करुन बघणार
आमच्याकडे मसूर अजिबातच आणला
आमच्याकडे मसूर अजिबातच आणला जात नाही पण वरचा फोटो मस्त आहे. एक सांग एक डाव तूप लिहिलं आहेस ते चुकून का?
वॉव! तोंपासु. मसूर माझ्या
वॉव! तोंपासु.
मसूर माझ्या प्रचंड आवडीचा
जमल्यास अख्ख्या मसूराचा फोटो
जमल्यास अख्ख्या मसूराचा फोटो टाक. मला मसुराची डाळच आठवतेय
सायो, हा घे अख्खा मसूर.
सायो, हा घे अख्खा मसूर.
मुगाचं मेदगं करतात तसे आहे का
मुगाचं मेदगं करतात तसे आहे का हे?
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
छान रेसिपी.. संपदाने जो फोटो
छान रेसिपी..
संपदाने जो फोटो टाकलाय तो आणि मिनी च्या रेसिपीतला फोटो, दोन वेगवेगळे मसूर आहेत का ?
भारतात सहसा बारीक मसूर वापरला जातो, पण गल्फमधे जरा मोठा आणि पसरट असतो. दोन्हींची चव पण जरा वेगळीच असते.
अगो, मृ, लाजो, दक्षिणा
अगो, मृ, लाजो, दक्षिणा धन्यवाद. सायो, चुक सुधारली आहे. तसं तेल कमी करुन तुप जास्त घातलं तरी चांगलं लागेल.
दिनेशदा, तुमचं बरोबर आहे. वर संपदाने टाकलेला मसुन इथे इंग्रो मध्ये मिळतो. माझ्या फोटोमध्ये जो आहे तो देशातुन आणलेला आहे. मला चव जास्त देशातल्या मसुरची आवडली.
पादुकानन्द, मुगाचं मेदगं काय आहे ?
मस्त! करून बघेन. मसुराचे
मस्त! करून बघेन. मसुराचे प्रकार आवडीचे आहेत.
मस्त आहे रेसिपी.. तुम्ही
मस्त आहे रेसिपी..
तुम्ही लो़कं इंग्रोतून मसूर आणता तो मसूरच आहे हे कसं ओळखता?माझ्याकडचा इतका मोठा आहे की मला तो अख्खा तूर असावा अशी शंका आहे....यावेळी देशातून मी छोटावाला घेऊन येणार आहे....
मिनी, तू दोन ठिकाणी मसूर च्या ऐवजी चुकून मसून लिहिलं आहेस... लाऊन ला रायमिंग म्हणून....पुढच्यावेळी रेसिपी लिहिताना ही चांगलीच डोळ्याखालून घालणार
वेका, हो की. केला बदल.
वेका, हो की.
केला बदल.
वेका, मसुराची डाळ केशरी असते
वेका, मसुराची डाळ केशरी असते आणि तुरीची पिवळी. आख्ख्या दाण्यांपैकी काहींचे तरी साल निघून आलेले असतेच त्यावरुन कळू शकते.
आज मी खाट्टं आणि ह्या रेसिपीचा संकर केला डाळ भाजून पाणी घालून शिजवली. चिंच घातली नाही. पंधरा-वीस मिनिटांत शिजली डाळ. आणि मग तुपाची फोडणी करुन वरुन ओतली. भारी लागतंय गरमागरम भाताबरोबर
अरे वा अगो! सही आहेस, लगेच
अरे वा अगो! सही आहेस, लगेच करुन पण बघितलंस.
आगो चित्रावळ काढून ठेवलेलीस
आगो चित्रावळ काढून ठेवलेलीस की नाही?
अगो, केशरीच आहे पण भिजवल्यावर
अगो, केशरीच आहे पण भिजवल्यावर जरा जास्त्च ट्मटमीत होते. अलमोस्ट शेंगामधला तूर असतो तितकी