प्रवेशिका - १९ ( mrunmayee - आसवे हा मानला... )

Submitted by kaaryashaaLaa on 5 October, 2008 - 23:45


आसवे हा मानला मी दोष नाही
एवढा माझा खुजा संतोष नाही

छेडल्या तारा मनीच्या आर्जवाने
'हा तराणा एकटा'- हा घोष नाही

ना तरी नव्हतीच आशा सोबतीची
जाउ द्या माझा कुणावर रोष नाही

वेदनांचा कैफ इतका मस्त होता
राहिला जागेपणीही होष नाही

पचविले आयुष्यभर इतके हलाहल
अन तरी शमलाच अजुनी शोष नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेदनांचा कैफ इतका मस्त होता
राहिला जागेपणीही होष नाही

वा! मस्तच! शेवटचे तिन्ही शेर आवडलेत.

८ गुण.

वेदनेचा कैफ मस्तच,
तराणा>>कळ्याच नै Uhoh

बरी आहे.
तराण्याचा घोष नीट ऐकू आला नाही.
मिस-यांधील कनेक्टीव्हिटी (परस्परसंबंध)कमजोर वाटतेय.
माझे गुणः ३

होश की होष?
माझे ४
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

शेवटचे ३ आवडले...
माझे गुण ५*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

मतला, मक्ता आणि वेदनांचा कैफ आवडले.
५ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

'कैफ' चा शेर मस्त आला आहे. मात्र 'होष' हा शब्द 'होश' असा लिहायला हवा. (अर्थात होश नसल्याचे आधीच जाहीर केल्यावर अशा छोट्याशा गोष्टीची दखल घेण्याचं काही कारण नाही म्हणा Happy )

पहिल्या शेरात आणि शेवटच्या शेरात दोन्ही ओळींमधला संबंध नेमकेपणाने व्यक्त होत नाही असं वाटलं. 'हलाहल पचवल्याने शोष शमतो' असा अर्थ होतो आहे असं वाटलं. हे विसंगत नाही का?

माझ्या मते ५ गुण.

-सतीश

>>वेदनांचा कैफ इतका मस्त होता
राहिला जागेपणीही होष नाही>>

झकास!

६ गुण. ''होष' ऐवजी 'होश' चालले असते.

होष आणि होश हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. तसेच बेहोष/बेहोश हे ही.
संदर्भ : शब्दरत्नाकर.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

पचविले आयुष्यभर इतके हलाहल
अन तरी शमलाच अजुनी शोष नाही

क्या बात है...

८ गुण..

वेदनांचा कैफ इतका मस्त होता
राहिला जागेपणीही होष नाही

पचविले आयुष्यभर इतके हलाहल
अन तरी शमलाच अजुनी शोष नाही

मस्त!

बर्‍याच ठिकाणी गद्य वाटतय.. गेयता कमी वाटली..
४ गुण..

वेदनांचा कैफ इतका मस्त होता
राहिला जागेपणीही होष नाही
मस्त---५ गुण