अध्यात्मवाद्यांची ईथे बोलतीच बंद आहे...

Submitted by आळुच्या वड्या on 11 November, 2012 - 23:36

अध्यात्मवाद्यांची ईथे
बोलतीच बंद आहे
दिलेल्या उत्तरांना
पोथीपुराणांचा वास आहे

विज्ञानाचा म्हणे यांना
फार दुस्वास आहे
विज्ञानाची फळे खाऊन
रोजचीच 'नमकहरामी' आहे

सिद्ध न करिता आत्मा
त्यावरच ईमले बांधले
द्रव्य मिळते बक्कळ
तर द्या ठोकुन चांगले

काढले चॅनल
वापरतात जरी मोबाइल चांगले
विषय विज्ञानाचा आला
कि काढती पुराणातील वांगे

२१व्या शतकात
हे जगती मध्ययुगात
जनाला ढकलती हे
पुन्हा अश्म युगात..

धुळ चढलेले ग्रंथ
हीच यांची शिदोरी
तर्कनिष्ठ विज्ञानाला
मुर्ख म्हणती हे मर्कट भारी

विज्ञानालाच यांनी
बनवले धुळफेकअस्त्र
पाण्यावरती आग लावुन
लोकांस करती भ्रष्ट

द्या 'वैज्ञानिक' लाथ
यांच्या पेकाटात
पळुन जातील
कुठे तरी लांब 'केकाटत'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूलोकीवरचा आय डी आणि डु आय डी कोण हेही तुम्हाला समजेना... उगाच आत्मा आणि परमात्मा यांच्या बाता कशाला करता सामोपचारराव? Biggrin

--गुढग्यात देव बसवून घेतलेला..
धनगरी आंबा

Pages