अध्यात्मवाद्यांची ईथे बोलतीच बंद आहे...

Submitted by आळुच्या वड्या on 11 November, 2012 - 23:36

अध्यात्मवाद्यांची ईथे
बोलतीच बंद आहे
दिलेल्या उत्तरांना
पोथीपुराणांचा वास आहे

विज्ञानाचा म्हणे यांना
फार दुस्वास आहे
विज्ञानाची फळे खाऊन
रोजचीच 'नमकहरामी' आहे

सिद्ध न करिता आत्मा
त्यावरच ईमले बांधले
द्रव्य मिळते बक्कळ
तर द्या ठोकुन चांगले

काढले चॅनल
वापरतात जरी मोबाइल चांगले
विषय विज्ञानाचा आला
कि काढती पुराणातील वांगे

२१व्या शतकात
हे जगती मध्ययुगात
जनाला ढकलती हे
पुन्हा अश्म युगात..

धुळ चढलेले ग्रंथ
हीच यांची शिदोरी
तर्कनिष्ठ विज्ञानाला
मुर्ख म्हणती हे मर्कट भारी

विज्ञानालाच यांनी
बनवले धुळफेकअस्त्र
पाण्यावरती आग लावुन
लोकांस करती भ्रष्ट

द्या 'वैज्ञानिक' लाथ
यांच्या पेकाटात
पळुन जातील
कुठे तरी लांब 'केकाटत'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

रोजचिच नमकहरामि, हे खरे आहे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने प्रवचन देणारे भोंदुंना चपखल लागु.
'वैज्ञानिक' लाथ ,शब्दप्रयोग आवडला.

आंबा1,बा.बु, प्रोफेसर
धन्यवाद.

आंबा1,बा.बु, प्रोफेसर
धन्यवाद.

भोंदू लोक, अध्यात्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली करणार्‍या संस्था (सर्व नव्हे) अशांना उद्देशून असेल तर अतिशय योग्य आहे.

आशा आहे की या असल्या विचारांच्या तराजूत सर्वांनाच तोलण्याचा तुमचा (आणि असे विचार असणार्‍या सर्वांचा) रोख नसावा.

>>>> आशा आहे की या असल्या विचारांच्या तराजूत सर्वांनाच तोलण्याचा तुमचा (आणि असे विचार असणार्‍या सर्वांचा) रोख नसावा. <<<<
सर्वांवर रोख नाहिच्चे मुळी! Proud
शेवटच्या लाथ/पेकाट्/केकाट इत्यादी ब्रिगेडी कडव्यात तो रोख कुठे/कुणावर व का वगैरे आहे ते कळते! तुम्हाला अजुनही कळले नसेल तर अभ्यास वाढवा बोवा तुमचा Wink
तसेच सरड्याची धाव कुंपणापर्यंत, या म्हणीप्रमाणे या लाथा/पेकाट/केकाट इत्यादींच्या धावेची मजलही कुठवर अन किती टक्क्यांवर आहे ते काय वेगळे सिद्ध करायला हवे का? Proud

लिंबूदा, मला ते कळत नाही असे वाटले का ? Wink
पण काये की, सतत वाद विवाद आणि भांडणे याने काय साधणार आहे ? (फक्त मूठभर राजकारण्यांचा स्वार्थ)
तुम्हाला ती एकनाथ आणि विंचवाची गोष्ट माहिती आहे ना ? Happy (केवळ संदर्भासाठी म्हणत आहे हो)

(स्वगत : छे लिखाणात बरेच कंस यायला लागले आहेत. Sad )

शेवटच्या लाथ/पेकाट्/केकाटइत्यादी ब्रिगेडी कडव्यात तो रोख कुठे/कुणावर व का वगैरे आहे ते कळते! तुम्हाला अजुनही कळले नसेल तर अभ्यास वाढवा बोवा तुमचा
तसेच सरड्याची धाव कुंपणापर्यंत, या म्हणीप्रमाणे या लाथा/पेकाट/केकाट इत्यादींच्या धावेची मजलहीकुठवर अन किती टक्क्यांवर आहे ते काय वेगळे सिद्ध करायला हवे का?>>>> चोराच्या मनात चांदणे, या उक्तीप्रमाणे लिंबुने सत्य उघड केले आहे. गझलेचा खरा अर्थ त्या आळुच्या वड्यालाच माहित.

बाय द वे...

ही ग-झ-ल नाही.

गझलेतील कोणतेही अंग यात नाही. तेंव्हा कृपा करून हे काव्य केवळ कविता या सदरात टाकावे.

