Submitted by kaaryashaaLaa on 5 October, 2008 - 23:52
गूढ तव डोळ्यात केंव्हा, चांदणे हसलेच नाही
तू तमाला झेलले, नाही कधी म्हटलेच नाही
केवढी तलखी उन्हाची, सावली झालीस माझी
पोळ्ले तव पाय तरिही, मागुती वळलेच नाही
संधिकाली शांतवेळी, दाटले डोळ्यात पाणी
धुंद मी तव संगती अन्, कधि मला दिसलेच नाही
आठवांच्या सोबतीने, रात्र सारी जागताना
बेफिकीरित मस्त मी, मज दु:ख तव कळलेच नाही
साठले हृदयातळी जे, दाटले काठावरी, पण
दु:ख सांगाया मनातिल, ओठ तव हललेच नाही
आज मी येथे रिता अन्, दूर तूही पोचलेली
किति भराव्या ओंजळी परि ऋण तुझे फिटलेच नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच भराव्
छानच
भराव्या खट़कल
म्हणून ९
केवढी तलखी
केवढी तलखी उन्हाची, सावली झालीस माझी
पोळ्ले तव पाय तरिही, मागुती वळलेच नाही
साठले हृदयातळी जे, दाटले काठावरी, पण
दु:ख सांगाया मनातिल, ओठ तव हललेच नाही
खुप आवडले...
वरील चर्चेमुळे दोषही कळले.. मार्क मात्र किती द्यावे समजत नाही. भावासाठी गजल आवडली पण गजल म्हणुन थोडे दोष आहेत असे वरील विवेचनावरुन वाटतेय.. आपल्याला भाव थोडाफार कळतो, व्याकरणात अजुन गती नाही.
तरीही माझे मार्क ५.
Pages