तुझीच वाट पाहत होते

Submitted by amol_koli on 8 November, 2012 - 17:10

मेघांची गर्जना झाली,
काळोखाची साथ त्यास मीळाली.
नयनी अश्रु थांबत न्हवते
मी तुझीच वाट पाहत होते

श्वास तुजा मला जाणवतो
स्पर्श तुजा असह्य होतो
तुज्याच मीठीत मी जगत होते,
आज तुझीच वाट पाहत होते

जसे आठवताना चुंबण तुजे
शहारुण गेले अंग अंग माझे
मण कासावीस आज का होते ?
ते तुझीच वाट पाहत होते

स्वप्नातिल जग हे आपले,
आज कसे कोमेजुनी गेले
एकांताचा दुरावा सोडवीत ते
जसे तुझीच वाट पाहत होते

ती चांदनी रात आठवतेय का तुला?
मी तुझ्याचं खुशीत निजले होते
सोडूनी जान्या आधी तु मजला,
मी तुझीच वाट पाहत होते.

असा दुरावा नको रे मला,
बोलव ना जवळ माझ्या मनाला.
एकटिच आंधारात उभी होते
मी तुझीच वाट पाहत होते.

डोळे मीटुनी आज मला एकदा,
फक्त तुलाच पहायचे होते
पुन्हा कधीतरी जानवेल तुला,
मी तुझीच वाट पाहत होते.

आहे तो चंद्र माझ्या सक्षीला,
आणि अश्रु माझ्या सोबतीला.
जेव्हा जेव्हा नभ पाणावीत होते,
मी तुझीच वाट पाहत होते.

मी तुझीच वाट पाहत होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users