नमकीन काजु..[शंकरपाळे]

Submitted by सुलेखा on 9 November, 2012 - 05:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिलेल्या प्रमाणानुसार साहित्य घेतले तर हे नमकीन काजु खूपच खुसखुशीत होतात.तेलकट होत नाहीत.त्यासाठीचे साहित्य :-
१ वाटी मैदा.
१ वाटी बारीक रवा.
पाऊण वाटी कडकडीत तेलाचे मोहन.
पाऊण कप दूध-कोंबट
१/२ चमचा मीठ.
१ सपाट चमचा ओवा.
तळायला तेल.[साधारण दिड वाटी ]
१/२ चमचा मिरेपुड.
एक लहान टिणाचे झाकण.इथे मी रुह्-आफ्जाच्या बाटलीचे झाकण वापरले आहे.

क्रमवार पाककृती: 

मैदा,रवा,मीठ व ओवा एकत्र करावा.
त्यात कडकडीत तेलाचे मोहन घालुन चमच्याने मिश्रण छान एकत्र करावे.
मोहन घातल्यावर हे मिश्रण असे दिसेल.
kaju-1111111.JPG
आता दुध घालुन पिठ भिजवुन घ्यावे.
[दुध लागेल तसे थोडे-थोडे घालत भिजवावे.]
पिठ भिजवले आहे.प्रमाणासाठी वापरलेली वाटी,चमचा व कप व भिजवलेला पिठाचा गोळा--
kaju-222222.JPG-
साधारण १५ ते २० मिनिटे पिठाचा गोळा झाकुन ठेवावा.
त्यानंतर एकुण गोळ्याचे ३ भाग करुन घ्यावे.
प्रत्येक गोळा वळुन घ्यावा.
आलु-पराठ्याइतका जाड लाटावा.
टिणाच्या झाकणाने त्याचे काजु च्या आकाराचे भाग करुन घ्यावे.
हे साधारण असे दिसेल.
kaju-3333333.JPG
असे सर्व "काजु"करुन घ्यावे.
आता
या तळुन झालेल्या प्रत्येक घाण्यावर थोडीशी मिरेपुड पसरवा.
गरम काजुवर मिरेपुड टाकली कि ती काजुवर चिकटेल..
ओव्याऐवजी जिरे किंवा शहाजिरे घालता येईल..
kaju-55555_0.JPG
थंड झाले कि काजु डब्यात भरा.
खुसखुशीत काजु तयार आहेत.

अधिक टिपा: 

तेल एकदा तापवुन गॅस कमी करुन हे काजु तळायचे आहेत.
दिलेल्या प्रमाणानुसार साहित्य घेतले तर काहीच चुकणार नाही.
झाकणाची ट्रीक एकदा जमली कि काजु भराभर होतात.

माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तळलेल्या काजूंची वाट बघतोय. मी एका गुजराती कुकरी-शोमध्ये पाहिलेल्या आणि फॉलो केलेल्या रेसिपीप्रमाणे नुसत्या मैद्याच्याच पोळ्या लाटून , एका पोळीवर कॉर्नफ्लोरचा साठा चिरोट्यांसारखा लावून, त्यावर दुसरी पोळी दामटून बसवून, मग काजू कापायचे होते.
आता तुमच्या कृतीने करून पाहीन.

सस्मित्.नाही ,मिरेपुड टाकायला विसरले नाही.
त्या २-३ ओळी तेलात तळणं.मिरेपुड घालण वगेरे मला अवलोकन मधे दिसतातेत पण संपादन मधे गायब आहेत्..खुप वेळा प्रयत्न केलां. नव्या ओळी अ‍ॅड पण होत नाहीत. तयार काजु फोटो चे ही तसेच झाले..
नेट चा प्रॉब्लेम असावा बहुतेक..

भरत, साटा लावुन केले तर तेलकट होतील्.या पद्धतीने खुट्खुटीत व खस्ता होतात.
भरत--तयार का.शं.चा फोटो आता दिसतोय ना ?
ख.चि.--करुन पहाणार ना ? कि प्र.चि पाहुनच पोट भरले..

तयार का.शं.चा फोटो आता दिसतोय ना ?
>>>
तळल्यानंतरचे काजु सिदत नाहीयेत. काजु चे आकार कापून स्टीलच्या ताटलीत ठेवलेत्ते दिसतायत Happy

तळलेल्याचा फोटो दिसत नाहीए. ताटात रांगेने बसलेत ते तळून घ्यायला तयार आहेत असे वाटतेय!

..साटा लावून केलेले तेलकट दिसत नाहीत, पण पोटात गेल्यावर प्रताप दाखवतात. घशाशी जळजळ.इ. त्यातून मी केलेले पूर्ण मैद्याचे होते.

भरत,इतक्या प्रयत्नानंतर आता काजु फोटो दिसत आहे.मी या फोटोची आधीची जागा बदलली.एक ओळ वर फोटो टाकला आणि शेवटी जिरे-शहाजिरे ची ओळ लिहीली.[ही ओळ मी या आधी "अधिक टिपां"मधे लिहीणार होते.]त्यामुळे जमले एकदाचे..
हे काजु "प्रताप"दाखवत नाही .रवा वापरल्याने खुटखुटीत होतात.तळताना तेल बेतशीर लागते.हाताला कोरडे लागतात.

सुलेखा, मी आत्ताच करून बघितले. मस्त झालेत. फक्त मी मैद्याऐवजी कणीक वापरली. आणि माझे काजू न होता चंद्रकला(!) झाल्या. सगळ्यांना खूप आवडल्या. खूप खूप धन्यवाद इतकी मस्त रेसिपी शेअर केल्याबद्दल!

मी केलेल्या चंद्रकलांचा फोटू.....

Image1264.jpg