अ. अ. जोशी | 12 November, 2012 - 11:55
साळसूद,
तुम्हीच खाजविता आहात सारखे..... म्हणून मला प्रश्न पडला होता बरं....
आणि हो
ही गझल नाही.>>>>अअजो मी गझलेतला तज्ञ नाही ,ते अ वा ला सांगा. दिवाळीच्या शुभेच्छा.

आळुच्या वड्या,

आशय पटला नाही. मन कुठे दिसतं? मग सायकॉलॉजीत पीएचडी करणारेही भोंदू ठरतात, नाहीका? तुम्हाला वेव्ह फंक्शन दिसत नाही हे माहीती आहे का? असं असलं तरी वेव्ह फंक्शनवाचून क्वांटम मेकॅनिक्सचं पान हलत नाही! Uhoh

आ.न.,
-गा.पै.

टीप : आपल्याला वेव्ह फंक्शन म्हणजे काय हे माहीत नसल्यास विज्ञानवादी वगैरे शब्दप्रयोग टाळावेत.

आळुच्या वड्या,
आशय पटला नाही. मन कुठे दिसतं? मग सायकॉलॉजीत पीएचडी करणारेही भोंदू ठरतात, नाहीका? तुम्हाला वेव्ह फंक्शन दिसत नाही हे माहीती आहे का? असं असलं तरी वेव्ह फंक्शनवाचून क्वांटम मेकॅनिक्सचं पान हलत नाही!
आ.न.,
-गा.पै.>>>> गामा, लगेच उंटाचा मुका घ्यायला कशाला जातोस? गझल चांगली ,वा, वा म्हणायचं ,भाटगिरी करायची ,सोडुन द्यायचं ,कसं?

आळुच्या वड्या,
आशय पटला नाही. मन कुठे दिसतं? मग सायकॉलॉजीत पीएचडी करणारेही भोंदू ठरतात, नाहीका? तुम्हाला वेव्ह फंक्शन दिसत नाही हे माहीती आहे का? असं असलं तरी वेव्ह फंक्शनवाचून क्वांटम मेकॅनिक्सचं पान हलत नाही!
आ.न.,
-गा.पै.>>>> गामा, लगेच उंटाचा मुका घ्यायला कशाला जातोस? गझल चांगली ,वा, वा म्हणायचं ,भाटगिरी करायची ,सोडुन द्यायचं ,कसं?

आळुच्या वड्या,
आशय पटला नाही. मन कुठे दिसतं? मग सायकॉलॉजीत पीएचडी करणारेही भोंदू ठरतात, नाहीका? तुम्हाला वेव्ह फंक्शन दिसत नाही हे माहीती आहे का? असं असलं तरी वेव्ह फंक्शनवाचून क्वांटम मेकॅनिक्सचं पान हलत नाही!
आ.न.,
-गा.पै.>>>> गामा, लगेच उंटाचा मुका घ्यायला कशाला जातोस? गझल चांगली ,वा, वा म्हणायचं ,भाटगिरी करायची ,सोडुन द्यायचं ,कसं?

ही स्मायली घ्या आणी तुमच्या कविता/गझलच्या प्रत्येक कडव्याप्ढे लावा...फार परिणाम कारक अर्थ निष्पत्ती होइल त्यामुळे . Wink

साळसूद,

>> गामा, लगेच उंटाचा मुका घ्यायला कशाला जातोस?

आयला, हा उंटाचा मुका होय? पण लाथा झाडणार्‍याला गाढव म्हणतात. Proud निदान मराठीत तरी! असो. आपली कळकळ पोहोचली.

त्याचं काये की एकीकडे विज्ञानाचं नाव घेऊन लाथाळ्या करायच्या आणि दुसरीकडे विज्ञान कशाशी खातात ते ठाऊक नाही. लोका संगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: मात्र कोरडे पाषाण. मग असले लोक त्या भोंदूबाबांसारखेच नाहीत काय?

त्यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात बांधल्या पाहिजेत. Biggrin

आ.न.,
-गा.पै.

अतिशय सुंदर गझल.............सॉरी सॉरी सॉरी.....कविता.........सॉरी सॉरी सॉरी...रचना.

आशयाचा आसूड कचकन ओढला आहे. इतकी सुंदर रचना आजतागायत वाचनात आली नव्हती. गुडघा बरा आहे का आता?

अ.अ.जोशी, याला मुक्तछंदातली गझल म्हणायला हरकत नाही ना तुमची? Wink की आपली कविताच म्हणूया? Proud

Pages