Submitted by सतीश देवपूरकर on 8 November, 2012 - 02:29
गझल
मी तिच्या पत्रातला मजकूर होतो!
भेटण्यासाठी तिला आतूर होतो!!
मायना लिहिताच लिहिणे ठप्प झाले.....
मी तिच्या चिठ्ठीतली हुरहूर होतो!
मीच गंधाळून, तेजाळून गेलो!
मी तिच्या श्वासातला कापूर होतो!!
मी तिचा एकांत इतका व्यापला की,
वाटले नाही तिला मी दूर होतो!
चूक ती माझी, तुझी, की, त्या वयाची?
एकमेकांच्यात दोघे चूर होतो!
मोठमोठ्यांची उडाली पार त्रेधा.....
मी अवेळी लोटलेला पूर होतो!
घेतला आलाप अन् टाळ्या मिळाल्या;
मी जगाला भावलेला सूर होतो!
खेळले आयुष्य माझ्याशी असे की,
सूरपारंबीतला मी सूर होतो!
.............प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खनिगतेलतंत्रज्ञान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहाहा! अजयजी,हा अर्थही छान
हाहाहा!
अजयजी,हा अर्थही छान आहे.
आमच्या मते कामयाब शेराची
आमच्या मते कामयाब शेराची आमच्यापुरती तरी केलेली व्याख्या अशी आहे......
ज्या शेराचा सरळ गद्य अर्थही रसिकास हलवून टाकतो, ज्याच्या गद्य अर्थातही काव्य शिगोशिग भरलेले असते, ज्याला विचारांचे अलौकिकत्व व सौंदर्य प्राप्त झालेले असते, ज्याला अर्थांचे अनेक पदर असतात, जो सुगम, सोपा, सुटसुटीत, सुभाषितासारखा किंवा म्हणीसारखा दैनंदीन जीवनात वापरता येण्याजोगता असतो, ज्याला कुठल्याही पर्यायी शेराची गरजच नसते, किंवा ज्याला तितक्याच ताकदीचा पर्यायी शेर देणे सोपे नसते, ज्यातील एकही शब्द अनाहूत/उपरा/अनावश्यक/ अप्रस्तुत असा नसतो, जो शब्दांच्या अर्थांच्या प्रसरणशीलतेचा पुरेपूर वापर करतो, जो अत्यंत प्रासादिक व बोलका असतो, ज्यात एकाच वेळेस अनेकांना आपले प्रतिबिंब पहायास मिळते, जो शेर अतिशय गोटीबंद असतो, ज्यात कुठेही शब्दांची ओढाताण नसते, कुठलीही व्याकरणाची सूट घेतलेली नसते, ज्या शेरातून मूळ गझलकार/कवी बाजूस राहतो व निव्वळ एक निखळ सत्य कलात्मक रूपात उरते तो शेर कामयाब होय.
(संपली बाबा एकदाची व्याख्या....हुश्श्! माफ करा आमच्यातील प्राध्यापक जागृत झाला की, असे लांबलचक काही तरी बोलतो तरी वा लिहितो तरी!)
आता आम्ही लिहितो तो प्रत्येक शेर कामयाबच असतो असा वेडगळ दावा आम्ही करणार नाही पण, हां त्या दृष्टीने आमचे सतत प्रयत्न मात्र चालू असतात!
टीप: वर दिलेली कामयाब शेराची व्याख्या ही कोणत्याही पुस्तकातील नाही. ती आमच्या आजवरच्या साहित्यिक अनुभवातून व चिंतनातून आलेली आहे, जे आमचे वैयक्तिक मत समजावे. सर्वांनाच ते पटेल असे नाही.
ते पटलेच पाहिजे असा आमचा आग्रह देखिल नाही!
...........प्रा.सतीश देवपूरकर
प्रत्येक शेरात हे उपरोक्त
प्रत्येक शेरात हे उपरोक्त सगळे आणणे अतीशय अवघड वाटते त्यामुळे माझ्या मनात असलेले इतर काही मुद्दे अॅड करणे टाळतो आहे
कधीकधी समोरच्याचा उगाचच अतीअन्त पाहणे व्यर्थ असते यास्तव थाम्बतो ........
धन्यवाद
वैभवा! ही व्याख्या आमची
वैभवा! ही व्याख्या आमची वैयक्तिक व्याख्या आहे, जर तुला ती आखूड वाटत असेल तर तू ती प्रदीर्घ करू शकतोस तिच्यामधे तुझे मौलिक मद्दे टाकून!
..............प्रा.सतीश देवपूरकर
सर्व प्रतिसादकांचेआभार!
सर्व प्रतिसादकांचेआभार!
Pages